नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मराठी असे आमुची मातृभाषा
करितात वंदन हिजला दाही दिशा
प्राणाहून प्रिय आम्हासी ही मराठी
हिजसंगे आमुच्या जन्मोजन्मीच्या गाठी
शिवबाने केले मराठी स्वराज्य निर्माण
मावळ्यांनी पाडले परसत्तेचे निशाण
असे ही मराठी ज्ञानेश्वर, मुक्ताईची
मातीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची
इथल्या कणाकणात वसते मराठी
इथल्या अनिलात वाहते मराठी
शिवबाच्या तलवारीत तळपते मराठी
भास्कराच्या प्रकाशात चमकते मराठी
तुकारामांच्या अभंगातील ओवी मराठी
लतादीदींच्या गाण्यातील सुर-ताल मराठी
भारताचे रत्न अमुचा सचिन हा मराठी
हिमालया सर करिते कृष्णा ही मराठी
आमुची आन-बान-शान मराठी
जगतो आम्ही हिच्या रक्षणासाठी
-विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
प्रतिक्रिया
व्वा. फार सुरेख कविता.
व्वा. फार सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
पाने