लेखनप्रकार - छंदमुक्त कवि
*भीतीचे वारूळ*
भीतीचे वारूळ तिच्या
सतत मनात असते जळजळत
कुठे गर्दीत वा एकांतात
नजर त्याची असेल का टपून
किळसवाण्या त्याच्या हाताच्या
नकोस्या स्पर्शाने देह
करेल का मलिन
भीतीचे ते वारूळ तिच्या
अवतीभवती करून बसतात घर
डोळ्यासमोर करत विद्रोह
कारण पुरुष नावाच्या या प्रजातीमध्ये
असेही असतात काही
देखण्या मुखवट्या मागे
लपलेले श्वान
नसतो त्यांना फरक पडत
ती तीन वर्षाची तेरा की त्रेप्पन
भूक वासनेची भागवून
देह तिचे ठेचून फेकून देतात
अत्याचाराच्या त्या विवंचनेने
उमलण्या आधीच
कोमेजल्या जातात अशा
असंख्य मुक्या कळ्या
कोमल तिच्या मनावर
पडलेले ते व्रण,
तिष्ण नखुल्यांचे ते
मनावर पडलेले घाव
तीला विसरू देत नाही
तो हिणकस क्षण
तिचे ते घाव भरणारे
नसतेच कुठले औषध
रक्तातील घाव भरणाऱ्या पेशीही
निर्जीव असतात झाल्या
आणि ती लाचार
भीतीच्या वारुळातून
असह्य वेदनेच्या कन्हवेतून
एकच प्रश्न असते विचारत
असा कोणता माझा गुन्हा
ज्याची सजा आहे मी भोगत?
आतून उद्रेक होत असतो
अन्यायाच्या ज्वालामुखीचा
आणि बाहेर सुरू असतो
उत्सव सावित्रीच्या लेकीचा
सुविचारांची फलकं वाकुल्या दाऊन
हिनवत असतात तिला
विपरीत सत्याचा आरसा
दाखवत
दोषी ला दोषी करार देतांना
ओढुन घेतो
संवेदनशीलतेचे अंगवस्त्र
आणि निर्दोष देहाला
देतांना न्याय
हात असतात बांधलेले
इतकेही क्षिथील असु नये
कायद्याने...
~ सौ माधुरी प्रमोदराव वरवटकर
मु. पो मांडगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा
पोस्ट- मांडगाव
पिनकोड नं. 442102
संपर्क क्र. 9588414304
इमेल- madhuriwarwatkar1983@gmail.com
सदर स्पर्धेसाठी मी दिलेली कविता " भीतीचे वारूळ " ही स्व लिखित आहे.
सदर स्पर्धेत ही कविता समाविष्ट करावी
