Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

शेतकरी आत्महत्याचे एक मुख्य कारण आयात निर्यात धोरण!

Main page content

Profile picture for user SatishDeshmukh
By SatishDeshmukh | 11:44 PM IST, गुरू November 26, 2026
वैचारिक लेख

शेतकरी आत्महत्याचे एक मुख्य कारण आयात निर्यात धोरण!

भारत हा भौगलिकदृष्ट्या, अमाप भुसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसऱ्या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र इतर राष्ट्रांवर युद्ध सामुग्रीच्या जोरावर, आर्थिक ताकदीच्या, आधुनिक तंत्रज्ञानाने आपले राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक वर्चस्व किंवा वसाहतवादच्या द्वारे थेट प्रादेशिक संपादन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. तसे भारताला इतर देशांवर धान्य निर्यात करून अन्न सुरक्षाच्या माध्यमातून झुकवता आले असते. भारत दूध, डाळी आणि ताग उत्पादन जगात पहिल्या स्थानावर तर तांदूळ, साखर, गहू, कापूस, फळे व भाजीपाला उत्पादन दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु सरकारच्या दळभद्री आयात निर्यात धोरणामुळे असे होऊ शकले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणामध्ये असा उल्लेख केला आहे की देशाची कृषी निर्यात 4 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलेली आहे. यावरून लोकांचा गैरसमज होऊ शकतो. या निर्यातीमध्ये शेतकऱ्यांचा कच्चा कृषीमाल नगण्य आहे. त्या मध्ये उद्योगपतींचे बासमती तांदूळ, मसाले, कॉफी, चहा, तंबाखू, प्रोसेसड पॅकड फुड, मँगो पल्प, दारू, कोळंबी सारखी सागरी उत्पादने, मांस यांचा सहभाग मोठा आहे.

कांद्याला निर्यात बंदी आहे, पण त्यापासून तयार होणाऱ्या मसाल्यांना बंदी नाही. साखरेला निर्यात बंदी किंवा नियंत्रित आहे, पण त्यापासून होणारे कॅडबरीला बंदी नाही. शेतकऱ्यांच्या गव्हाला बंदी आहे, पण त्यापासून तयार झालेला 'शुद्ध आटा' व बिस्किटांना मात्र मुभा आहे.

निवडणुकीच्या तोंडावर सरकार अचानक निर्यात बंदीची निर्णय घेत असतात. त्यामुळे बराच शेतमाल जसे डाळी, कांदे वगैरे ही 'राजकीय पिके' झाली आहेत. केंद्र सरकारच्या अशा धरसोड वृत्तीमुळे,  विश्वासार्ह संहिता गमावल्यामुळे, जागतिक बाजारपेठेतील आपले स्थान डळमळीत झाले आहे. अचानक लादलेल्या निर्यात बंदीमुळे निर्यातदारांचे सौदे पूर्ण न झाल्यामुळे अनेक निर्यातदारांना परदेशी ग्राहकांनी ब्लॅक लिस्ट केले आहे.

सन 2023-24 मध्ये साखरेची आपली निर्यात 17,315 कोटी रुपये होती. ती मागील वर्षापेक्षा 65% नी कमी होती. त्या तुलनेने ब्राझीलची साखर निर्यात 1.64 लाख कोटी रुपये म्हणजे आपल्या 9.5 पट होती. साखरेची निर्यात करून साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव एफआरपी रक्कम मिळू शकली असती.

सरकार शेतकऱ्यांच्या अर्थकारणापेक्षा उद्योगपतींच्या नफेखोऱ्यांना जास्त प्राधान्य देते. अमेरिकेने भारताच्या कापडावर 50% शुल्क लागू केल्यामुळे टेक्सटाईल उद्योगाच्या दबावामुळे सरकारने नुकतेच कापूस आयातीवरील 11 टक्के शुल्क हटवले आहे. त्यामुळे कापसाची विक्रमी आयात होऊन कापसाचे भाव कोसळणार आहेत. व शेतकऱ्यांना परत हमीभाव खरेदी केंद्रामध्ये लाईन लावून, मुक्काम करावा लागणार आहे.

निर्यात बंदी ही प्रत्यक्ष असते किंवा अप्रत्यक्षही असते. उदाहरणार्थ कांद्याचे अप्रत्यक्ष बंदी सरकारने कांदा निर्यातीसाठी 550 डॉलर किमान निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्काची खुट्टी मारून ठेवली होती.

सरकारला निर्यात बंदी करायची असेल तर त्या नोटिफिकेशन ची सुरुवात अशी असते, "आवश्यक वस्तू कायदा, 1955 च्या कलम 3 द्वारे प्रदान केलेल्या शक्तीच्या वापर करून, किंवा "विदेशी व्यापार कायदा" व "विदेश व्यापार नीती" च्या आधारे आम्ही हे निर्देश देत आहोत की.......

निर्यात बंदीपेक्षा वेळोवेळी होणारी आयात धोकादायक व जीवघेणी आहे.
उदा. सन 25-25 मध्ये खाद्य तेलाची 1,50,798 कोटी रुपयांची आयात केली होती. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना सूर्यफूल, सोयाबीनला भाव मिळाले नाहीत. आणि परदेशातील शेतकऱ्यांचा फायदा झाला.

