बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥
श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबईले, लुगडं घेऊन गेला
त्याले वाटलं मायबाप, भलते गरीब असन
म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते
म्हून त्यानं कपड्याचा, थैला भरून नेला
जुहूच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली
तिले पाहून शाम्याची, बंदी विकेट गेली
तिले म्हणे चोळी घाल, घे लुगडं नेसून
थ्ये म्हणे आवमाय, हे भूत आलं कुठून?
मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरू झाला
लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे
मंग श्याम्या धावे मांगं, आनं थ्ये पुढं पळे
वन्समोअर,वन्समोअर, लोकं भाय बोंबले
कॅमेरेवाले पोझ घेऊन, कॅमेरे रोखून थांबले
पोलीसायनं बैनमाय, नावकूल विचका केला
आनं त्याच्या पुढचा एपीसोड, राहूनच गेला
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
एकवीस/एक/दोन हजार दहा
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
=÷=÷=÷=÷=
ढोबळ मानाने शब्दार्थ :-
इचीबैन, बैनमाय = च्यायला सारखे.
वाढलीहूढली = वयात आलेली. बंदी = पूर्णं,संपूर्ण.
आवमाय = अगबाई, मांगं = मागे नावकूल = पुर्णपणे.
=÷=÷=÷=÷=
प्रतिक्रिया
फेसबुक प्रकाशित लिन्क
https://www.facebook.com/gangadharmute/posts/1814626911895322
शेतकरी तितुका एक एक!
फेसबूक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid02KunZiA4t12EVZTgGJEpP...
शेतकरी तितुका एक एक!
व्वा सर खूप जबरदस्त
व्वा सर
खूप जबरदस्त
सतिशगुमालवे
आभार
आभार
शेतकरी तितुका एक एक!
पाने