Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

(ब) छंदमुक्त कविता

Main page content

By Madhuri_123 | 4:39 PM IST, रवी November 22, 2026
छंदमुक्त कविता

लेखनप्रकार - छंदमुक्त कवि

*भीतीचे वारूळ*

भीतीचे वारूळ तिच्या
सतत मनात असते जळजळत
कुठे गर्दीत वा एकांतात
नजर त्याची असेल का टपून
किळसवाण्या त्याच्या हाताच्या
नकोस्या स्पर्शाने देह
करेल का मलिन
भीतीचे ते वारूळ तिच्या
अवतीभवती करून बसतात घर
डोळ्यासमोर करत विद्रोह

कारण पुरुष नावाच्या या प्रजातीमध्ये
असेही असतात काही
देखण्या मुखवट्या मागे
लपलेले श्वान
नसतो त्यांना फरक पडत
ती तीन वर्षाची तेरा की त्रेप्पन
भूक वासनेची भागवून
देह तिचे ठेचून फेकून देतात

अत्याचाराच्या त्या विवंचनेने
उमलण्या आधीच
कोमेजल्या जातात अशा
असंख्य मुक्या कळ्या
कोमल तिच्या मनावर
पडलेले ते व्रण,
तिष्ण नखुल्यांचे ते
मनावर पडलेले घाव
तीला विसरू देत नाही
तो हिणकस क्षण

तिचे ते घाव भरणारे
नसतेच कुठले औषध
रक्तातील घाव भरणाऱ्या पेशीही
निर्जीव असतात झाल्या
आणि ती लाचार
भीतीच्या वारुळातून
असह्य वेदनेच्या कन्हवेतून
एकच प्रश्न असते विचारत
असा कोणता माझा गुन्हा
ज्याची सजा आहे मी भोगत?

आतून उद्रेक होत असतो
अन्यायाच्या ज्वालामुखीचा
आणि बाहेर सुरू असतो
उत्सव सावित्रीच्या लेकीचा
सुविचारांची फलकं वाकुल्या दाऊन
हिनवत असतात तिला
विपरीत सत्याचा आरसा
दाखवत

दोषी ला दोषी करार देतांना
ओढुन घेतो
संवेदनशीलतेचे अंगवस्त्र
आणि निर्दोष देहाला
देतांना न्याय
हात असतात बांधलेले
इतकेही क्षिथील असु नये
कायद्याने...

~ सौ माधुरी प्रमोदराव वरवटकर
मु. पो मांडगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा
पोस्ट- मांडगाव
पिनकोड नं. 442102
संपर्क क्र. 9588414304
इमेल- madhuriwarwatkar1983@gmail.com

सदर स्पर्धेसाठी मी दिलेली कविता " भीतीचे वारूळ " ही स्व लिखित आहे.
सदर स्पर्धेत ही कविता समाविष्ट करावी

  • Log in or register to post comments
  • 5 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Rutuja Bane

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 4 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    1 day 4 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    1 day 4 hours ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    1 day 4 hours ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    1 day 4 hours ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    2 days 5 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24 376
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 136
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 136
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 135
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 129
किती चाटणार भारतपुत्रा? 127
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 123
कापला रेशमाच्या सुताने गळा 118
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 90
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 53
माझे फेसबूक स्टेटस-1 35
किसान क्रांती 32
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 22
दुःख मातीतले.... 17
गझल 16
मातृत्वाचा शृंगाररस 15
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 15
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 14
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 13

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,978
माझे फेसबूक स्टेटस-1 180,845
शुभारंभ 134,900
रानमेवा - भूमिका 109,384
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,382
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,220
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,530
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,774
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,576
उद्देश आणि भूमिका 77,434
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,414
विचारपूस 71,690
गणपतीची आरती ॥३५॥ 67,709
सत्कार समारंभ : वर्धा 66,720
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,277
किती चाटणार भारतपुत्रा? 61,327
जात्यावरची गाणी 55,996
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,366
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,037
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,342

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini