नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्याशिवाय निभाव नाही
मी आहे हाडाचा शेतकरी पोशिंदा राजा
माझे अस्तित्व नाही असे एकही गाव नाही
साऱ्या दुनियेला जगवीतो मी मात्र
या स्वार्थी जगात माझे येथे नाव नाही
ऊन नाही तहान नाही ना ओला ना कोरडा
घामाने भिजवितो दुष्काळात सारे रान
कष्टाचा डोंगर जवा रचतो माथ्यावर
घराघरामध्ये राहते माझं पिकलेले धान
माझ्या काळ्या मायच्या कुशीत वखर फिरतो
तिच्या उदरात नांगराचा मात्र घाव नाही
किती सोसावं सोसावं जगण्याचे हे मंतर
श्रीमंतीच्या बाजारात मात्र शेतमालाला भाव नाही
जुनाट पाने गळून जेंव्हा नवी पालवी फुटू लागते
मातीमध्ये बीजाला वर येण्यासाठी दान मिळते
जेंव्हा शांत जगाच्या घामाचा उडून जातो विश्वास
हिरवा अंकुर उगवण्याचे बीजाला वरदान मिळते
या पैशाच्या काळ्या दुनियेत अजून कमावण्याची
कधी सुटणार तुमची हाव नाही
कितीही कमावले तरीही या जगात
शेतकऱ्याच्या अन्नधान्याशिवाय कोणाचा निभाव नाही.
प्रतिक्रिया
लेखनस्पर्धा
अतिशय छान उपक्रम आपण हाती घेतला आहे. सकारात्मकरित्या संपूर्ण वाटचाल चालू आहे.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
पाने