नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
" रोपटे "
अंगणात लाविले मी
छोटे एक रोपटे
काळजीने रोज त्याला
वाढविले नेटके
रोपट्याचे झाले आता
मोठे जरा झाड
फुले फळे लागली नि
सावली देते गाढ
जीव दिला जिवाला की
हर्ष होतो फार
छोटे एक काम माझे
मोठे करते यार !
वेळेवर पाणी त्याला
देणे आपुल्या हाती
बाकी काम पोसण्याचे
करतेच की हो माती !
- मुक्तविहारी ,
ई : १२/७२, थर्मल काॅलनी,
परळी वैजनाथ - ४३१५२०.
मो. ९८६०९८५९११.
ईमेल : muktvihari@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने