![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विळख्यात शेत माझे
दुःखा परीस हुरहुर माझ्या मणात आहे
विळख्यात शेत माझे फसले ऋणात आहे (धृ)
हक्कास मागतो मी पण न्याय मज मिळेना
विश्वास ठेवुनीही सरकारला कळेना
कसली हि चालबाजी येथे जगात आहे
विळख्यात शेत माझे फसले ऋणात आहे (1)
शेतात पेरली मी आहे गरज जिवाची
पण लागली तयाला आहे नजर कुणाची
या एवढ्या सकाळी झाकट नभात आहे
विळख्यात शेत माझे फसले ऋणात आहे (2)
दामात गाडणारी सरकारची नितीही
कर्जात ठेवणारी चालू सदा रितीही
माझ्या सवे इथे या हा होत घात आहे
विळख्यात शेत माझे फसले ऋणात आहे (3)
देशात होत आहे अन्याय या तर्हेचा
दाखून स्वप्न मजला मोहात पाडण्याचा
शेतीत या ठिकाणी हा होत पात आहे
विळख्यात शेत माझे फसले ऋणात आहे (4)
मंडीत आज माझा लुटतात माल सारे
उठलेत हे जिवावर आहेत काळ सारे
मीत्रत्व पण तरीही माझ्या उरात आहे
विळख्यात शेत माझे फसले ऋणात आहे (5)
कवी: प्रदिप थूल हिंगणघाट
वृत्त : आनंदकन
प्रतिक्रिया
छानच!
मस्त प्रदीप भाऊ. छान कविता
अभिनंदन
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद डाॅ साहेब
आपला खुप खुप आभारी आहे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
खूप छान!!!!
फारच छान कविता '' गांधीजी ''

सुंदर रचना
मस्त
Dr. Ravipal Bharshankar
पाने