![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
व-हाडी कविता:- सरवा
पिक हिरवं हिरवं
जसं धरतीचं लेन
भरू डोयात सपान
गाऊ आबादानी गाण..१
कधी झाकटीच्या वक्ती
आलं आभाय भरून
पेरू मातीच्या कुशीत
सोन्या मोत्याच हे वाणं ..२
लेऊ लक्ष्मीले शालू
भरलं शिवार शिवार
कांदा भाकरी खाऊन
विष्णू हाकते वखर....३
वारा वादयानं मोठा
केला कह्यर कहयर
काया जवारीनं माह्य
केलं मातेर मातेर...४
दाण्या दाण्याचा हिसाब
खयामधी रे वेचला
दिस रातीचा म्या केला
कडवा सरवा उरला ....५
कर्ज काढून घायाल
बोजा वाढे दरसाली
लाथा हाणते नशिब
कोण हाये त्याचा वाली...६
अजित सपकाळ अकोट
जि अकोला
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पहिल्या तीन कडव्यामध्ये
पहिल्या तीन कडव्यामध्ये समृध्दतेचे बळीराजाच्या समृध्दतेचे वर्णन आहे व उर्वरीत कडव्यामध्ये त्याची व्यवस्था व निसर्गाने केलेली व्यथा मांडली आहे
पहिल्या तीन कडव्यामध्ये
पहिल्या तीन कडव्यामध्ये समृध्दतेचे बळीराजाच्या समृध्दतेचे वर्णन आहे व उर्वरीत कडव्यामध्ये त्याची व्यवस्था व निसर्गाने केलेली व्यथा मांडली आहे
आपण कवितेत ज्या बळीराजाचे
आपण कवितेत ज्या बळीराजाचे वर्णन केले तो बळीराजा आपल्या स्पर्धेचा विषय नाही.
पाने