Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

कवितेची जन्मकथा- विठ्ठल वाघ ह्यांची तिफन

Main page content

Kiran dongardive
By Kiran dongardive | 11:25 PM IST, सोम September 06, 2021
कवितेचे रसग्रहण

कवितेची जन्मकथा : विठ्ठल वाघ ह्यांची 'तिफन'
कविता हा प्रकार खरं म्हणजे माणसाच्या अगदी बालपणापासून सोबत करत असतो. पाळण्यात अंगाई गीत ऐकत झोपण्यापासून सुरू झालेला हा प्रवास जीवन भर आपल्या कळत न कळत सुरू असतो, कधी कविता कधी गाणी... भाषेचे बंधन नाही... काव्याचा तीळमात्र संबंध नसलेले लोक गावातील भजन ओव्या अभंग ह्यात रममाण होत असतात किंवा बारी ह्यात बेहोष होत गात असतात किंवा दादा कोंडकेच्या गाण्यापासून ते ग्रेसच्या ती गेली तेंव्हा पाऊस निनादत होता किंवा या जन्मावर ह्या जगण्यावर ऐकणारे लोक काव्य प्रेमीच असतात हे समजून घेतले पाहिजे. माझा काव्याचा नेमका संदर्भ कधी आला ते सांगणे कठीण कारण पहिलीत जाण्याच्या आधीही माझ्या कानावर बिनाका गीत माला किंवा जळगाव आकाशवाणी वरील आपली आवड मधील गाणी पडत असत. एखाद्या रविवारी गावाबाहेर वाहणाऱ्या स्वच्छ ओढ्याच्या काठाने कपडे घुण्यासाठी घेऊन बादली, व्हील साबण थोडासा निरमा वॉशिंग पावडर घेऊन दोन तीन लेकरांना घेऊन फिरणाऱ्या कष्टकरी आणि स्वावलंबी लोकांचा तो काळ होता. आमचे वडीलही कधी बधी आमची अशी दिंडी घेऊन निघत त्यावेळी आमच्या तीन भावाच्या पैकी कुणा एकाच्या हातात रेडिओ असे त्यावर बऱ्याच वेळा ऐकलेलं काळ्या मातीत मातीत हे गाणं मनात असच रुतून राहील. इयत्ता 9 वी मध्ये आल्यावर पद्य विभागात ते गाणं कविता म्हणून भेटल आणि विठ्ठल वाघ ह्या माणसाचं नाव माहीत झालं. मराठीला पिंपरकर म्हणून शिक्षक होते ते विठ्ठल वाघ ह्यांच्या बद्दल खूप सांगत. त्याच्या अकोल्याच्या घरावर एका बाजूला विठ्ठल आणि दुसऱ्या बाजूला वाघाचे चित्र आहे असे त्याकाळी ऐकत असे मात्र पुढे वयाचे बंधन विसरून काव्य क्षेत्रातील ही दिग्गज हस्ती माझ्या साठी काव्य प्रांतातील दिशादर्शक मित्र झाली. त्यांच्या घरी बराच वेळा गेलो. बांगड्याच्या काचेच्या तुकड्या पासून तयार झालेला मोर दिसला पण विठ्ठल आणि वाघाचे चित्र काही दिसले नाही.
सरांच्या योद्धा ह्या महत्वाकांक्षी खंडकाव्याची निर्मिती मी थोडीफार जवळून अनुभवली मात्र मला खरी उत्सुकता होती ती काळ्या मातीत मातीत ह्या गाण्याच्या म्हणजेच तिफन ह्या कवितेच्या निर्मितीची जन्मकथा समजून घेण्याची, आणि मग शेवटी सरांना फोन लावला आणि विचारले, "सर तुमच्या एखाद्या कवितेची जन्मकथा सांगा ना मला." अगदी काहीही आढेवेढे न घेता सर बोलले, “तरंग कवितेची गोष्ट आहे अकोला खामगाव रोड वर एका निवांत दुपारी एका तळ्यात एक वाळलेल झाडाचं पान पडलं आणि त्यात तरंग उठले आणि माझ्या मनात ओळ निर्माण झाली सार कसं सामसूम...!" मी सरांना पुन्हा बोललो, "सर तिफन बद्दल सांगा ना काही" त्यावर विठ्ठल वाघांनी जी तिफण ह्या कवितेची जन्मकथा सांगितली ती आवर्जून ऐकण्यासारखी आहे हे निश्चित. विठ्ठल वाघ हे पेशाने प्राध्यापक आणि शेतीमातीचा गंध जाणणारे आणि जपणारे कवी , त्यांचे मेव्हणे मुंबई येथे बँकेत एका मोठ्या पदावर कार्यरत असताना एकदा अकोला जिल्ह्यातील वाशीम (त्या वेळी वाशीम जिल्हा झाला नव्हता तर तो अकोला जिल्ह्यातील एक तालुका होता) भागातील रिसोड ह्या गावी तपासणीसाठी आले. तेंव्हा त्यांनी विठ्ठल वाघांना सोबत चालता का असे विचारले. इतर विशेष काम नाही, आणि बँक अधिकाऱ्यांच्या सोबत एक वेगळा अनुभव येईल म्हणून कवी विठ्ठल वाघ त्यांच्या सोबत गेले. तेथील एका शेतात प्रत्यक्ष फिल्डवर इन्स्पेक्शन साठी गेल्यावर शाखाधिकारी आणि अधिकारी ह्यांच्या कार्यालयीन गप्पा सुरु असताना विठ्ठल वाघ काळ्या मातीचे आणि त्या मातीत राबणाऱ्या कष्टकऱ्यांचे निरीक्षण करत होते. मूळ पिंड शेतीमातीचा आणि हिरव्या राना बद्दल अत्याधिक जिव्हाळा जोपासणारी व्यक्ती शेती मातीत रमणार नाही तर नवलच नाही का ? अशातच मंद वारा आला जवळच कोठेतरी पाऊस पडला होता त्यामुळे भिजलेल्या मातीचा सुगंध दरवळला. बघता बघता एक जोरदार सर समोरच्या रानात कोसळू लागली. मातीची नांगरून ठेवलेली ढेकळ मातीत विरघळू लागली. ज्या ढेकळातून थोड्या वेळा पूर्वी चालतांना ठेच लागली तर रक्त निघावे अशी स्थिती होती तीच ढेकळ भिजल्यामुळे लोण्याप्रमाणे मऊशार झाली आहेत असे कवीमनास वाटू लागले. ही अशी जाणीव होत असतानाच डोळ्यापुढे आपल्या गाव खेड्यात नांगरणी वखरणी करणारा शेतकरी बाप उभा राहिला. बापासोबत लहानपणी शेतात फिरतांना घेतलेला शेतकामाचा अनुभव सजीव होऊ लागला. खरे म्हणजे कोणत्याही कवितेच्या निर्मितीची बीजांकुरे त्या कवीच्या काळजात खूप आधी पेरलेली असतात असे मला नेहमीच वाटत आले आहे. तर धुऱ्या जवळ उभ्या असलेल्या बोरी किंवा बाभळीची झाड त्यांचे शेताच्या कुपाकुपाजवळ पडलेले धारदार तीक्ष्ण काटे, ह्या कुपातून चालणारा नांगर तेंव्हा गावात एकदा ट्रॅक्टर आला तर सारा गाव ट्रॅक्टरने होणारी नांगरणी पाहायला जमा व्हायचा त्यामुळे 99 टक्के नांगरणी ही बैल जोडीच्या मदतीने होत असे, पायात वेदना देत घुसणारे काटे, थकलेले शरीर आणि थकूनही चालत राहणारी बैलजोडी हे सर्व कवीला आठवत गेले असले पाहिजे. आणि हे सर्व कष्ट कशासाठी तर उद्या फुलून येणाऱ्या हिरव्या शेतासाठी, त्या हिरव्या समृद्धीच्या ओढीनं भारतातील शेतकरी पायात टोचणारे काटे, त्या पायांना होणाऱ्या जखमा,त्यातून वाहणारे लाल रक्त ह्या कशाचीही पर्वा न करता कष्ट आणि कष्ट करत राहतो. बरं हे कष्ट तरी किती करायचे ? तर मन आणि भावना मारून फक्त राबत राहायचे. पेरणीच्या दिवशी घरात एखाद्याच मरण झालं तर पेरणी होईस्तोवर प्रेत झाकून पेरणी करण्याचे अनेक उदाहरण आपण वाचतो आणि ऐकतो इतकं भावनाशून्य झाल्याशिवाय हे हिरवे स्वप्न फुलत नाही हेच खरे. अशीच एक भावना म्हणजे मातृत्वाची भावना होय. शेतात आपल्या भिकेला लागलेल्या शंकराला त्याच्या सोबत राबत कष्टत शेतजमीन कसण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या पार्वतीला सर्वात जास्त लळा असतो तो आपल्या लेकराचा ... मात्र ह्या मातीत राबताना स्वतःच मन मारून ती आपल्या लेकराला बाजूला ठेवते त्याच्यासाठी एक झोका बांधून मन त्याच्याकडे शरीर नवऱ्याच्या मागे झुरत असते, झिंजत असते ह्या संकल्पनेला आणखी वेदनेचा गडद रंग देताना कवींनी ही झोळी काटीला म्हणजे बाभळीच्या झाडाला बांधल्याचा उल्लेख केला आहे. बाभूळ म्हणजे काटेरी झुडूप, ज्याचे काटे वेदनादायी असतात आणि महत्वाचे म्हणजे ह्या झाडाची सावलीही पडत नाही. म्हणजे शेवटी ते लेकरू माय पासून दूर उन्हातच असते, फक्त त्या माऊलीला समाधान असते ते त्या पोकळ सावलीचे, ही गडद वेदना शेतीमातीचा रंग आणि गंध ह्या शिवाय कृषक संस्कृती मधील दैन्य, अपार कष्ट, निसर्ग ह्या सगळ्याचा परिपाकातून तिफन कवितेची रुजवण विठ्ठल वाघ ह्यांच्या मनात झाली. वऱ्हाड बोली भाषेतील गोडवा शब्दात उतरला आणि एक अस्सल वऱ्हाडी बाज घेऊन भारतीय शेतकऱ्याच्या दैन्य आणि श्रमिक जीवनाच चित्रण करणारी कविता मूळ वऱ्हाडी भाषेतून पुढील रुपात जन्मास आली.
काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते
ईज नाचते थयथय ढग ढोल वाजवते
तिफन चालते
नंदी बैलाच्या जोळीले सदाशीव हकालते
वटी बांधून पोटाले पाराबती उनारते
वटी पोटाले बांधते झोयी काटीले टांगते
झोयी काटीले टांगते त्यात तानुलं लळते
त्यात तानुल लळते ढग बरसते
तिफन चालते
काकरात बिजवाई जसं हांसर चांदनं
धरतीच्या आंगोपांगी लाळानौसाचं गोंदनं
सरीवर सरी येती माती न्हातीधुती होते
तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते
भूल जीवाले पाळते वाट सांजीले पाहेते
मैना वाटूली पाहेते राघू तिफन हानते
राघू तिफन हानते ढग बरसते
तिफन चालते
वला टाकती तिफन शितू वखर पाहेते
पानी भिजल ढेकूल लोनी पायाले वाटते
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
डोया सपन पाहेते काटा पायात रुतते
काटा पायात रुतते, लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते
हिर्व सपन फुलते ढग बरसते
तिफन चालते
लोकगीताच्या चालीवर आणि वऱ्हाडी बोलीची गोडी, विठ्ठल वाघाच्या पहाडी आवाजातील मार्दव आणि सादरीकरणाची अलौकिक किमया ह्या जोरावर ही कविता लवकरच महाराष्ट्रात सर्वत्र लोकप्रिय झाली. आगळी शब्दकळा, प्रतिभेचा लयबद्ध आविष्कार, जिवंत अनुभव विश्व ह्यामुळे ही कविता ओळखली जाऊ लागली. लोकगीताचा साज आणि लोकलयीचा बाज ह्यामुळे ही कविता शेतकऱ्यांना आणि रसिकांना आपली वाटू लागली. काटीला टांगलेल्या झोयीत रडणार लेकरु, पायात रक्त काढणारा काटा, उन्हा तान्हात शेतात राबणारे शंकर पार्वती सकळ शेतकरी जीवन कासावीस करणारे होते. तर त्याच वेळी काकरात बिजवाई जस हासर चांदण ह्या ओळी शिशिरातील चांदण्याची उधळण करणाऱ्या ठरल्या. कष्टमय जीवनात एकमेकांत गुंतलेले राघू मैनाची जोडी वाघांनी अजरामर केली. विदर्भातील वातावरण विदर्भातील प्रतीक, प्रतिमा अश्यामुळे विदर्भातील शेतकरी दाम्पत्य समोर उभे राहत असले तरी ह्या कवितेतील दुःख हे संपूर्ण भारतीय शेतकऱ्यांचे होते.. मुंशी प्रेमचंद ह्यांच्या गोदान मधील होरी ह्या शेतकऱ्यांपासून साहेबराव करपे ह्या 19 मार्च 1986 रोजी शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या विदर्भातील।शेतकऱ्यांचे जीवघेणे दुःख ह्या कवितेतून विठ्ठल वाघ ह्यांनी मांडले. असं काहून होत अशीन साहेबराव ह्या कवितेतून शेतकरी आत्महत्येवर बोलत उघडपणे समाज, शासन ह्या व्यवस्थेवर निर्भीडपणे कोरडा ओढण्याचे कामही पुढे विठ्ठल वाघांनी केले. 1981 मध्ये प्रकाशित अरे संसार संसार ह्या चित्रपटात अशोक सराफ, रंजना, कुलदीप पवार, मोहन गोखले, रिमा लागू अशी तगडी अभिनय जुगलबंदी मराठी सिनेरसिकांनी अनुभवली संगीतकार अनिल अरुण ह्यांनी संगीतबद्ध केलेले राजा ललकारी अशी घे किंवा विठू माऊली तू माऊली जगाच्या अश्या अविस्मरणीय आणि अप्रतिम गण्यासह लोकांना सर्वात जास्त आवडले ते गाणे म्हणजे काळ्या मातीत मातीत तिफन चालते हे होय. अकोल्यातून देवकीनंदन गोपाला हा श्रीराम लागू अभिनीत गाडगेबाबा ह्यांच्या जीवनावरील निर्मिती डॅडी देशमुख ह्यांची, त्यांच्या सोबत अर्थात विठ्ठल वाघ होतेच, राजदत्त ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटाचे काही हिशेब नेऊन देण्यासाठी विठ्ठल वाघ मुंबईला राजदत्त ह्यांच्याकडे गेले. त्यावेळी ते पुणे येथे गेल्याचे समजले तेंव्हा राजदत्त ह्यांना भेटायला म्हणून ते पुण्याला गेले. विठ्ठल वाघ गेले तेंव्हा राजदत्त आणि प्रसिद्ध ग्रामीण कथाकार शंकर पाटील ह्यांची चर्चा सुरू होती. अरे संसार संसार चित्रपटाचे लिखाण सुरू होते. त्यांच्यासाठी हा एक महत्वाकांक्षी चित्रपट होता. विठ्ठल वाघांना दत्ताजी (राजदत्त) ह्यांनी, "वाघ सर, तुमची काळ्या मातीत ऐकवा एकदा पाटलांना कुठ adjust झाली तर पाहू." असे म्हणून कविता गायला लावली. सर्व महाराष्ट्राला भुरळ पाडणारी ती कविता शंकर पाटलांनी शांतपणे ऐकली आणि ते उद्गारले, 'अरे बाबा, हे गाणं तर ह्या चित्रपटाचं थीम सॉंग होईल, अगदी ह्या चित्रपटाचा आत्मा होईल हा, पण एक अडचण अशी आहे की ही कविता आहे वऱ्हाडी आणि आपल्या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे कोल्हापुरी..." त्यावर राजदत्त ह्यांना विठ्ठल वाघ ह्यांची, त्यांच्या प्रतिभेची आणि बोलीभाषेच्या अभ्यासाची जाणीव असल्यामुळे ते अगदी सहज बोलले , "मग, त्यात काय अवघड वाघ सर तुम्हाला ह्यांचे व्याकरण दृष्ट्या कोल्हापुरी भाषेत रूपांतर करून देतील." त्यानंतर संपूर्ण कोल्हापुरी बाजाचे काळ्या मातीत मातीत असे रूपांतर विठ्ठल वाघ ह्यांनी तयार केले आज बहुतांश ठिकाणी मी वर दिलेली मूळ कविता अनेकांना माहितीही नसल्याने पुढील काव्यच लोकांना मूळ काव्य आहे असे वाटते.
काळ्या मातीत मातीत तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो
सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती माती न्हातीधुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते वाट राघूची पाहते
राघू तिफन हाणतो मैना वाटुली पाहते
झोळी झाडाला टांगून राबराबते माउली
तिथं झोळीतल्या जीवा व्हते पारखी साउली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन
गव्हां-जोंधळ्यात तवा सोनंचांदी लकाकते
जशी चांदी लकाकते कपाशी फुलते
चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिर्वं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो काटा पायांत रुततो
काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं हिर्वं सपान फुलतं

सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल ह्यांनी स्वरबद्ध केलेल्या ह्या गाण्याला संगीतबद्ध करण्या आधी संगीतकार अनिल अरुण ह्यांनी राजदत्त ह्यांच्या सांगण्यावर विठ्ठल वाघ ह्यांच्या कडून हे काव्यगायन प्रत्यक्ष ऐकले आणि विठ्ठल वाघांनी लावलेल्या चालीची गती थोडी धीमी करत चाल कायम ठेवली. म्हणजे रूढार्थाने ह्या कवितेचे, गाण्याचे, आणि चालीची सर्वस्वी श्रेय विठ्ठल वाघांनाच जाते असे म्हणावे लागेल. ह्या गाण्यामुळे कुलदीप पवार, अशोक सराफ अश्या अभिनेत्यांच्या छान, फार छान अश्या प्रतिक्रिया त्यावेळी विठ्ठल वाघांना मिळाल्या एका कवितेसाठी हा त्या काळात फार मोठा आदर होता. पुढे राघू मैना साठी विठ्ठल वाघांनी गीत लेखन केल्यावर त्या चित्रपटात नाना पाटेकर, अशोक सराफ, निळू फुले ही स्टार कास्ट दिसली. आपल्या एका मुलाखतीत आपल्या गायलेल्या गाण्यात आपले आवडते गाणे काळ्या मातीत मातीत आहे असे जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल ह्यांनी आवर्जून सांगितले. शेती आणि माती मधील सृजनशील काव्याची निर्मितीसाठी विठ्ठल वाघ ह्यांची कविता ओळखली जाते आणि त्यातही काळ्या मातीत मातीतचा क्रमांक फार वरच आहे हे निश्चित. सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते ही संकल्पना कवीला रिसोड सारख्या ग्रामीण भागात फिरताना होते, तर सदाशिव हाकालते नंदी बैलाच्या जोडीले, किंवा पराबती ऊनारते ह्यासाठी शेतात राबणारे मायबाप आणि मनावर गडदपणे बिंबविलेल्या संस्कृतीतील भोळा आणि गरीब समजला जाणारा शंकर हा देव आणि त्याला त्याही परिस्थितीत साथ देणारी पार्वती ह्यांची प्रतिमा आठवावी लागते. कधी सर्व भावना बाजूला ठेऊन अगदी लेकराला बाभळीला झोका बांधून ठेवणारी शेतकऱ्यांची बायको समोर येते. तर कधी आपलाच पाय काट्यामुळे रक्तबंबाळ झाल्याची सल ओली करावी लागते. शेतातील बियाण्याकडे पाहताना शिशिरातील प्रसन्न चांदणे आठवावे तर भिजल्या मातीच्या सुगंधाने कस्तुरीचा भास व्हावा. भिजलेल्या ढेकलात लोणी आठवावे आणि धरतीवर हिरवे पीक वाढणे म्हणजे धरतीन अंगावर काढलेल गोंदण म्हणणे, ह्या गोंदणाची सर आज मशिनच्या आधारे अंगावर काढलेल्या टॅटू ला येऊ शकत नाही किंवा ट्रॅक्टरच्या आधारे होणाऱ्या नांगरणी वखरणीला सर्जा राज्याच्या संगे मायेने लागणारा लळा आढळत नाही. कालानुरूप शेतीच्या अनेक संदर्भात बदल झालेत मात्र बदलले नाही ते शेतकऱ्यांचे जीवन, त्याच्या जीवनातील दैन्य, त्याच्या जीवनातील अपार आणि कवडीमोल ठरणारे कष्ट.... काहीच बदलले नाही का? होय बदलले पण बदलले फक्त एकच... आधी निसर्गाचा हा पुजारी जीवात जीव आहे तोवर कष्ट आणि दैन्य उपसत परिस्थितीशी लढायला आता तो मनाने इतका खचत चालला आहे की कीटक नाशकांचा वापर तो पिकांतील किड्याना मारण्यासाठी कमी आणि स्वतःचे जीवन संपविण्यासाठी जास्त करू लागला आहे. ह्याला आपण सर्व ह्या व्यवस्थेचे घटक म्हणून जबाबदार आहोत असे मला वाटते. विठ्ठल वाघाच्या तिफन कवितेचे गारुड आजही मराठी मनावर कायम आहे ह्याचा सर्वार्थाने मराठी कवी म्हणून आनंद होत असताना विठ्ठल वाघांनी मांडलेले शेतकऱ्यांच्या जीवनातील दैन्य आज तीन तप उलटूनही जसेच्या तसे आहेत ह्याची आंतरिक सलही मनात आहे हे नमूद करणे गरजेचे वाटतेच.

किरण शिवहर डोंगरदिवे
वॉर्ड न 7, समता नगर मेहकर
ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301
मोबा 7588565576

तिफन

ravindradalvi

शुक्रवार, September 17, 2021 - 21:06
Permalink
New

कितीतरी वर्षापासून हि कविता आणि चित्रपटातील गीत मी वाचल आहे ऐकत आलो आहे! काळ्या मातीत मातीत हा संग्रहही माझ्याकडे आहे! आज या तिफनची जन्मकथा आणि त्यावर आपले अनुभसिध्द अतीशय सुंदर असे विवेचन वाचून मला या रचनेच्या मुळाशी जाता आले! खुप खुप आभार सर आणि माझ्या हार्दिक शुभेच्छा !

  • Log in or register to post comments
प्रतिसादावरील प्रतिक्रिया

Kiran dongardive

शुक्रवार, September 17, 2021 - 21:13
Permalink
New

Thank you very much sir

  • Log in or register to post comments

In reply to तिफन by ravindradalvi

Thank you very much

Kiran dongardive

शुक्रवार, September 17, 2021 - 21:14
Permalink
New

Thank you very much

  • Log in or register to post comments

In reply to तिफन by ravindradalvi

प्रवेशिकेचे स्वागत

गंगाधर मुटे

मंगळवार, November 2, 2021 - 21:01
Permalink
New

*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 17921 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,270 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,163 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,227 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,006 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,485 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,371 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,202 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,827 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,101 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 8,996 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,092 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,244 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,236 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,636 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,971 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,263 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,364 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,621 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,432 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • दत्ता वालेकर
  • P D Katkar

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 148 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    1 hour 54 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    2 hours 37 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    15 hours 27 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 6 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 6 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 336
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 123
किती चाटणार भारतपुत्रा? 121
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 117
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 115
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 113
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 111
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 110
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 96
आजचे शेतमालाचे बाजारभाव 89
कापला रेशमाच्या सुताने गळा 83
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 66
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 48
माझे फेसबूक स्टेटस-1 42
किसान क्रांती 27
माझे फेसबूक स्टेटस - 2 22
मातृत्वाचा शृंगाररस 21
काही सुटे अन काही मुटे शेर 21
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 20
विचारपूस 17

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,003
माझे फेसबूक स्टेटस-1 180,958
शुभारंभ 134,909
रानमेवा - भूमिका 109,386
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,394
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,378
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,538
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,795
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,578
उद्देश आणि भूमिका 77,442
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,530
विचारपूस 71,716
गणपतीची आरती ॥३५॥ 67,723
सत्कार समारंभ : वर्धा 66,732
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,301
किती चाटणार भारतपुत्रा? 61,657
जात्यावरची गाणी 56,010
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,416
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,041
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,346
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini