नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काळ्या काळ्या ढगांतून,निघू दे विमान माझे
निळ्या निरभ्र आकाशात,होऊ दे भ्रमन माझे ||ध्रु||
ऋतू पावसाळी आला,सारे लुटून गेला
थेंब थेंब त्याचा,दाण्यांस छळून गेला
सरींनी अतिव्रुष्टीच्या,भिजेल सरण माझे ||१||
श्रावणाने काम केले,ग्रिष्मासमान पेटायचे
जख्मी पंख म्हणे तुझे,नाही आता उडायचे
हारलेल्या राजावानी,आत्मदहन माझे ||२||
अटींत फसवून मजला,बँक कर्ज देती
सावकार म्हणतो,लिहून दे पहिले शेती
कर्जा तुझ्याचपायी,शेत गहाण माझे ||३||
सोनुली म्हणते बाबा,चाबीची बाहुली आणा
सांगू कसे तिला मी,घरी खायला नाही दाणा
अर्थ दरीचे राहू केतू,सुटू दे ग्रहण माझे ||४||
कर्जमाफी नको अम्हाला,भाव रास्त हवा
औषधी,खत,बियाण्यांचा,खर्च अवाक्यात हवा
क्रुषी साम्राज्याचे माझ्या,झाले पतन सारे ||५||
अस्मानी सुलतानी,किती वादळे येती
हीच का रे !नभा धरेवर,तुझी बेवफा प्रीती
झेलून वादळांना ,करीन मार्गक्रमण माझे ||६||
-राजेश जौंजाळ पोहणा(हिंगणघाट)
************************************
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने