Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

वेगळ्या विदर्भासाठी कोळसा रोको

Main page content

Profile picture for user संपादक
By संपादक | 12:52 PM IST, शुक्र December 13, 2013
Attachment Size
Koyala Roko-FB-1.jpg 118.87 KB
Koyala Roko-FB-4.jpg 91.81 KB
Koyala Roko-FB-5.jpg 77.32 KB
Koyala Roko-FB-6.jpg 114.83 KB
शेतकरी संघटना

वेगळ्या विदर्भासाठी कोळसा रोको

प्रतिनिधी / चंद्रपूर

कोळसा व वेकोलि या दोन्ही बाबी केंद्र व राज्य शासनाच्या अख्यातरित येतात. तर त्यापासून तयार होणारी ऊर्जा हे राज्य शासनाच्या नियंत्रणात येते. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात राज्य सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याचा प्रस्ताव बिलासोबत वेगळ्या विदर्भाचेही बिल संसदेत ठेवावे, अशी मागणी रेटून धरीत येत्या १६ डिसेंबरला नागपूर येथे मतदान घेवून जनमताचा कौल बघितला जाणार आहे. येत्या काळात जिल्हास्थानी मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या मतदान प्रक्रियेत प्रत्येकांनी सहभागी होण्याचे आवाहन अँड. वामनराव चटप यांनी केले.
आज गुरूवार(१२ डिसेंबर) ला क्रांतीकारक बाबू गेनू या स्मृतिदिनी वेगळया विदर्भासाठी चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर घुग्घुस येथे करण्यात आलेल्या कोळसा रोको आंदोलनात ते बोलत होते.
आंदोलनात किशोर पोतनवार, प्रभाकर दिवे, प्राचार्य अनिल ठाकूरवार, अशोक मुसळे, अंकुश वाघमारे, श्रीधर बल्की, गोविंद मित्रा दिपक चिल्लावार, यशोधरा पोतनवार, शैलेजा देशपांडे, गंगाधर मुटे, देवराव पाटील धांडे यांच्यासह ३८ सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. अँड. वामनराव चटप म्हणाले, समितीने ठरविलेल्या आंदोलनाच्या मालिकेनुसार ५ व ६ डिसेंबररोजी नागपूर येथील रॉयल पराते सभागृहात स्वतंत्र विदर्भाचे पहिले अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनात सुप्रसिद्ध वित्ततज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी स्वतंत्र विदर्भाचा ४५११० कोटीचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारचे कर न लावता सरकारकडे विकासासाठी ११० कोटी रुपये असल्याचे दाखविण्यात आले. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर कराराची होळी, विदर्भाच्या सर्व सीमेवर फलक लावण्यात आले आहेत. तसेच विदर्भातील खासदरांच्या भेटी घेऊन त्यांना संसदेत स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा लावून धरण्याची विनंती करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान केवळ चंद्रपूर आणि नागपूर येथील खासदारांच्या प्रत्यक्ष भेटी झाल्या. पण रामटेक येथील खासदारांनी तर चक्क भेटण्यास मज्जाव केला होता. या आंदोलनानंतर काही खासदारांनी संसदेच्या शून्य सत्रात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पायर्‍यांवर सोमवारी पाच माजी आमदारांनी व एका विद्यमान आमदारांनी बसून, वेगळ्या विदर्भाचे निवेदन सर्वांनाच सादर केले. आता येत्या १६ डिसेंबरला वेगळ्या विदर्भासाठी मतदान घेऊन विदर्भाची बाजू, विदर्भाच्या विरुद्ध व महाराष्ट राज्य अशा पद्धतीने मतदान प्रक्रिया होईल. यानंतर पुन्हा विदर्भासाठी आंदोलन तीव्र करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
घुग्घुस बसस्थानक परिसरातील गोदावरी मंगल कार्यालयासमोरून हजारो महिला-पुरूष कार्यकर्त्यांची रॅली वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली निघाली. विदर्भ वेगळा झालाच पाहिजे, लाठी, गोली खायेंगे, विदर्भ राज्य लेके रहेंगे अशा घोषणा देण्यात आल्या. राजीव रतन चौकातील घुग्घुस-ताडाळी रेल्वेमार्ग व घुग्घुस साखरवाही ताडाळी रस्त्यावर धरणा दिला.
रेल्वे व इतर वाहन दीड तास थांबविल्याने घुग्घुस - चंद्रपूर - वणी व साखरवाही ताडाळी मार्गावर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
(लोकमत व लोकशाही वार्तावरून साभार)
------------------------------------------------------------
kolsa Roko
****
Ghuggus
****
कोळसा रोको
****
घुग्गुस
*****
वेगळ्या विदर्भासाठी कोळसा रोको - Zee News

बातमी ऐकण्यासाठी/पाहण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

Post by विदर्भराज्य.
विदर्भ
विदर्भराज्य
वेगळा विदर्भ
कोळसा रोको
शेतकऱ्यांचा नेता
शेतकरी सत्याग्रह
शोषकांना पोषक जातीयवादाचा भस्मासूर
रास्तारोको आंदोलन
रेलरोको आंदोलन
शेतकरी आंदोलन
shetkari sanghatana nete sharad joshi
शेतकरी संघटना
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 3643 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 17 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    13 hours 14 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    13 hours 16 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    13 hours 18 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    13 hours 21 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 13 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 2
शेतकऱ्याचा गळफास 2
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 2
ते प्रेत बोलताहे 2
रंगताना रंगामध्ये 2
कर्जबाजारीपणाची व्यथा सांगणारी कथा 2
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 2
८ वे अ.भा.म.शे.सा.संमेलन : कार्यक्रमपत्रिका 2
// आभाळभर कर्जाचं डोंगर... // 2
गणपतीची आरती ॥३५॥ 2
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 2
शहर अजून… 2
स्वप्नभंग 2
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 2
कविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं' 2
झोपेच्या घाती 2
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२३ : निकाल 2
जय विदर्भ? 2
धोरण.. 2
साहेब 2

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,505
नियमावली 44,813
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,148
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,821
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,728
शरद जोशी 40,739
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,113
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,057
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,544
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,044
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,041
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,797
गरीबी कशामुळे? 36,065
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,612
आईचं छप्पर ।।१०।। 34,522
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 33,911
रे नववर्षा 33,747
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,296
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,271
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,264

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini