निर्भीड हुंकार
वृत्त: आनंदकंद
राग: चारुकेशी
ताल: केहरवा (मध्यम द्रुत
संदीप, 06/11/2026
पावलांनी ध्येयाच्या विरोधात चालायला नको
सत्याने सत्तेच्या बाजूने काही बोलायला नको
झोळी ज्यांची कायम फाटक्याच विचारांची
त्यांनी माझ्या शब्दांना तराजूत तोलायला नको
जमली फक्त बघ्यांची गर्दी तमाशा बघायला
इथे आशेची नवी ज्योत कुणी मालवायला नको
स्वाभिमान विकून ज्यांनी मांडला हा बाजार इथे
माझा इमानी बाणा त्यांनी आजमावायला नको
अजूनही झुकला नाही संदीप खोट्यापुढे कधी
त्याने आपली लेखणी कधी थांबवायला नको...
