पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
हे गणराज्य की धनराज्य?
प्रजापतीही प्रगल्भ झाला, पक्व झाली जनशाही मतपेटीतून गेंडा जन्मला, धन्य झाली गणशाही...!!
एका-एकुल्या 'व्होटा'साठी, थैली - थैली नोटा कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा कोणी करिती लांगूलचालन, कोणी लोटांगण जाती भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती सदाचाराचा मुडदा पडतो, मदांध उन्मत्तशाही...!!
डांबर खाती,सिमेंट खाती, जणू चरण्यासाठी सत्ता क्षणाक्षणाला टनाटनाने, वाढवीत नेती धनमत्ता किडूक-मिडूक दिल्या बिगर ना, कचेरी कार्यसिद्धा उद्दामाला दिवस सुगीचे, सत्याच्या माथी गुद्दा नेकी इमान पांचट झाले, भरात आली बलशाही ...!!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.