नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरिय लेखनस्पर्धा - २०१८
लेखनाचा विषय - शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण
पद्यलेखन स्पर्धा - २०१८
विभाग – अ ) पद्यकविता
गोट तुमी वो ऐका
---------------
पाऊस नाई करावं काई, वाढतोया आजार
गरीब माजा शेतकरी राजा, झालाय वो बेजार
हाती नाई वो तेच्या पैका, गोट तुमी वो ऐका //
अन्नं मिळंना चूल्हा जळंना, रहातिया उपासी सारी
मरतीया ढोरं उपासी पोरं, फिरतीया आकाशी घारी
इथं पाणी मिळंना कैका, गोट तुमी वो ऐका //
उपवर झाली तेची वो बाली, लगीन करायचं औंदा
पाऊस दडला दुष्काळ पडला, जवळ नाई वो चंदा
मग सावकार मदतीला येईका, गोट तुमी वो ऐका //
महागाई वाढली आभाळी भिडली, उतरत नाई खाली
निवडून जाता आमदार व्हता, भ्रष्टाचार हा चाली
राजा वळीख आता धोका, गोट तुमी वो ऐका //
आळसी नोकर मारतोया ठोकर, करीत नाई काम
फुकटाचं खातो मजेत रहातो, मोबदला मागतो दाम
अशा लोकास्नी उचलून फेका, गोट तुमी वो ऐका //
शेतकरी कल्याण सरकारी सल्ल्यानं, एकबी प्रकल्प न्हाई
मालाला भावं नाई वो रावं, उमजत नाई काई
आसं धोरण बराबर हाय का ? गोट तुमी वो ऐका //
खातोया खस्ता एकच रस्ता, देवबी तेला ना तारी
शेतकरी मरण सरकारी धोरण, आलीय योजना दारी
आसं सरकार कामाचं हायका ? गोट तुमी वो ऐका //
के. एन. साळुंके
१७, साईक्रुपा सोसायटी,
विद्यावर्धिनी कालेजमागे,
साक्री रोड, धुळे - ४२४००१
मो.नं. - ९८५०६१२७६०
ई-मेल: knsalunke2013@gmail.com