जानेवारी 2024 मध्ये सरकारने तांदूळ, गहू, साखरे वर निर्यात बंदी घातली होती. परंतु कधी कधी त्यांनी इंडोनेशिया, सेनेगल, गांबिया, भूतान, मालदीव सारख्या मित्र राष्ट्रांना त्यांच्या अन्नसुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या देशांमध्ये निर्यात करण्यासाठी मर्यादित प्रमाणात परवानगी दिली होती. असेच एकदा बांगला देशाच्या दबावामुळे कांदा निर्यातला परवानगी दिली होती. शेतकऱ्यांसाठी म्हणून नाही.

सन 2025-26 चा अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामन यांनी 'डाळींमध्ये आत्मनिर्भरता (स्वावलंबन) अभियान' सुरू करण्याची घोषणा केली होती.
प्रत्यक्षात सरकारकडून आयात शुल्क 30.25 % वरून 5.5 % वर आणल्यामुळे सन 2024-25 मध्ये डाळीची तब्बल 47,652 कोटी रुपयांची डाळ आयात झाली. त्यामुळे डाळीचे भाव पडतात. त्यामुळे शेतकरी त्या लागवडीकडे वळत नाही. पर्यायाने उत्पन्न कमी झाल्यामुळे ग्राहकांची गरज भागवण्यासाठी परत आयात करावी लागते. हे दुष्टचक्र भेदायला हवे.

शेतमालाचे भाव पाडण्यासाठी, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सेबी) ने सात मालांच्या (गहू, धान (गैर-बासमती), चना, मोहरी, सोयाबीन, कच्चे पाम तेल आणि मूग) फ्यूचर वायद्यांवर 3. 5 वर्षांपासून बंदी घातली आहे.

सरकार हे सर्व काही ग्राहकांसाठी करते हा एक गोड गैरसमज व अर्धसत्य आहे. सरकारला काळजी आहे औद्योगिक प्रक्रिया व्यवसाय लॉबीची.

घरगुती वापरासाठी कांद्याचा खप फक्त 5% आहे. त्याचा इतर 95% वापर हॉटेल्स, मसाले तयार करणारे निर्यातदार हेच करीत आहेत. सोयाबीनचा मानवी खाण्यासाठीचा खप फक्त 6% आहे. इतर वापर पशु खाद्य, ऑइल इंडस्ट्रिज, बायो डिझेल, हॉटेल्स प्रक्रिया करण्यासाठी वापरतात. कापूस तर कोणीच खात नाही. त्याच्यावर टेक्सटाईल व तेल उद्योगाचा दबाव आहे.

शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची आशा आहे अशी परिस्थिती निर्माण असताना सरकार हस्तक्षेप करून शेतमालाचे भाव खाली पाडतात. आफ्रिका, म्यानमार, ब्राझील, अर्जेंटीना, मोझंबिक, टांझानिया वगैरे परदेशी शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा जास्त किमतीमध्ये, चढ्या दराने खरेदी करून त्यांचे हित जपतात. व आपल्या परकीय चलनाची उधळपट्टी करतात.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर आणि नाबार्ड ह्यांनी मिळून शेतकऱ्यांना निर्याती बाबत  मार्गदर्शन करण्यासाठी "अग्रीकल्चर एक्स्पोर्ट फॅसिलीटीटेशन सेन्टर" सुरु केले आहे. परंतु नुसते प्रशिक्षण देण्या व्यतिरिक्त त्यांच्या कडून भरीव सहकार्याची आवश्यकता आहे.

दबावाखाली येऊन भारत सरकारने इतर औद्योगिक उत्पादने निर्याती साठी, अमेरिकेचा कृषीमाल जसे दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन, जीएम मका वगैरे आयात साठी भारतीय बाजारपेठ उपलब्ध केली तर आम्ही प्रखर विरोध करू.

  • सतीश देशमुख
    जी – ६५, आदित्यनगर, गाडीतळ
    हडपसर, पुणे – ४११०२८
    E-mail ID : deshmukhsk29@gmail.com
    Mob : 9881495518
शेतकरी आत्महत्याचे एक मुख्य कारण आयात निर्यात धोरण
  • Log in or register to post comments
  • 7 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,364 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,257 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,275 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,051 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,503 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,415 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,228 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,899 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,124 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,021 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,461 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,307 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,275 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,644 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,287 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,379 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 2889 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    13 hours 26 minutes ago
  • धन्यवाद
    13 hours 27 minutes ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    15 hours 6 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    15 hours 9 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    15 hours 11 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
आजचे शेतमालाचे बाजारभाव 1,769
माझे फेसबूक स्टेटस-1 782
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 392
माझे फेसबूक स्टेटस - 2 286
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 274
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 210
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 176
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 166
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 158
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 134
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 133
किती चाटणार भारतपुत्रा? 117
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 99
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 98
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 86
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 85
नागपुरी तडका - ई पुस्तक 85
मातृत्वाचा शृंगाररस 82
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 79
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 78
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,130
माझे फेसबूक स्टेटस-1 181,803
शुभारंभ 134,986
रानमेवा - भूमिका 109,400
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,578
आजचे शेतमालाचे बाजारभाव 94,921
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,561
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,096
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,689
उद्देश आणि भूमिका 77,672
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 74,255
विचारपूस 71,930
गणपतीची आरती ॥३५॥ 67,903
सत्कार समारंभ : वर्धा 66,774
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,376
किती चाटणार भारतपुत्रा? 62,102
जात्यावरची गाणी 56,069
माझे फेसबूक स्टेटस - 2 50,295
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,105
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,491
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini