नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पाड पाऊस रानात ...!
भेगा पडल्या माईला , च s s र्र होतं बा मनात
कसा निष्ठूरला देवा , पाड पाऊस रानात ...!
धूळ-पेरणीत मव्हा , जीव रुतला रिनात ,
दुबारीच्या पेरणीला , पाड पाऊस रानात ...!
किडू-मिडूक इकून , खात आणला उन्हात ,
नगं पोटावर मारू, पाड पाऊस रानात ...!
वारी तुही कोरी गेली, बोल घुमले कानात ,
पांडुरंगा इठ्ठला बा, पाड पाऊस रानात ...!
आज आखादीचा सण, कसा पोळतो वनात,
नको अंत आता पाहू, पाड पाऊस रानात ...!
जनावरा माणसाला, पाणी नाही धरणात ,
त्येला बक्कळ यायला, पाड पाऊस रानात ...!
तुह्या दरी आलो देवा, धन्य व्हाया मरणात,
लेकी-बाळीसाठी तरी, पाड पाऊस रानात ...!
कवी श्रीदास
प्रतिक्रिया
सुरेख कविता.
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
छान
छान
लाजवाब!
वा!
हेमंत साळुंके
मस्त.....
सुरेख ..
आर्त कविता ! !
आर्त कविता ! !
राजीव मासरूळकर
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण