Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

आयुध

Main page content

By rajendraphand | 9:58 AM IST, मंगळ November 14, 2023
कवितेचे रसग्रहण

 आयुध. ..

 

रानी सुगीचा नासवा 

पिक पाखरा फसवा

नांदलेली ओली मेंदी

थोडी माहेरी पाठवा

 

किती रापली धुपली

रान रती ती थकली

वेळ भुकेची हिरवी

कळ देऊन पोसली

 

दर वेळच्या खेपेला

डाव पडतो रडीचा 

किती वेळा वर्षातून

गर्भ उकलु मातीचा

 

साता दिसातून फेरा

बुरशी हटवण्या नवा

गेली पॊताची ती रया 

हर हंगामाला  दवा

 

कूस मातीची निझूर

वांझ माऊलीची दाई 

तिला नाही दयामाया

हिर्व्या लेकराची खाई

 

वय होण्याआधी बये 

झाली कशी तु वांझुटीं 

बाप भुकेचा रडतो

डोळा आसवांची दाटी

 

तुझा रानपाला तुला

हर खेप जडीबुट्टी

हिर्वा फ्राय् खाऊनिया

नको करु नट्टीपट्टी 

 

पिढ्या पिढ्याची ही ठेव

तिला जपावे सावध

बळीराजा तुझ्या हाती

नाही दुसरे आयुध.

 

 कवी. यशवंत पुलाटे , दाढ ता. राहाता जि. अहमदनगर.

मो. 9657867499.

 

             कवी यशवंत पुलाटे हे अतिशय संवेदनशील मनाचे कवी आहे. आज स्वतःच्या  पायाने त्यांना  चालता येत नसले तरी अर्थपूर्ण  कवितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कवींना कवितेच्या प्रवासातून  मागे टाकले आहे.  कवी कुसुमाग्रज यांचे ते आवडते शिष्य आहेत. आज त्यांच्या कवितेच्या धूनने प्रवरा कम्युनिटी रेडिओच्या  माध्यमातून  दररोजची अहमदनगर जिल्ह्याची सकाळ उगवते. 

                 त्यांची आयुध नावाची कविता वाचण्यात आली अन् शेती आणि शेतकरी व शेतकऱ्यांची लक्ष्मी  यांचे यथार्थ चित्र त्यांनी माझ्या डोळ्यासमोर  उभे केले. व या कवीतेवर रसग्रहण करण्याचा  मला मोह झाला. 

                आपल्या कवितेच्या पहिल्या 2 ओळीत ते म्हणतात.

            रानी सुगीचा नासवा 

           पिक पाखरा फसवा 

           नांदलेली ओली मेंदी

            थोडी माहेरी पाठवा

शेतकरी मन लावून पेरणी करतो. निसर्ग ही त्याला चांगली साथ देतो. पीक डोलारून भुईवर येते. आता ते पोटऱ्यात येते . कणसात दाणे भरायला सुरुवात होते. साऱ्या पक्षाला सांगावा जातो की यंदाची सुगी चांगली बहरली आहे. ते ही इतर पक्ष्यांना सांगावा  सांकेतिक भाषेत देतात की आमच्या परिसरात पिक चांगली बहरलीत. तुम्ही ही या. आपण सगळे मिळून या वर्षी तृप्तीचा ढेकर देवू.  तर शेतकरी ही मनात इमले बांधतो. या वर्षी सुगी चांगली होते आहे. लेकीच लग्न करू.  मुले , पाहुणे रावळे, घरधनीनीला चांगले कपडे, साड्या घेवू. लग्न या पिकावर केल्यावर  पाहुण्यांना विनंती करू की नांदायला गेलेल्या नव्या नवरीला  थोडे दिवस माहेरी पाठवा. तीला चांगल गोडधोड करू.  चांगल माहेरपण करू. अशा स्वप्नांचे इमले  तो दररोज घरात चर्चा करत बांधत असतो, रचत असतो. आणि अशातच अवकाळी पावसाला सुरूवात होते आणि होत्याचे नव्हते होते. बळीराजाच्या सप्नाचा चुराडा होतो. पाखरांनी ही सर्वांना दिलेले निरोप फसवे होतात.

                  किती रापली धुपली

                  रान रती ती थकली

                   वेळ भुकेची हिरवी

                   कळ देऊन पोसली

                               कवी  भूमातेबद्दल या ओळीत लिहितात की बळीराजाने पुढील पिकासाठी  मशागतीच्या वेळी  रान नांगरतांना ती वेदनेने थकून जात आहे.तसेच उन्हामुळे किती  रापते आहे. उन्हाच्या झळयामुळे धूपली जात आहे. पण बीज पेरल्यानंतर मात्र  हिरवा शालू नेसण्यासाठी ती स्वतः कळा देवून पिकांना पोषित असते.

                       दर वेळच्या खेपेला

                       डाव पडतो रडीचा 

                       किती वेळा वर्षातून

                        गर्भ उकलु मातीचा

                                आपल्या कवितेच्या पुढच्या ओळीत बळीराजाच्या दैन्यावस्थेस कारणीभूत ठरणाऱ्या विविध प्रसंगाबद्दल बोलतांना कवी म्हणतात की  बळीराजाच्या इतका सोशिक माणूस कुणी नाही. उत्पन्ना पेक्षा जास्तीत जास्त वेळा घाटा सोसणारा कोण असेल तर तो म्हणजे फक्त  बळीराजाच आहे. कधी पावसाच्या  कमतरतेमुळे, कधी अतिरिक्त पावसामुळे, कधी रोगराईमुळे , कधी वाईट हवामानामुळे जमिनीच्या बाहेर आलेली पिके उमलायच्या आतच  नाईलाजाने माना टाकायला लागतात. पिकांची ही स्थिती पाहून जसे  घरातील प्रिय व्यक्ती गेल्याची वेदना होते तशी  ही वेदना बळीराजाची होते. आणि शेवटी  कितीक दुःख करत बसणार म्हणून पुढच्या पिकासाठी मातीच्या गर्भातून उकलू पाहणाऱ्या अर्धमेल्या गर्भावर स्वतच्या हाताने दुःखी अंतकरणाने नांगर फिरवतो. 

                   साता दिसातून फेरा

                   बुरशी हटवण्या नवा

                    गेली पॊताची ती रया 

                     हर हंगामाला  दवा

                             आताच्या शेतीबद्दल भाष्य करतांना कवी म्हणतो आता शेती करणे म्हणजे जुगार झाला आहे. कधी हवामान बदलेल रोगराई येईल हे सांगता येत नाही. या वाईट हवामानामुळे पिकावर सतत बुरशीजन्य आजाराचा धोका वाढतोय. इतका की आठवड्यातून एकदा तरी सर्व पिकाला येढा द्यावा लागतो. याचा परिणाम असा झाला आहे की मातीची उपजावू क्षमताच कमी कमी होत गेली आहे. एखादी कुपोषित बाई पाहिल्यावर जशी तिच्या अंगातली  रया गेल्यासारखी दिसते तद्वतच अवस्था धरणीमातेची झाली आहे. एके काळी एक दाणा पेरला तर आधोलीभर  उत्पादन होत होते तेच आज या रोगराईमुळे पसाभर होणे  दुरापास्त झाले आहे. आज असा एक ही हंगाम नाही की  पिकाला फवारणी करावी लागली नाही. 

                        कूस मातीची निझूर

                        वांझ माऊलीची दाई 

                        तिला नाही दयामाया

                        हिर्व्या लेकराची खाई

                              पुढच्या ही ओळीत कवी  म्हणतो स्वतः ला शेती तज्ञ म्हणवणारे की ज्यांनी कधी शेती ही केली नाही. असे  "वांझ माऊलींच्या दाई" उदाहरणार्थ  दाई म्हणजे जिला स्वतः ला कळा घ्यावयाच्या नसतात पण ती  बाळंतिणीला अशा कळा घे, तशा कळा घे असा सल्ला देत असतात. तशाच पद्धतीचा सल्ला हे कीटकनाशक वापरा, हे रासायनिक खते वापरा हा सल्ला आताचे आधुनिक शेतीतज्ञ  देतात.आणि बळीराजा ही त्यांचा सल्ला ऐकतो. पण हे शेतीतज्ञ जागतिक भांडवलदारांच्या सल्ल्याने जास्तीत जास्त कमिशन मिळवण्यासाठी  रासायनिक खते व कीटकनाशके वापरण्याचा सल्ला बळीराजा यांना  देतात. यांच्या सल्ल्या घेतल्याने  तात्पुरते उत्पन्न वाढते. मात्र हळूहळू  मातीची कुस निझुर होत राहते. शेतीला मारलेल्या  कीटकनाशकाला काही दयामाया नसते.  तणाबरोबर ते लहान लहान हिरव्या पिकांना ही मारून टाकते. 

                   वय होण्याआधी बये 

                   झाली कशी तु वांझुटीं 

                   बाप भुकेचा रडतो

                   डोळा आसवांची दाटी

                            आता कवी धरणीमातेला उद्देशून म्हणतो  हे माते  या रासायनिक खते,  तसेच आधुनिक बियाणामुळे पिकावरील विविध आजारांच्या साथीमुळे कीटकनाशके यांचा  सतत वापर यामुळे पहिला परिणाम बळीराजावर सुध्धा होतो. त्यामध्ये मळमळ, चक्कर येणे ,  त्वचेवरील जळजळ,  तीव्र डोकेदुखी व इतर ही अनेक लक्षणे सुरू होतात. कधी कधी बळीराजा यांच्या शरीरात हे कीटकनाशक  अनावधानाने जावून मृत्यू ही ओढवतो.  दुसरा परिणाम  मातीतील  सूक्ष्म अन्नघटक जे पिकांच्या वाढीसाठी , अधिक उत्पादनासाठी , प्रतिकारक्षमता  वाढीसाठी उपयुक्त असतात ते  यांच्या सततच्या वापरामुळे  नष्ट होत आहे. त्यामुळे उत्पन्नाचे प्रमाण घटते आहे. काही ठिकाणी उत्पन्नच मिळत नाही. कवी याला  हे धरणीमाता   तू  वय होण्याआधीच वांझोटी झाली आहेस. अशी उपमा देतात.  व त्याचा परिणाम म्हणजे आज बिचारा बळीराजा भुकेने रडतो आहे. आसवांनी त्याच्या डोळ्यात दाटी केली आहे.

                     तुझा रानपाला तुला

                     हर खेप जडीबुट्टी

                    हिर्वा फ्राय् खाऊनिया

                    नको करु नट्टीपट्टी

                               येथे कवी बळीराजाच्या शब्दात  म्हणतो.वनस्पतिजन्य कीटकनाशके किंवा नैसर्गिक कीटकनाशके ही सेंद्रिय आणि नैसर्गिक कीटकनाशके आहेत जी वनस्पती आणि खनिजांपासून बनविली जातात, ज्यात नैसर्गिकरित्या बचावात्मक गुणधर्म असतात . या प्रकारची कीटकनाशके वापरली गेली पाहिजे. कारण ते  विघटित झाल्यामुळे विषारी पदार्थ सोडत नाही. उदा. शेताच्या बांधावर पूर्वी रुई वाऱ्याच्या बाजूने लावल्या जात. त्यातून आलेल्या वाऱ्याने पिकावरील माव्यासारखे रोग नष्ट होत असे. पुदिना या वनस्पतीच्या वाळलेल्या पानांची भुकटी भुंगेरे नियंत्रणासाठी वापरत.वनस्पतीजन्य औषधांमुळे मात्र मधमाशीवर चांगला परिणाम दिसून येतो, ही औषधे पर्यावरणपूरक असल्यामुळे जीवसृष्टीला याचा धोका नसतो व यामुळे या औषधाच्या फवारणीनंतर मधमाशी पिकांकडे आकर्षित होते परिणामी पिकांची फलधारणा वाढते. याबरोबरच शेवरी, एरंडी व इतरही अनेक बांधावरील  वनस्पती  ही रोगराई नष्ट करीत असते. पण आता शेतीचे विभाजन वाढल्याने कमी कमी जमीन वाट्याला येत असल्याने बांध ही कमी झाले आहेत. व बांधावरील ही किडीला, रोगांना  पळवून लावणारी ही झाडी ही नष्ट होत चालली आहे.  एव्हढे सगळे  उपाय असतांना या कीटकनाशकांची मलमपट्टी करून स्वतःचा नट्टापट्टा नको आहे. अशा प्रकारची जनजागृती बळीराजामध्ये होत आहे. 

                

              पिढ्या पिढ्याची ही ठेव

              तिला जपावे सावध

              बळीराजा तुझ्या हाती

              नाही दुसरे आयुध.

 

                       शेवटी कवी बळीराजाला  म्हणतो की अनेक पिढ्यांपासून चालत आलेलं हे जैविक शेतीच तंत्रज्ञान वापर. त्याला जपून ठेव. वरील नैसर्गिक वनस्पती व खानिजापासून बनविलेले कीटकनाशक वापर.  थोडे उत्पन्न कमी मिळेल. पण विषमुक्त अन्न तुम्हाला खायला मिळेल. तुम्ही आम्ही सर्व निरोगी आयुष्य जगू.  बळीराजाच्या हाती आता हेच जैविक शेती नावाचा आयुध शिल्लक आहे त्याचाच वापर नियमितपणे व्हावा.

               

                  शब्दांकन :- राजेंद्र फंड, मू. पो. ता. राहाता जि. अहमदनगर. मो. 9881085671.

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

मंगळवार, November 14, 2023 - 18:11
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

 

  • Log in or register to post comments
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 09:05
Permalink
New

लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5546 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,356 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,231 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,268 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,047 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,500 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,404 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,223 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,881 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,116 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,018 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,438 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,294 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,272 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,644 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,286 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,378 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 1329 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    9 hours 34 minutes ago
  • धन्यवाद
    9 hours 35 minutes ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    11 hours 14 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    11 hours 17 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    11 hours 19 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
आजचे शेतमालाचे बाजारभाव 1,304
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 270
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 153
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 122
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 120
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 116
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 109
माझे फेसबूक स्टेटस - 2 108
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 94
किती चाटणार भारतपुत्रा? 86
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 81
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 72
विचारपूस 59
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 58
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 57
कापला रेशमाच्या सुताने गळा 50
पोळ्याच्या झडत्या 46
उद्देश आणि भूमिका 44
नागपुरी तडका - ई पुस्तक 42
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 41
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,114
माझे फेसबूक स्टेटस-1 181,059
शुभारंभ 134,974
रानमेवा - भूमिका 109,399
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,535
आजचे शेतमालाचे बाजारभाव 94,456
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,554
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,082
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,645
उद्देश आणि भूमिका 77,661
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 74,101
विचारपूस 71,913
गणपतीची आरती ॥३५॥ 67,899
सत्कार समारंभ : वर्धा 66,758
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,370
किती चाटणार भारतपुत्रा? 62,071
जात्यावरची गाणी 56,060
माझे फेसबूक स्टेटस - 2 50,117
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,098
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,476
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini