नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
स्पर्धेचा विषय- शेती आणि कोरोना
बंद झाली शहरे बंद झाले गाव,
गरीबाच्या भाजीला मिळेना तो भाव.
भाजी माझी बाजारी मला नेता नाही आली
गिर्हाईक शोधता शोधता ती कुसूनही गेली .
जगणं माझं अवघड वाटत होतं मला
व्यथा माझी मी, सांगू कशी रं कोणाला
पावसाच्या सरींवर मी दुसरं पीक घेतलं
भात शेती केल्यावर मनातलं दुःख मात्र आटलं.
खते मला विकतची आणता आली नाही
पण शेणखतांनी हिरवळली, माझी शेती सर्व काही.
नैसर्गिक खतांचा वापर, पुन्हा एकदा उजळला.
आलेल्या संकटा मागचा दैवी डाव मला कळला.
केलं सर्व काही तरी पैसा नव्हता हाती
दोन म्हशीच्या दुधाची, साथ झाली मोठी
गावातच माझ्या जाऊन ते लागलो मी विकायला
मृत्यूच्या या दाढेतही शिकत होतो जगायला
नुकसान झाले खूप पण मी निर्धार एक केला.
कोरोनाच्या महामारीत जगून दाखवायचं या जगाला .
उभं राहून निधड्या छातीने सांगेन प्रत्येक संकटातही,
लढेन शेवट पर्यंत कारण अजून हरलो मी नाही.
✍️ -कु.विशाल मराठे
तालुका-कणकवली, जिल्हा -सिंधुदुर्ग
गाव -दिगवळे(बामणदेवाडी)
ई-मेल-
vishalmarathe707@yahoo.com
संपर्क: 9881616809
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने