![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
'एक होता राजा'
नांगरतो देह
धरणी माय अखेरीचा
फास कासराचा
माझ्यासाठी ||१||
पिकलेल सोनं
विकल मातीमोल दरात
उपाशी सणावारात
लेकरांसाठी ||२||
मोडका संसार
धनीन जिवापाड जपते
सोबतीने राबते
धन्यासाठी ||३||
उरावर फटके
सावकारी जाचाचे झेलतो
काट्यावर चालतो
पोटासाठी ||४||
कर्म कहाणी
भोगतो दारिद्र्याची सजा
शेतकरी राजा
कुणासाठी? ||५||
आधार शोधता
जग हासते त्याला
आयुष्यातून गेला
जगासाठी ||६||
पंडित निंबाळकर
अहमदनगर
7774047014