डोळ्यात आसवांची गर्दी अमाप झाली
गालावरी सुखांची शिस्तीत लाट आली
तक्रार एवढी की सौख्ये सुफी निघाली
आजन्म गात आलो दुःखा तुझी कवाली
ओला सुका भुईच्या गावी कधीच नव्हता
का आणला सुगीने दुष्काळ हा अकाली
निष्णात मी जरीही व्युहातला जयंता
चालून जिंकलो ना साऱ्या जुनाट चाली
( जयंता... अभिमन्यु, सौभद्र)
झाला फितूर भाऊ रामासवे मिळाला
सुग्रीव एकदाचा, गेला करून बाली
चेकाळल्या असूरी नजरा पिसाट लिंगी
व्हावेस लेकरा तू दुर्गा नि चंड काली
जात्यांध श्वापदे ही झालीत हाड वैरी
बाबा तुझ्या मुलांना नाही कुणीच वाली
माझा न राहिलो मी हे श्वास ही तुझे गे
सर्वस्व आज केले राणी तुझ्या हवाली
******************************
रोशनकुमार शामजी पिलेवान
मुक्काम पोस्ट लेकव्ह्यू रेसिडेन्सी , फ्लॅट A15, गोडोली नाका, सातारा पिन 415001
मो. 7798509816
