आमराई
गावाच्या येशीपाशी
होती दाट आमराई
जाता येता कोणालेबी
भेटे पाडाची नवाई..
वाटसरु उन्हातला
जीव तयमय होते
तवा माय अमराई
छत सावली धरते.
सुट्टी लागेल उन्हायाची
याच आंब्याचा लागते
गोड वास गावभर
आंबा पाडावर येते..
होते आंब्याची उतारी
रेलचेल पाव्हण्याची
माहेराले लेके येते
मौज घेते रसाईची..
आता नाही अमराई
खोडं नामशेष झाले
गाव बकाल उदास
हिरवाईले मुकले..
********************
जयश्री कोटगीरवार
