Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

वासलात... गुरू कॉलनीतील वासनाकांड

Main page content

By roshankumarpil… | 6:22 PM IST, बुध November 25, 2026
महिला कवी/लेखिकांच्या पुस्तकाचे समीक्षण

गुरू कॉलनीतील वासनाकांड अधोरेखित करणारी कादंबरी...." वासलात "
*************************************

कादंबरीकार... लतिका चौधरी
****

समाजात अनेक प्रकारचे, अनेक स्वभावाचे, अनेक विचारांचे, वर्णांचे, जाती-धर्माचे लोक आजू-बाजूला वावरत असतात. त्यांचे बरे वाईट अनुभव आपल्याला येत असतात .त्या अनुभव विश्वातून आपण त्यांचे विषयीची मत व्यक्त करत असतो. स्वभाव गुणांबद्दल मनोधारणा निश्चित करतो. त्याच प्रकारची स्वभाव चित्रे साहित्यिक आपल्या साहित्य विश्वात अधोरेखित करत असतो . वास्तवाला कल्पनेची जोड देऊन कादंबरीकार, कथाकार शब्दांना लालित्याचा मुलामा चढवतो. आणि सरस शब्दबद्ध रचना लोकांच्या पुढ्यात ग्रंथ रूपाने ठेवतो.
साहित्य लेखनासाठी साहित्यिक अनेक दिवस, अनेक महिने ,अनेक वर्ष चिंतन, मनन करून पुस्तक रूपाने वाचकांच्या पुढे येतो, परंतु वाचक मात्र त्या ग्रंथांचे साहित्यिक मूल्य हे काही दिवसात ,काही तासात ठरवत असतात.
अर्थात काही सुज्ञ वाचक त्यावर चिंतन मनन सुद्धा करतात यात काही शंका नाही.
लतिका चौधरी यांची "वासलात" ही कादंबरी वाचकाला अगदी चिंतन, मनन करायला लावणारी आहे .

शिक्षक हा कादंबरीतील महत्त्वाचा घटक आहे. शैक्षणिक संस्था ,शिक्षक कॉलनी ,कॉलनीत राहणारे शिक्षक ,त्यांचे कुटुंबीय या सर्वांभोवती या कादंबरीची सूत्रबद्ध गुंफण केलेली आहे .

दिशोत्तमा प्रकाशन ,नाशिक यांनी ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे. मनीष पानपाटील यांच्या बोलक्या,आकर्षक मुखपृष्ठासह डॉ. फुला बागुल यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि एकनाथ पगार यांचा मलपृष्ठ संदेश अतिशय देखणा आहे .

शिक्षक पेशाची घसरलेली पत प्रतिष्ठा
*****************************
शिक्षक म्हणजे गुरू, मास्तर, शिक्षक !
आई वडिलांनंतर ज्यांचे स्थान आदराचे आहे ते म्हणजे शिक्षक. मास्तर म्हणजे मायेचा स्तर !
गुरुर ब्रम्हा गुरूर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा,गुरुर साक्षात् परब्रम्ह गूरुर देवो महेश्वरा!
अशा शब्दात ज्यांचं वर्णन केलं जाते ते म्हणजे गुरु . पूर्वी गुरुजींना समाजात फार महत्त्वाचे स्थान होते. लग्न जुळवण्यापासून तर धार्मिक विधी असो वा अंतिम दुःखद क्षण, प्रत्येकांच्या घरी कार्यक्रमात गुरुजींचा पूर्णतः सहभाग राहत असे. त्यांना सन्मानाचे स्थान मिळत असे.
पण सध्याच्या काळात गुरुजींचा मानसन्मान, पद, प्रतिष्ठा ढासळत चाललेली असल्याचे दिसून येत आहे . मुलींवर होणारे अत्याचार , शाळांमधून होणारे लैंगिक शोषण , वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये असलेला गुरुजींचा वावर यामुळे गुरुजी या पदाला कुठेतरी गालबोट लागत असल्याचे दिसून येत आहे .

हीच आजची सामाजिक परिस्थिती कादंबरीकारानी आपल्या " वासलात " या कादंबरीत हेरली आहे . त्याचे हुबेहूब चित्रण यात केलेले दिसून येते. ओघवती भाषाशैली आणि सूत्रबद्ध नियोजनातून पुढे जाणारे कथानक यामुळे हे कथासूत्र वाचकाला कादंबरी वाचन करायला भाग पाडते .
कथानकात वाचकाला गुंतवून ठेवण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

विषय वासनेची गुंफण
*******************

बनगरवाडी ही प्रचंड गाजलेली कादंबरी शिक्षकाच्या जीवनाचे अनुभव त्याचे प्रश्न समस्या अधोरेखित करते . अलीकडे डॉ. विद्याधर बन्सोड यांची " मुक्काम पोस्ट तेढा" , विजया मरोतकर यांची " अजूनही..." ह्या कादंबऱ्या तासिका तत्त्वावर असलेल्या शिक्षकांच्या समस्या उजागर करतात .

अशा अनेक कथा , कादंबऱ्यातून शिक्षक, शिक्षण व्यवस्था आणि त्या विषयीच्या अनेक घडामोडी वाचकांसमोर ग्रंथ रूपाने आल्या आहेत .

वासलात ही कादंबरी मात्र या साऱ्यांहून वेगळी आहे. यातील विषय सूत्र हे केवळ आणि केवळ बदल्याच्या भावनेतून किंवा वासना तृप्तीसाठी असल्याने दिसून येते. वासना तृप्तीसाठी कोण कुठल्या थराला जाईल याची कल्पना कल्पना करवत नाही.

शिक्षक हा समाज सुधारक आहे. त्याचा आदर्श विद्यार्थी,समाज, गाव घेतो. त्याची वागणूक आदर्श असली पाहिजे. परंतु गुरू कॉलनीत राहणाऱ्या शिक्षकांची वर्तणूक एवढी गलिच्छ आहे की हे शिक्षक पदाच्या लायक कसे ठरले असावेत ? असा प्रश्न आवासून उभा राहतो.

वासलात कादंबरी ही एक सूड कथा आहे.
स्वतःच्या बहिणी वरती झालेल्या अन्याय, अत्याचाराचा बदला घेण्यासाठी कथानकातील शिक्षक हा ज्याने अन्याय केला त्या शिक्षकाच्या बायकोला नादी लावून तिचे शोषण करतो. तिच्या मुलींना सुध्दा अनोळखी व्यक्तीला सौदा करून विकतो. अर्थात् एवढ्या खालच्या थराला तो का जातो? याचे उत्तर शोधायला ही कादंबरी विकत घेऊन वाचली पाहिजे.

संतू या शिक्षकाची वाताहत "वासलात" या कादंबरीत चितारलेली आहे.

संतूचे त्याच्या शाळेतील शिपाई पदावर असलेल्या सखू नावाच्या विधवे सोबत सूत जुळले आहेत. शब्बू नावाच्या शेजारी राहणाऱ्या मेहुणीवर त्याचा डोळा आहे.

राजा बगे हे सुध्दा या कादंबरीतील महत्वाचे पात्र. तो शिक्षक असून त्याचे स्वतःचे पेट्रोल पंप , बिअर बार, हॉटेल आणि वडिलोपार्जित शेती असे नाना उद्योग आहेत . " गुरू म्हणून एकही गुण राज्यात नव्हता. गिधाड सुध्दा त्याचेपेक्षा नीतिवान म्हणावे."
अशा परखड शब्दात कादंबरीकार या पात्राचे वर्णन करतात.

राजा बगेची बायको वैजू ही भांडखोर, चुगली खोर, आगलावी आहे. नवऱ्याच्या धाकात आहे पण तो बाहेर गेला की हिचे गुण उधळायचे सुरू होत असते.

कादंबरीतील प्रत्येक पत्र हे इरसाल नमुन्यांचे आहे.

" शब्बुच्या मनात संतू - संतूच्या मनात शब्बु आणि सखू, पप्प्याच्या मनात वृंदा, वृंदाच्या मनात पप्पू, कोकिळा वेगळीच कुहू कुहू करु लागली होती."

"मात्र काही शहाणी माणसे, शहाणी घरे यापासून अंतर राखून असायचे. " या वर्णनातून इतरही शेजारी राहणारे काही कुटुंब निश्चितच सज्जन होते . हे सुचवले आहे.

पप्पुची संतुच्या बायकोशी सलगी सुरू होते आणि संतुच्या आयुष्याची वाट लागायला सुरवात होते.

संतू आणि वृंदाच्या मुली मंदा आणि मिनू यांची सुध्दा बाहेर लफडी आहेत.

खरतर " वासलात ही कादंबरी वासना, शारीरिक आकर्षण,मोह, माया यांचा निव्वळ गुंता आहे.
पुढे पुढे वाचल्यानंतर वाचकाला हा गुंता सुटल्याशिवाय राहत नाही.

एकदा कादंबरी हातात पडली की एका बैठकीत २५४ पानांचा फडशा पाडल्या नंतरच वाचकाला वाचनाचे खरे समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पुढे काय? अशी उत्सुकता वाढवणारी प्रसंगांची मालिका तयार होत असण्याने वाचकाला वाचनाची कायम उत्सुकता लागून राहते.

लोपा चौरे हे या कादंबरीत आलेले आगंतुक पात्र . तिचे वर्णन करतांना सुध्दा लेखणी थकली नाही.

वासलात ह्या कादंबरीत अनेक आयुष्याची वाताहत का झाली? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. यासाठी ही कादंबरी निश्चित वाचली पाहिजे. शिक्षकांनी आपले चरित्र आणि चारित्र्य सुधारले पाहिजे. चिंतन आणि मनन केले पाहिजे.

कादंबरीकार ह्या सिद्धहस्त लेखिका आहेत. त्यांनी कथा, कविता, गझल,कादंबरी अशा विविध साहित्य प्रकारात स्वच्छंद विहार केला आहे. विपूल लेखन केले आहे.त्यांच्या लेखणीतून अशा अनेकोत्तम साहित्यकृती जन्मास याव्यात. यासाठी लेखन प्रवासाला आभाळभर शुभेच्छा.

*************************************
कादंबरीकार... लतिका चौधरी
दिशोत्तमा प्रकाशन, नाशिक
मूल्य..320/-
*************************************

रोशनकुमार शामजी पिलेवान
सातारा
मो.7798509816
*************************************

  • Log in or register to post comments
  • 8 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,283 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,181 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,240 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,024 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,494 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,383 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,218 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,840 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,109 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,004 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,273 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,249 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,247 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,638 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,972 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,271 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,365 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,624 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,436 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • भालचंद्र डंभे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 40 *
Who's new नवीन सदस्य
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    1 hour 15 minutes ago
  • अहो शेतकरी दादा... तुमचं कसं होईल हो अमदा...
    5 hours 12 minutes ago
  • मनःपूर्वक धन्यवाद भाऊ
    7 hours 24 minutes ago
  • शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग सांगणारी 'बळीराणी'
    7 hours 33 minutes ago
  • मस्तच
    11 hours 45 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 253
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 83
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 81
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 81
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 79
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 72
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 61
कापला रेशमाच्या सुताने गळा 56
किती चाटणार भारतपुत्रा? 52
आजचे शेतमालाचे बाजारभाव 40
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 37
शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग सांगणारी 'बळीराणी' 37
वावर 33
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 18
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 16
किसान क्रांती 16
माझे फेसबूक स्टेटस-1 13
दुःख मातीतले.... 12
अट्टाहास 12
गझल 11
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,021
माझे फेसबूक स्टेटस-1 180,999
शुभारंभ 134,918
रानमेवा - भूमिका 109,389
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,404
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,722
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,546
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,835
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,587
उद्देश आणि भूमिका 77,456
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,648
विचारपूस 71,738
गणपतीची आरती ॥३५॥ 67,756
सत्कार समारंभ : वर्धा 66,737
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,329
किती चाटणार भारतपुत्रा? 61,844
जात्यावरची गाणी 56,023
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,435
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,048
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,357
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini