![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आलो देवा सारे l सोडुनिया पाश l
धरुनिया आस l पावसाची l l
मुक्या दावणीला l नाही देवा पाणी l
धाव घेई रानी l खळाळुनी l l
घेई देवा आमुचे l पाप ओटीमध्ये l
मार पाठीमध्ये l नको पोटी l l
किती देवा केला l तुझा जयघोष l
तरी का रे नाश l नशिबाला l l
टाळ मृदंगाचे l सरले ना त्राण l
कनठाशी प्राण l आले देवा l l
उठी उठी विठु l होई आता थेंब l
मातीतले कोंब l करपले l l
जर तुला नाही l व्हायचे रे मेघ l
मातीतली भेग l मिटविण्या l l
तर मज नाही l जायचे माघारी l
तुझ्या मज दारी l ठेवायचे प्राण l l
प्रतिक्रिया
सुरेख काव्य
सुरेख काव्य.
शेतकरी तितुका एक एक!
पाने