नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
वऱ्हाडी गीत....
'यंदा वावरात पेरू गांजा....
पुरत नाही राज्या आता,तुरी पऱ्हाटीचा लांजा.
अवंदा पेरू वावरामंदी, सिधा-सरका गांजा.
ना मजुरीचं काम,ना मजूर आन्याची बीमारी.
संध्याकाळी एक चिलम,इतकीच रोजदारी.
चोवीस तास तथी सारे, मुक्कामी रायतीन.
बुढेेबाडे अन नैतुरने,नाई वावरात मायतीन.
पांडीतला सखा'बुडा,नागो सुताराचा संज्या ||1||
यंदा पेरू वावरात..
तीन वर्षाचा कापूस,माया घरामंदी सळला.
त्याच्या किती गाद्या बनवू,मले ईचार पळला.
त्याच्यासाठी मीनं किती,घेतले बाप्पा टोले.
नीरा पाणी टाकू टाकू,जगवून राह्यलो त्याले.
अर्ध्या गंजीचा पोट्टयाईन,बनवून टाकला मांजा||2||
यंदा पेरू वावरात....
नाही विका लागत माल,फिरून दारोदारी.
साऱ्या मालाची होईन,घरून डिलिव्हरी.
ना मार्केटचा लोचा,नाई अडतीचा बी ताण.
सरकार कोणाचबी असो,भाव आपल्या मतानं.
मंग निवडून येवो 'कमळ',की निवडून येवो 'पंजा'||3||
यंदा पेरू वावरात...
माह्या माल आल्यावर,काऊन भाव घसरते?
मले सांगा एकाएकी, कशी मंदी पसरते?
कोणी हुंगत नाई माल,त्याचं जागीच होते खत.
जशी लगन झाल्यावर,झाली होती माह्यी गत.
बेपाऱ्याची होते चांदी,आपुन वाजोत बसा झांजा||4||
यंदा पेरू वावरात......
जवा बजाराले तुयी,चंची रिकामी वाटीनं.
चार पानं तोडून नेजो,पुरा बाजार होईनं.
पिंट्याले बूट घेजो,'बाली'ले मॅक्सी घेजो.
दोन पानं मंदिराच्या,दानपेटीत दान देजो.
कापसावानी रायतीन,घरी पैशाच्याबी गंजा.||5||
यंदा पेरू वावरात.....
कवि--गोपाल तुळशिराम मापारी,अकोला
(9423484829)
प्रतिक्रिया
तरी मी म्हणलोच
मापारी कुठं अंडरग्राउंड तर नाय झाला!
वाघा रे वाघा...........
धन्यवाद
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
फारच छान, सर!
फारच छान, सर!
राजीव मासरूळकर
mast
mast
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण