नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
चांगली माणसे ..एक अनुभव !!
समोर टेलीविजन चालू होता. कुठल्याश्या घोटाळ्याच्या ई डी चौकशीची बातमी चालू होती. कोटीच्या कोटी रुपयांचा उल्लेख अगदी काही शे रूयाण्चा करावा तसा होतं होता. वीस हजार कोटी पंचवीस हजार कोटी मध्येच तो कुणीतरी अकरा हजार कोटी कर्ज घेवून पळालेल्याची आवर्जून आठवण काढली जात होती. चर्चा सत्र जोरात रंगात आलं होतं वेगवेगळे आदर्श असलेली वेगवेगळी माणसं आगदी हिरीरीने स्वताचा मुद्दा पटवून देत होती. कोटीच्या कोटी उड्डाणे ऐकून हा एवढा पैसा असूनही त्यांच्याबाबत तसूभर ही आदर निर्माण करू देत नव्हता. काही शेतकरी त्यांचे सोसायटी कर्ज फेडीसाठी, चाळीस पन्नास हजार रुपयांसाठी झगडत असताना आणि बँका त्यांच्याकडे तारण म्हणून भरमसाठ कागदपत्रे मागत असताना या लोकांना अपहार करायला इतका पैसा मिळतो कसा ? प्रश्न अनुत्तरित ठेवून चर्चा सत्र पहात होतो. इतक्यात दारावरची बेल वाजली. दार उघडले तरं माझा शेतकरी मित्र उदय दरवाज्यात उभा . उदय गेली क्रित्येक वर्ष शेतीमध्ये कष्ट करत होता नजरेनेच त्यांला आत यायला सांगितले. कुठल्याश्या गरीब शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी मदत मिळावी म्हणून एका सामाजिक संस्थेतर्फे निधी सन्कलनाचे फॉर्म त्याचेकडे होते. त्याच्या संस्थेने त्यांना ते निधी संकलनासाठी दिले होते.
" राहुल आम्ही एका सामाजिक संस्थेसाठी मदत गोळा करत आहोत "
तो माहिती देता देता बोलला .
त्याची परीक्षा घेण्यासाठी मी बोललो
"काय करते काय ही संस्था ? "
तो पूर्ण अभ्यास करून आलेला होता
"अरे समाजात जे गरीब शेतकरी आहेत त्यांना जर कर्ज फेडता आले नाही तरं ही संस्था त्यांच्या साठी काम करते "
"खूप छान काम करताय तुम्ही मग किती पैसे देऊ ? '
मी विचारताच लगेच तो बोलला
" फक्त दहा रुपये दे "
मी म्हणालो
"इतकेच ? ? इतक्याने कसे बरे होणार रे ते ? "
तो म्हणाला
"राहुल खूप लोकं या जगात चांगली आहेत त्या प्रत्येकाने जर फक्त दहा रुपए दिले तरी या सगळ्या गरीब शेतकऱ्यांचे कर्ज फिटेल "
त्याचा तो निरागस चेहरा आणि निरागस आत्मविश्वास पाहून मी त्याला वीस रुपए दिले. त्याला खुपच आनंद झाला तो माझ्या सह्या घेवून पुढच्या चांगल्या माणसाच्या शोधात निघून गेला.
मी मात्र विचारात पडलो. प्रत्येक चांगल्या माणसाने फक्त दहा रुपए दिले तरी गरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल पण तरीही हे होताना दिसत नाही असे का व्हाव ही इतकी चांगली माणसं या जगात आहेत. त्यांना देणग्या देणे शक्यही आहे पण मग तरीही शेतकरी कर्जफेडीसाठी आत्महत्या का करतात ? कर्ज फेडीसाठी का झगड्तात. ? या एवड्या चांगल्या माणसांचे पैसे जातात कुठं ? ? ?
आणि मी झोपेतून जागा झालो
चर्चा सत्र संपून टी वी वर मुख्य बातम्या लागल्या होत्या. वृत्तनिवेदिका निर्विकार चेहेर्याने एक बँक बुडाल्याची बातमी सांगत होती. आणि त्या शेतकऱ्याच्या कल्पनेतली बरीचशी "चांगली माणसं" पैसे बुडल्याने ओक्साबोक्शी रडत होती.
© श्री. राहुल दत्तात्रय राजोपाध्ये
1073, नरसोबा गल्ली, तासगाव
ता. तासगाव जि. सांगली
9130215836
rdrajopadhye@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने