नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माहीत का कुणाला !
------------------------
माहीत का कुणाला पिल्लास काय झाले?
राहुन क्षणभर म्हणते खाली अभाळ झाले.
रस्ते बघा कसे हे त्याला अजून छळते,
प्रत्येक पावलाला बाजूस हात झाले.
दूरून स्पर्श करता भागून जात होते,
न्हाले अशा भयाने थरथरत कांप झाले.
पाहून हाल त्याचे गेले खचून मन हे,
फांदीसमान हलते दररोज गाव झाले.
चौकात माणसांची त्याच्यावरीच चर्चा,
ना थेंब पावसाचा फसवे ढगाळ झाले.
वाटेकरी कसे हे वीचार जा भुईला,
पहिल्याच पावसाला सारे समान झाले.
सरईत काल खेळत काठी बसुन नदीच्या,
ते गाव विसरले की देवास दान झाले.
राजेश शोध त्याला मग विवश का असा तू,
बस कर न लेखनीचे कौतूक फार झाले.
लगावली-
गागालगालगागा गागालगालगागा
व्रुत्त-आनंदकंद
-राजेश जौंजाळ पोहणा(हिंगणघाट)
---------------------------------------------------
प्रतिक्रिया
लेखणीचे कौतुक....
रावसाहेब जाधव (चांदवड)
लेखणीचे कौतुक....
रावसाहेब जाधव (चांदवड)
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने