तू जाण माणसा, सुजान माणसा.
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा.
शेतकऱ्याची बैलगाडी
लुळी - पांगळी झाली,
वादळ वारा काळ पेटला
कोणी नाही वाली.
अश्रृ ढाळतो शेतकरी, दया न माणसा.
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा.
खेळ मांडुनी क्लृप्त्यांचा
करणी केली मोठी,
पांढरपेश्या कावळ्यांनी
धरणी केली खोटी.
अन्यायाने घोट घेतला, छान माणसा.
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा.
लय वज केली मातीची
छातीला लावुनं,
आयुष्याची माती झाली
शेतीला वाहूनं.
शेतकऱ्यांची सुळावरती, माण माणसा.
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा.
शेतकऱ्यांच्या कामकऱ्यांच्या
घामाचे खाऊनं,
मातीला ही विसरूण गेले
एसीतं राहूणं.
शेतकऱ्याचे नाही कुणाला, भान माणसा.
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा.
भूमातेच्या पदरी केली
शेती लाजवंती,
ओठ आपले हाय म्हणावे
आपल्याच दंती.
शेतकऱ्यानी काय करावे, दान माणसा?
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा!
• कवी •
डॉ. रविपाल भारशंकर, हिंगणघाट जि. वर्धा.
प्रतिक्रिया
सुंदर
सुंदर
Thanking you
Thanks
Dr. Ravipal Bharshankar
वास्तववादी कवीता सुजान मानसा
वास्तववादी कवीता सुजान मानसा
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
Thanking you
Thanks
Dr. Ravipal Bharshankar
सुरेख कविता
सुरेख कविता. पुढील लेखनास शुभेच्छा!
बहुधा तुम्ही वर्धा किंवा नागपूर संमेलनात सादर केली होती, असे आठवते.
सादरीकरण सुद्धा उत्तमच झाले होते.
शेतकरी तितुका एक एक!
अत्यंत आभारी आहे सर!
मी ही कविता वर्धेत सादर केलेली. आपल्या पहिल्या अ. भ. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात.
Dr. Ravipal Bharshankar
माणसा
सुजान माणसा एक नंबर डाॅ.साहेब
धन्यवाद गांधीजी !
Dr. Ravipal Bharshankar
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण