![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
उभं पीक पाण्यासाठी...
अवंदाच्या सालामध्ये
नाही पाणी बरसलं।
उभं पीक पाण्यासाठी
किती बाई तरसलं।
भुई होईन गर्भार
पीक येईन कोवळे।
येई रोहिणी मिरुग
तिचे पुरवी डोहाळे।
येई आनंदी श्रावण
तिला झुलविण्या झुले।
पण गत यावेळची
तिचे हात नाही ओले।
तिच्या आसवे डोळ्यात
नाही मन हरकलं।
उभं पीक पाण्यासाठी...
बाळ ओटीशी बांधून
आता फिरते ती आई।
थडगी पोटाची भराया
किती झुरते ती भुई ।
शाप मिळे वार्धक्याचा
गरगरते ती माई।
तळहाताच्या रेषाले
किती गोंजारते बाई।
भोग तसेच माथ्याचे
जिणं पुढं सरकलं।
उभं पीक पाण्यासाठी...
चित्रा सुधीर कहाते
नागपूर
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
अप्रतीम रचना!!!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
खुप्पच छान रचना
तळहाताच्या रेषाले किती गोंजारते बाई.
हि अतिशय सुंदर ओळ.
Narendra Gandhare
खुप्पच छान रचना
तळहाताच्या रेषाले किती गोंजारते बाई.
हि अतिशय सुंदर ओळ.
Narendra Gandhare
पाने