आत्याची पाखडण
(छंदबद्ध गावरान रचना)
माह्यानं खरं सांग, आत्या मला ठणकावून पुसते
खरं सांगल की नाई लेकरासारखी रुसून बसते
जवळची चंची, ऐनक दिसभर गांवत नाही तिला
का कुणास ठाऊक चूक माझी कशी दुरून दिसते
माहेरी नेया बोळई दिसता कपाळी आठी पडते
तोच तिचा भाऊबीजेला आला की खुदकून हसते
उतरंडीत जपून ठेवलेला खाऊ नातवाला भरवते
मला कळू नये म्हणून तोंड त्याच पदर घेऊन पुसते
रागाच्या पाखडणीत सगळे दोष उडवून 'संदीप'
मायेचं काळीज तिचं बा,मोठं सुपाहून भासते!
— संदीप थोरात (कळमनुरी, जि. हिंगोली)
९०४९१४३६५४
शब्दार्थ (तळटीप):
माह्यानं: माझी आण / शपथ
ऐनक:-चष्मा
गांवणे:-सापडणे
बोळई:- माहेरी नेण्यासाठी आलेला निरोप / पाठवणी
उतरंड:-एकावर एक रचून ठेवलेली मडकी / भांडी
