नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पोषणकर्त्याला कुठवर दारिद्र्य पांघराव लागेल ।
ओंजळीभर सुख जुने मनामध्ये अंथरावं लागेल ।।१।।
अन्नधान्य पीकवून किती पोसत बसायचे जगाला ।
जन्मो जन्मी तुला असं उपास पोटी मरावं लागेल ।।२।।
तिजोरीत त्यांच्या कुठवर भरशील तुझ्या स्वप्नाना ।
शोधण्यासाठी व्याकुळ होवून तुज हंबरावं लागेल ।।३।।
श्रध्देच्या बाजारात कसा खुंटलास भोळ्याभक्ता ।
माजल्या तणासाठी औषध जहाल वापरावं लागेल ।।४।।
हक्क देत नसते कुणी घ्यायचे असते हिसकावूनी ।
कळस गाठण्यासाठी घाटमाथ्यातून चढाव लागेल ।।५।।
कर्जमुक्त जगण्यासाठी कुठवर होतील आत्महत्या ।
दोन हात करून मरण्यास शस्त्र नव धरावं लागेल ।।६।।
व्यवस्था मिळत नाही अशी करशील कधी निर्मीती ।
जोमदार पीक घेण्या व्यवस्थेलाच नांगरावं लागेल ।।७।।
प्रतिक्रिया
व्यवस्थेलाच नांगरावं लागेल!
खुप छान गज़ल धिरजकुमार..
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
नांगरणी
व्यवस्था मिळत नाही अशी करशील कधी निर्मीती
जोमदार पीक घेण्या व्यवस्थेलाच नांगरावं लागेल।
क्रांतिकारी कारी असे कव्य!
Pradip
पाने