नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ये झोपडीत माझ्या...
लटके नको ते जिने ये झोपडीत माझ्या
तुटका पलंग जरी रे ये झोपडीत माझ्या ।।
जगण्या तू स्वाभिमानी ये झोपडीत माझ्या
कर्तव्य जाण ठेवू ये झोपडीत माझ्या ।।
रडणे नको आता रे ये झोपडीत माझ्या
लढण्या पुन्हा जगू रे ये झोपडीत माझ्या ।।
धर्मास ग्लानी आली ये झोपडीत माझ्या
माणुसकी दाखवु रे ये झोपडीत माझ्या ।।
अंधार दूर सारू ये झोपडीत माझ्या
जगणे जागून घेऊ ये झोपडीत माझ्या ।।
-अशोक बाबाराव देशमाने