स्वप्नांना प्राण द्यावे
या नभाने भुईला जलदान द्यावे
बळीच्या स्वप्नांना जरा प्राण द्यावे
काळजाला भेगा पडल्या मातीच्या
जखमा भरण्या मेघांनी बरसून द्यावे
तप्त वाऱ्यांनी जाळली शेते सारी
चिखलाचे पावसाने वरदान द्यावे
आसवांनी भिजलेली हिरवी पिके
धरेच्या लेकरास कैक जीवन द्यावे
आभाळाशी रोज करतो तो विनवणी
कष्टकऱ्याला थोडेसे तरी मान द्यावे
घाम असतो मोत्याहून मौल्यवान जर
त्या श्रमांना योग्य मान-सन्मान द्यावे
हात जोडून मागणे नभास एवढेची
या नभाने भुईला जलाचे दान द्यावे
सौ. किरण महादेव चौधरी
गडचिरोली
9403431406
