६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन अलिबागला
दिनांक : ८ व ९ फेब्रुवारी २०२० स्थळ : क्षात्रैक्य सभागृह, अलिबाग जि. रायगड
भास्कर चंदनशिव संमेलनाध्यक्ष तर संजय राऊत उद्घाटनाला येणार
कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणार्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. ८ व ९ फेब्रुवारी २०२० रोजी क्षात्रैक्य समाज सभागृह, अलिबाग जि. रायगड येथे दोन दिवशीय ६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शेतकरी साहित्यिक मा. भास्कर चंदनशिव यांची निवड करण्यात आली असून ज्येष्ठ पत्रकार मा. संजय राऊत संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. ८ फेब्रुवारीला उद्घाटन सत्रात मा. राजीव खांडेकर, संपादक, एबीपी माझा, मा. श्री. सुनील तटकरे खासदार, रायगड, मा. सरोजताई काशीकर, माजी आमदार, मा. ऍड सतीश बोरुळकर प्रमुख अतिथी म्हणून तर स्वागताध्यक्ष मा. ऍड प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष मा. गंगाधर मुटे प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत.
वरिष्ठ पत्रकार मा. आदिनाथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुरस्कार वितरण सत्राला मा. ना. कु.अदिती तटकरे, राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन, आमदार मा. महेंद्र दळवी, नगराध्यक्ष मा. प्रशांत नाईक, कृषी अर्थतज्ज्ञ मा. संजय पानसे, मा. कैलास तवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
समारोपीय सत्र शेतकरी नेते ऍड वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. अनिल घनवट, वरिष्ट पत्रकार मा. राजेश राजोरे, मा. गीता खांडेभराड, मा. बाबुभाई जैन, मा. नीलकंठराव घवघवे, श्री दिलीप भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल.
मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे, “रोजचेच मढे, त्याला कोण रडे” अशा निर्विकारपणे शेतीव्यवसायाकडे बघण्याची शासकीय यंत्रणेची मानसिकता तयार झाली आहे. राज्यातील गेल्या काही वर्षापासून सततच्या नापिकीने शेतीव्यवसाय डबघाईस आला असतानाच बिगरशेती उत्पादनाचे बाजारभाव आकाशाला भिडत असून शेतीमालाचे भाव एकतर स्थिर आहेत किंवा नीचांक गाठत आहे. परंतू प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह होतांना दिसत नाही. राजकीय आणि शासकीय आघाड्यावर उपाययोजना शोधण्याच्या संदर्भात तर सारा शुकशुकाट जाणवत आहे.
समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात सुद्धा यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शेतकऱ्याची मुले शिक्षण घेऊन अन्य व्यवसायात गेली, पोटापाण्याचा प्रश्न सुटल्याने लिहिती होऊन अभिव्यक्त व्हायला लागली पण त्यांनाही शेतीच्या वास्तवाकडे अभ्यासपूर्ण आपुलकीने पाहावेसे वाटत नाही, हे शेतीव्यावासायाचे फार मोठे शल्य आहे. गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात लक्षावधी शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे का उमटत नाही? याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे. शेतकरी आत्महत्यांवर सर्वकष प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात आजही उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.
साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे, २०१७ मध्ये तिसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली येथे, २०१८ मध्ये चवथे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई येथे तर २०१९ मध्ये ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण येथे आयोजित करून पिढ्यानपिढ्याच्या अबोलतेला बोलते व लिहिते करण्याच्या यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे.
या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या लढवैया सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात “हिरव्यागार शेतीला कार्बन क्रेडीटचा लाभ का नाही?” “कांदे आणि अकलेचे कांदे” “खुली बाजारपेठ आणि वायदा बाजार” “खांद्यास चला खांदा भिडवूनी” अशा विविध विषयावरील परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे.
संमेलनात शेतकरी गझल मुशायरा, शेतकरी कवी संमेलन,शेतकरी कथाकथन व “ज्येष्ठ शेतकरी साहित्यिक मा. शेषराव मोहिते यांची प्रकट मुलाखत” असे स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून या संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशातील १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा विश्वास आहे.
गंगाधर मुटे
कार्याध्यक्ष
* * *
शनी, 19/10/2019 :
प्रतिनिधी नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरु होत आहे.
* * *
अलिबाग एक सुंदर पर्यटन स्थळ
अलिबाग हे एक सुंदर पर्यटन स्थळ असून त्याला मिनी गोवा मानले जाते. संमेलनाला आलेले प्रतिनिधी संमेलन सोडून फिरायला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आपल्या आजवरच्या शिस्तीला यावेळेस तडा जाण्याचा धोका आहे. संमेलनातील सोयीसुविधांचा लाभ घ्यायचा आणि संमेलनाऐवजी पर्यटन करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिनिधींनी संमेलनाशी कटिबद्धता राखण्यासाठी दोन्ही दिवस कार्यक्रमात उपस्थित राहून १ किंवा २ दिवस पर्यटनासाठी स्वतंत्र दिवस राखून ठेवावे आणि त्यादृष्टीने आपले नियोजन करावे, अशी आग्रहाची विनंती आहे.
त्यासाठी प्रतिनिधींसाठी एक दिवस अतिरिक्त मुक्कामाची व्यवस्था करता येईल काय, याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे. सबब प्रतिनिधींना विनंती कि त्यांनी अलिबागसाठी ३ किंवा ४ दिवसाचे नियोजन करावे.
------------
बुध, 30/10/2019
प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :
-
सभागृहाची आसन क्षमता, निवासाच्या सोयीसुविधा व भोजनाची व्यवस्था लक्षात घेता गैरसोय होऊ नये म्हणून अग्रिम प्रतिनिधी नोंदणी करणे आवश्यक आहे.
-
प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य आहे. भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी किट मध्ये दिली जाईल.
-
एक ते पाच प्रतिनिधी सहभाग शुल्क सामूहिकपणे भरुन एकत्रितपणे नोंदणी करू शकतात.
-
प्रतिनिधींना ३ वेळ भोजन, ४ वेळ चहा, अल्पोपहार, १ रात्र निवास व्यवस्था, माहिती किट आणि सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
-
अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे, व्हाटसपद्वारे, ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक कळवला जाईल.
-
पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
-
झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील आणि त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवले जाईल.
-
नोंदणी झालेल्या सर्व वक्ते, कवी आणि गझलकार यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही, याची नोंद घ्यावी.
-
कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
बुध, 18/12/2019 :
सूचना - प्रतिनिधी नोंदणी
-
ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरुन किंवा ईमेलने माहिती पाठवून *प्रतिनिधी नोंदणी* केलेली आहे त्या सर्वांना त्यांचा *नोंदणी क्रमांक* पाठवण्यात आलेला आहे.
-
ज्यांनी नोंदणी केली परंतु त्यांना *नोंदणी क्रमांक* अजून मिळाला नसेल त्यांनी तातडीने कळवावे.
-
पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
-
झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील आणि त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवले जाईल.
-
दोन व्यक्तींनी खात्यावर रक्कम जमा केलेली आहे पण त्यांच्याकडून काही माहिती आलेली नसल्याने कुणी जमा केली हे कळायला मार्ग नाही. कारण आजकाल ऑनलाइन पद्धतीने रक्कम जमा केल्यास फक्त TXN नंबर येतो, नाव येत नाही. सबब संबंधितांनी माहिती पाठवली नाही, आणि त्यांची नोंदणी झाली नाही तर त्याचा दोष शेतकरी साहित्य चळवळ स्वीकारू शकणार नाही.
आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!
दिनांक : ०४/०२/२०२० - सुधारित कार्यक्रम पत्रिका
प्रतिक्रिया
अत्यंत महत्वाचे निवेदन :
----------------------
शेतकरी तितुका एक एक!
सहावे अ.भा.मराठी शेतकरी संमेलन
नमस्कार मुटे सर,
सर्वप्रथम तुमचे हार्दिक अभिनंदन. सलग सह्याव्यांदा अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करुन तुंम्ही तुमच्या सचोटीची, जिद्दीची, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, व्यथांची, समस्यांची जाणिव असल्याची व त्यावर तोडगा काढण्याच्या ध्यासाची प्रचिती दिलीत.
माझ्या खूप खूप शुभेच्छ्या.
आपला शुभचिंतक
रविंद्र कामठे
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
लोकमत
शेतकरी तितुका एक एक!
स्वागत
खुपच छान सर
Dr. Ravipal Bharshankar
अभिनंदन सर!
खूप छान!
खूप खूप शुभेच्छा
६ वे अ.भा.मराठी शेतकरी
६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग
दिनांक : ८ व ९ फेब्रुवारी, २०२०
प्रतिनिधी नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरु होत आहे.
अलिबाग हे एक सुंदर पर्यटन स्थळ असून त्याला मिनी गोवा मानले जाते. संमेलनाला आलेले प्रतिनिधी संमेलन सोडून फिरायला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आपल्या आजवरच्या शिस्तीला यावेळेस तडा जाण्याचा धोका आहे. संमेलनातील सोयीसुविधांचा लाभ घ्यायचा आणि संमेलनाऐवजी पर्यटन करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिनिधींनी संमेलनाशी कटिबद्धता राखण्यासाठी दोन्ही दिवस कार्यक्रमात उपस्थित राहून १ किंवा २ दिवस पर्यटनासाठी स्वतंत्र दिवस राखून ठेवावे आणि त्यादृष्टीने आपले नियोजन करावे, अशी आग्रहाची विनंती आहे.
त्यासाठी प्रतिनिधींसाठी एक दिवस अतिरिक्त मुक्कामाची व्यवस्था करता येईल काय, याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे. सबब प्रतिनिधींना विनंती कि त्यांनी अलिबागसाठी ३ किंवा ४ दिवसाचे नियोजन करावे.
अलिबाग एक पर्यटन स्थळ : प्रतिनिधींना अधिक माहितीसाठी >>>> http://www.baliraja.com/node/1907
शेतकरी तितुका एक एक!
प्रतिनिधी सहभाग नोंदणीची
शेतकरी तितुका एक एक!
सूचना - प्रतिनिधी नोंदणी
सूचना - प्रतिनिधी नोंदणी
ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरुन किंवा ईमेलने माहिती पाठवून *प्रतिनिधी नोंदणी* केलेली आहे त्या सर्वांना त्यांचा *नोंदणी क्रमांक* पाठवण्यात आलेला आहे.
ज्यांनी नोंदणी केली परंतु त्यांना *नोंदणी क्रमांक* अजून मिळाला नसेल त्यांनी तातडीने कळवावे.
पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील आणि त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवले जाईल.
दोन व्यक्तींनी खात्यावर रक्कम जमा केलेली आहे पण त्यांच्याकडून काही माहिती आलेली नसल्याने कुणी जमा केली हे कळायला मार्ग नाही. कारण आजकाल ऑनलाइन पद्धतीने रक्कम जमा केल्यास फक्त TXN नंबर येतो, नाव येत नाही. सबब संबंधितांनी माहिती पाठवली नाही, आणि त्यांची नोंदणी झाली नाही तर त्याचा दोष शेतकरी साहित्य चळवळ स्वीकारू शकणार नाही.
आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे
कार्याध्यक्ष
६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग
शेतकरी तितुका एक एक!
(विषय दिलेला नाही)
शेतकरी तितुका एक एक!
अत्यंत महत्वाचे निवेदन
शेतकरी तितुका एक एक!
संमेलन नियोजन
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण