शेतकऱ्याचे पोरं आम्ही
शेतकऱ्याचे पोरं आम्ही
मातीवानी काळे आम्ही खरपावानी गोर
शेतकऱ्याचे पोरं आम्ही शेतकऱ्याची पोर
मातीविणा कामधंदा नस्तो आमचा दुसरा
कावरात ओतू रक्त उघडू डोळा तिसरा
हेचि अस्ते ध्येय आमचे हाच असतो घोर
शेतकऱ्याचे पोरं आम्ही शेतकऱ्याची पोर
आऊताच्या जूवानीला बांधू झुला पाखराचा
आतड्याले देवू पीळ आम्ही पाय पोळण्याचा
बैलाच्या बी जिवाले असतो आमचा घोर
शेतकऱ्याचे पोरं आम्ही शेतकऱ्याची पोर
गगणात भरारी घेईल पाखरांचे पंख
पाठीवर सोसू आम्ही क्रूर उन्हाचेही डंख
सुर्व्याले बी दाखवीन मनगटाचा जोर
शेतकऱ्याचे पोरं आम्ही शेतकऱ्याची पोर
कपाळीच्या कुंकावानी आमचं सारं जगणं
रात्रंदिस कुंकासाठी असते व्यथा भोगणं
ललाटाच्या भाळावर लिहून ठेवलं थोर
शेतकऱ्याचे पोरं आम्ही शेतकऱ्याची पोर.
- आशिष वरघणे
रा. सिरूड पो. वेळा त. हिंगणघाट जि. वर्धा
पिन. ४४२३०१
मो. ९३५९६७९०९३
wh. 9637813506
- Read more about शेतकऱ्याचे पोरं आम्ही
- Log in or register to post comments
- 8 views
