आभाळागत तुझी माया...
आभाळागत तुझी माया
आकाश ठेंगणे होते
नुसत्या तुझ्या असण्याने
गारव्याची मंद झुळूक येते ..१
पिलांना ही येतो जीव
विश्वासाचा ,भरारीचा
नुसत्या तुझ्या असण्याने
मिळतो किरण आशेचा...२
अथांग सागराच्या लाटा
किनाऱ्यावर आदळतात
नुसत्या तुझ्या असण्याने
वादळेही क्षमतात...३
ऋतु वसंतामध्ये
बहर येतो आठवणीचा
नुसत्या तुझ्या असण्याने
रंग खेळतो हेंमताचा...४
होईल नवी पहाट जीवनी
भावनांनाही मिळते उभारी
नुसत्या तुझ्या असण्याने
आधार मिळतो घरी-दारी..५
अजित नरेंद्र सपकाळ
अकोट जि अकोला
