गझल....भाषणे आता गड्यांनो बास करा.
गझल....
भाषणे आता गड्यांनो बास करा
- महेश मोरे (स्वच्छंदी)
भाषणे आता गड्यांनो बास करा
कासरे सोडा..तयांचे फास करा
ही दलालांचीच सत्ता आज इथे
काळजी त्यांचीच तासंतास करा
वेदनांचा भाकरीला वास....तसा
आमच्याही काळजांचे घास करा
वादळाला थांबवा नेमा समित्या
पाठ वळता घावही बिन्धास करा
प्रेत माझे घ्या जरा खांद्यावर अन्
बातम्यांची शेवटी आरास करा
- Read more about गझल....भाषणे आता गड्यांनो बास करा.
- 2 comments
- Log in or register to post comments
- 6961 views

Recent comments ताजे प्रतिसाद