नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
'कोरोना व्हायरस'
इथल्या वटवाघुळी व्यवस्थेच्या संक्रमणातून
आजवर कुणबी बापाच्या
उद्ध्वस्त झालेल्या
कित्येक पिढ्यांना जडलेला
कोरोना व्हायरस
एक दुर्दम्य वँक्सिनहीन आजार...
नापिकी, दुष्काळ, शेती सुविधांचा अभाव,
उत्पादन आणि उत्पादन खर्चातील तफावत
अशा अनेक समस्या
वेळोवेळी केल्या गेल्या सेनेटाईज
पद्धतशीरपणे इथल्या व्यवस्थेकडून
हॉटस्पॉट एरियात...
पांढरपेशी व्यवस्थेला कुरवाळत
नेहमीच पाळलं गेलं
इथे कुणब्यांंसोबत
सोशल डिस्टनसिंग...
अन् त्याच्या सर्दलेल्या
अर्थनाशिकेतील स्वँब घेऊन
केली गेली त्याच्या
सोशीक सहनशील
मानसिकतेची एंटीजन टेस्ट...
कर्जात रुतत गेलेला
कास्तकार बाप
कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट यावा तसा
उपरण्याचा मास्क
तोंडाभोवती गुंडाळून
बँका सावकारांच्या देण्यापाई
नेहमीच होत आला
कोरोन्टाईन रानावनात
अन् झाला लोंबता झाडाच्या फांदीवर
नेहमी सारखंच
इथलं संवेदनशील शासन
घोषित करत आलंय
कंटेनमेंट झोन
त्याच्या मृतदेहाभोवती...
संजय आघाव
मु दौनापूर ता.परळी वै.
जि.बीड
9405351480
aghavsanjay10@gmail.com
प्रतिक्रिया
व्वा !
निव्वळ अप्रतिम !
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद सरजी...!
धन्यवाद सरजी...!
संजय आघाव
अप्रतिम कविता
मुक्तविहारी
अप्रतिम कविता
अप्रतिम कविता सरजी!
मुक्तविहारी
तुमचे आणि बालाजी कांंबळे
तुमचे आणि बालाजी कांंबळे सरांचे खूप खूप सहकार्य लाभले,त्याचे हे फलीत सर..तुम्हा दोघांंचेही खूप खूप धन्यवाद..!
संजय आघाव
व्वा..अप्रतिम रचना सरजी.
व्वा..अप्रतिम रचना सरजी.
दिवाकर जोशी
आपलेखूप खूप धन्यवाद सरजी...!
आपलेखूप खूप धन्यवाद सरजी...!
संजय आघाव
आपले खूप खूप धन्यवाद सरजी...!
आपले खूप खूप धन्यवाद सरजी...!
संजय आघाव
अप्रतिम रचना सरजी.
अप्रतिम रचना सरजी.
आपले खूप खूप सहकार्य लाभले
आपले खूप खूप सहकार्य लाभले लाभत आले आहे सर... मनपूर्वक धन्यवाद...!
संजय आघाव
खुपच छान रचना सर.
खुपच छान रचना सर.
खूप खूप धन्यवाद सरजी...!
खूप खूप धन्यवाद सरजी...!
संजय आघाव
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
खूप खूप धन्यवाद सरजी...!
खूप खूप धन्यवाद सरजी
संजय आघाव
खूप खूप धन्यवाद सरजी...!
खूप खूप धन्यवाद सरजी
संजय आघाव
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण