![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"रानीचा पाऊस, अन्- ती."
जीव होई कासावीस
नको एकली जाऊस ,
वय सोळाव सरीच
रानी बरसे पाऊस.
आसं मातीत पेरली
होऊ देनाआबादानी
लई मुजोर वानाचा,
येते सालाबादा वानी.
गुण्या-गोविंदान येना
करू नको ना नासाडी
भरल्या बोंडाची पराटी
तिची नव्वी कोरी साडी.
रान चिंबओलं झालं
नार हिरवं देणं ल्याली
वीज कडाडे आभाळी
मेघा कळवे खुशाली.
कवा फिटलं हौउस
भोग नशिबाचा आला
रानातल्या पावसा रे
किती बेईमान झाला,
*** नरेंद्र भा. गंधारे
'एकांत'
प्रतिक्रिया
वय सोळाव सरीच... व्वा क्या बात.
मस्तच.
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद, डॉ. साहेब आभार.....
धन्यवाद, डॉ. साहेब
आभार.....
Narendra Gandhare
बरसे रानात पाऊस
जीव होई कासावीस
नको एकली जाऊस ,
वय सोळाव सरीच
बरसे रानात पाऊस.
क्या बात है, खूप छान नरेंद्र भाऊ!!!!!
धन्यवाद गुरुजी
आपले आभार
Narendra Gandhare
खुपच छान कविता नरेंद्र भाऊ.
खुपच छान कविता नरेंद्र भाऊ.
. धन्यवाद
आभार राजेश..
Narendra Gandhare
अप्रतिम रचना कविवर्य.
दिवाकर जोशी
नमस्कारमान्यवर
आपले मनापासून आभार
Narendra Gandhare
भरल्या बोंडाची पराटी. तिची नव्वी कोरी साडी
मस्त सुंदर ओळ .नरेंद्र भाऊ
धन्यवाद
आभार आपलं....
Narendra Gandhare
वय सोळावं सरीच क्या बात है
वय सोळावं सरीच
क्या बात है
महोदय, नमस्कार
आभार आपले, धन्यवाद
Narendra Gandhare
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने