Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

पावसाचा एक दुःखद अनुभव

Main page content

लक्ष्मण लाड
By लक्ष्मण लाड | 10:46 PM IST, शुक्र October 15, 2021
पावसाचे दुःखद अनुभव

अनुभवकथन

पावसाचा एक दुःखद अनुभव

१९९१ च्या जुलै महिन्यातली गोष्ट आहे. या महिन्यात एकसारखं पाणी सुरू होतं. एक दोन दिवसाची उघाड झाली का आणखी पाऊस. या मयन्यात पाण्यानं खूपच जोर धरला होता.मयन्याच्या शेवटच्या हप्त्यात तं या पावसानं कहरच केला. हप्ता झाला नुसती झळ सुरू होती. मया घराची मागची भित पडली. दिवसरातच्या पाण्यानं घरावरचे कौलं पाझराले लागले. घरभर गयाले लागलं. बसापुरती जागा पाहुन तिथच बसल्या बसल्या कशी मटकन् झोप लागाची थेबी समजाचं नाही. डोये तरी किती सहीन करणार होते. रोजच दिवसरात धो धो पाऊस पडत होता. नदी नाले वाहत होते.पेटवाचं इंधन पावसानं गारठलं होतं.थे पेटता पेटाचं नाही.लाकडयवर घासलेट ओतू ओतू पेटवा लागे. तीन चार दिवसापासून लाकडाची धुनी तशीच पेटती ठेवली होतीे. हाताले काम नसल्यानं घरात जे चटणी भाकर असन तेच्यावरच भागवाची वेय आली होती. माणसं कसंतरी ओलं कोरडं खाऊन सांज भागवत होते. पाऊस तर एवढा सततधार होता का बहिर परसाकडे जाणं मुश्कील झालं होतं. मातीच्या भितीयले ओल सुटून भिती पडाले लागल्या, घरं धडाधड पडत होते. वावरातले पीकं पुरात गेले. वावरयमधी पाणीच पाणी होतं. माणसं जनावरं पुरात वाहून गेले होते. मुसयधार पाण्याच्या धाकानं माणसं घरातल्या घरात दिवस काढत होते पण मुक्या जनवारायचं अवघड हून बसलं होतं.
मह्या घरी गाई होत्या. घरचा शिल्लक कडबा पाच -सात दिवसात सरला. आता गईले टाकासाठी घरात चारा नव्हता. बहिरतं मुसयधार पाणी पडत होतं. गई कोठ्यात जोरजोऱ्यानं हंबरत होत्या. तेयच्या आवाजानं जीव कयवयत होता पण उपाय रायला नव्हता. गाईच्या पोटात काहीतरी पडल्याशिवाय तेयचं हंबरन थांबणार नव्हतं.गई चाराले पाठवण म्हणून बाबा घराकडे आलाच नव्हता. थो फरकाड्याच्या कोठ्यातच झोपत होता. कोठा असला तरी इटा सिमेंटचा होता. आईनं मले सांगतलं, "जाय बाबाले बलावून आण.तेयले मन गई चाराले जा म्हणून. घरात चारा नाही असा म्हयावाला निरोप तेयले सांग"..म्या आईचा निरोप बाबाले सांगतला पण गई चाराले न्यासाठी बाबानं नकार देल्ला. "एवढया पाण्यात कुठं नेऊ मी गई चाराले?",बाबा बोलले, बाबाचं काही चुकलं नव्हतं. बाबा एका हातानं व पायानं अपंग होते. अडचण हेच होती का घरच्या जनावरयले टाकासाठी गवताची काडीही शिल्लक नव्हती. गई, वासरयच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. बाबा गई चाराले जाणार नाही. असा बाबाचा निरोप म्या आईले सांगतला. आई चवताळली, तिचे डोये रागानं लाल झाले, थे बाबाले शिव्याशाप द्याले लागली. "इकडे गई खुट्याले मरून रायल्या अन् ह्या दुसरेयच्या कोकात जऊन धसते". तिच्या जीवाची अंगार झाली होती.थे कपायावर हात आपटत आक्रोश करत होती. नशीबाले दोष देत होती.
आईचा नाईलाज झाला. आई मले जवळ घेऊन बोलली, "लक्षा तू जाय बेटा गई घिऊन. इथच्या इथं अमरईत नयीतं बळलीवर तरी गईले फिरवुन आण. मह्या 'सोन्या' हे घे पोत्याची घोंगसी डोक्शावर." घोंगाशी आंगावर अन् हाती इवाची काडी घेऊन मी गई मागं निघालो. अभायातून सरसर सरी बरसत होत्या. कायाकुट्ट अभायानं धरणी मायले झाकुन टाकलं होतं. दिवसाच्या पायरीच अंधार पडल्यासारखं वाटत होतं. चर्रर्र धारा बरसत असतांनी म्या गई चाराले नेल्या खरं पण गई काही एका जागी ठयरत नव्हत्या. अभायातून एकसारख्या पडणाऱ्या धारयनं गई पिसायल्या होत्या.थ्या चौपांड्या पयाले लागल्या.मी तेयच्या मागं पयत होतो. गईमागं धावण्याच्या नादात मह्या आंगावरची घोंगडी पडली, तरी मी जीवाच्या आकांतानं तेयच्या मागं पयत होतो. मह्या डोक्शात एवढच होतं का गई कुठं निघून जाऊ नये. मह्या पायात कईच नव्हतं, कवा खसकन् काटा टोचाचा तर कवा गारगोटी वा खडा, पण कायचाच इचार न करता मी तेयच्या मागं धावत होतो. तेयच्यावर दगडं मारून फेकत होतो पण थ्या कई मले अपटत नव्हत्या.
गई वावरातुन, नाल्याच्या पाण्यातून, धारणाच्या काठावरून, धारणातुन पयत होत्या.मी तेयच्या मागं धावत होतो पण तेच्यातली एकबी गाय मह्या हाती लागली नाही. तेच्यातलं एक कमजोर कारोड तिथच पडलं. काटे-गोटे रूतुन महे पाय रक्ताळले होते. पायाची आग होत होती. मी लंगडत अन रडत रडत घरी आलो. आईनं माही अवस्था पायली. हे काय झालं रे माह्या 'सोन्या'? तिनं मले छातीशी धरुन महे पटापट मुके घेतले.घडलेली हकीकत मी आईले सांगतली.आईच्या डोयात टचकन पाणी आलं. तिनं मह्या भोवतीची मिठी आणखीनच घट्ट केली. माह्य आंग थरथर कापत होतं. तिनं माहे कान फुकले.आंग पुसाले कपडा देल्ला. आई बोलाले लागली, ''आपला वनवास कवा सरन? बाप झयचा थो देव आपल्यासाठी कुठ लपुन बसला काय माहीत! त्याले आपले हाल कसे दिसत नसन.तेच्यात हे पाणी असं मरुन रायलं. हया पाण्याचाबी मुरदा नाही निघत. काय गरीबयले घिऊन जा साठी आलं काय, काय महीत".
आईनं पोतेयच्या दोन घोंगशा केल्या एक मह्या डोक्शावर देलली अन् दुसरी तिनं घेतली. चर पाण्यात आम्ही मायलेकं कारोडीच्या दिशेनं निघालो. घोंगशी आंगावर असली तरी आमी भिजल्यातच जमा होतो. एकदाचं आमी कारोड असल्या ठिकाणी पोचलो. आमाले पाहुन वासरू हबराले लागलं.आईन त्याच्या अंगावर हात फिरवला तसं थे उठासाठी धडपडाले लागलं. आईनं मग घरून आणलं होतं थे पीठ कारोडीले चारलं. थोडया वेयानं मोठ्या जीवावर कारोड उठली. आम्ही त्याले गतीगती घरी घेऊन आलो. वरतुन पावसाच्या धारा सुरुच होत्या. बाकीच्या गई संध्याकई घरी आल्या.रात्री पावसानं आणखीनच जोर धरला. इजा चमकत होत्या, ढगांचा गडगडाट वाढला होता. आई देवाचा धावा करत होती. "अरे बापा देवा, तुच आहे राजा, कई नको दाखवू " तिनं आपला निंदाचा ईया घरावर ठिवला व आम्ही झोपलो.
३० जुलै१९९१ ची थे रात होती. दुसरा दिवस निघाला तो वाईट बातमी घेऊनच.एकसारख्या मुसयधार पावसानं नदी नालेयले पूर आला होता.तेच्यात मोवाळ गावच्या वरचं धारण अर्ध्या रातीच फुटलं. गावात महापुराचं पाणी घुसलं त्यामुळं नागपूर जिल्हयातलं मोवाळ हे गाव पाण्यात बुडालं. गावतल्या लोकयले जलसमाधी मिळाली. लहान, तरुण,म्हतारे सारे पाण्यात बुडले.घडीत होत्याचनोतं झालं. कोणाले कोणाचा जीव वाचवता आला नाही. अशी थे काळरात्र होती.घरादारांची राखरांगोळी झाली. गावाचं मशान झालं. या बातमीनं सारं गाव हळहळलं. खरच हा पाऊस सर्वांना यातना देणाराच ठरला.

लक्ष्मण लाड
परळी वै जि.बीड
मो.९८५०५६९१३२

छान

मुक्तविहारी

शनीवार, October 16, 2021 - 13:23
Permalink
New

छान अनुभव मांडला आहे.

  • Log in or register to post comments
खूप खूप धन्यवाद मुक्तविहारीजी

लक्ष्मण लाड

गुरुवार, October 21, 2021 - 08:32
Permalink
New

खूप खूप धन्यवाद मुक्तविहारीजी

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे स्वागत

गंगाधर मुटे

मंगळवार, November 2, 2021 - 20:30
Permalink
New

*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5694 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,331 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,212 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,254 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,045 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,498 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,395 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,221 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,871 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,112 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,018 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,398 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,286 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,258 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,642 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,284 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,378 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • गंगाधर मुटे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 95 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    14 hours 13 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    17 hours 57 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    18 hours 1 minute ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    18 hours 4 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    18 hours 5 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 51
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 26
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 21
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 20
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 20
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 17
माझे फेसबूक स्टेटस - 2 16
आजचे शेतमालाचे बाजारभाव 13
कापला रेशमाच्या सुताने गळा 10
किती चाटणार भारतपुत्रा? 10
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 8
अंतरंग : अव्यक्त भावनांचा मुक्त आविष्कार 8
माझे फेसबूक स्टेटस-1 5
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 5
पाणी लाऊन हजामत 4
शोधनिबंध : शेतीत भरघोस उत्पादन कशाचे येते-समृद्धीचे की दारिद्र्याचे? (Research Paper) 4
पोळ्याच्या झडत्या 4
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 4
शेतकरी पात्रता निकष 3
// आभाळभर कर्जाचं डोंगर... // 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,072
माझे फेसबूक स्टेटस-1 181,026
शुभारंभ 134,956
रानमेवा - भूमिका 109,397
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,493
आजचे शेतमालाचे बाजारभाव 93,165
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,550
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,014
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,635
उद्देश आणि भूमिका 77,620
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,989
विचारपूस 71,856
गणपतीची आरती ॥३५॥ 67,878
सत्कार समारंभ : वर्धा 66,750
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,358
किती चाटणार भारतपुत्रा? 61,995
जात्यावरची गाणी 56,047
माझे फेसबूक स्टेटस - 2 50,025
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,082
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,439
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini