नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१
लेखनाचा विषय : रानातला पाऊस
पद्यलेखन स्पर्धा-२०२१ :
विभाग : अ) पद्यकविता
कविता लेखन स्पर्धा
जीवाची होते कायली
उष्ण या वातावरणात,
गार हव्याच्या झोक्याने
मन शांत होते क्षणात.
वादळ तेव्हा आल्यावर
पाऊसही खूप बरसतो,
गंध रानातल्या मातीचा
परिसरात सर्वत्र पसरतो.
पावसाच्या आगमनाने
पसरते चहुकडे हिरवाई,
त्याच्या मधुर बरसण्याने
बहरते निसर्ग नवलाई.
टपोरे थेंब पावसाचे
मोत्यांसम दिसतात,
स्वर्गसुख हे रानातले
स्वप्नासम भासतात.
हिरव्यागार रानात
गवत सदा झुलतात,
थुई थुई या तालावर
मोर छान नाचतात.
काळ्या गडद नभांतून
ढग सरकू लागतात,
सप्तरंगांनी सजल्यावर
इंद्रधनुष्य प्रकटतात.
निसर्गाच्या किमयेत
ही सृष्टी पूर्णतः न्हाते,
आपल्या गोड स्वरात
कोकिळा सुरेख गाते.
अशांत लबाड पाऊस
काही वेळाने थांबतो,
मनुष्याच्या भावनांशी
लपंडाव खेळ खेळतो.
भिन्नरूप अतरंगी पाऊस
आनंदाने प्रारंभी हसवतो,
अतिवृष्टीने त्या अंतक्षणी
हृदयद्रावक खूप रडवतो.
नाव: भूषण सहदेव तांबे
पत्ता: बिल्डिंग नंबर २२ / रूम नंबर २२, बी.पी.टी. जुनी कॉलनी, नाडकर्णी पार्क, वडाळा, पूर्व, मुंबई. पिन कोड- ४०० ०३७
ई-मेल: bhushantambe88@gmail.com
व्हाट्सअप क्र.: ९०२९२५८०३८.
प्रतिक्रिया
अप्रतिम साहित्य लेखन भूषण सर.
खूप छान छंद कविता
अतिवृष्टीने त्या अंतक्षणी
हृदयद्रावक खूप रडवतो
खूप छान सर!!
अप्रतिम साहित्य लेखन भूषण सर.
खूप खूप छान रचना सादरीकरण.
खूप खूप छान रचना सादरीकरण.
खूप सुरेख लिहिलं आहे भूषण.
खूप सुरेख लिहिलं आहे भूषण.
मस्तच....
अभिनंदन.
खूप छान कवितेचेचे सादरीकरण
खूप छान कवितेचेचे सादरीकरण
आपणास पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा!!!
अप्रतिम लेखन भूषण.
खूप खूप छान लेखन लिहिले आहे.
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण