Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

पुढचं पाऊल

Main page content

By Vaishnavi nirmal | 7:08 PM IST, सोम September 23, 2024
शेतकरी जीवनातील सुखद अनुभव

कृषी प्रदर्शन आणि त्यातला एक प्रातिनिधिक संवाद…
मी: आम्ही पर्यावरणविषयक काम करतो.
शेतकरी : ! (त्यांच्या डोळ्यातली उत्सुकता बघून बरं वाटत होतं.)

मी : आणि इथे आम्ही असा विषय मांडतो आहोत की आता गावे उजाड झाली आहेत. जंगल राहिली नाहीत कुठे.
शेतकरी : एकदम बरोबर!

मी : पण निसर्ग नसेल तर शेती होणार कशी? शेतकऱ्यासाठी दोन संसाधने महत्वाची आहेत : माती आणि पाणी. ही बळकट ठेवली तर उत्तम शेती होऊ शकेल. सध्या आपण जी शेती करतो ती बहुतांशी भूजलावरच चालते. त्यामुळे भूजल पुनर्भरण हा महत्वाचा विषय आहे. या नकाशात दाखविल्याप्रमाणे, पूर्वी प्रत्येक गावाच्या पाणलोटक्षेत्रात, ओढ्यांच्या उगमाशी आणि काठांवर अशी जंगले होती तेव्हा झरे जिवंत होते. कोकण, सह्याद्री आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात असे जिवंत झरे अजूनही दिसतात. झरे जिवंत ठेवण्यात भूगर्भरचनेचा वाटा मुख्य आहेच पण जंगलांचा वाटा दुर्लक्षिता येत नाही. ही जंगले स्पंजप्रमाणे काम करतात. पावसाचं पाणी जमिनीत, भूगर्भरचनेत जिरवण्याचं काम करतात. आणि फक्त एकदा किंवा दोनदा नाही करत तर चिरंतन करत राहतात. पिढ्यानपिढ्या! या झऱ्यांमुळे वर्षभर पिके घेता येत होती. बरोबर की नाही?
शेतकरी : हा.. एकदम मुद्द्याचं बोललात ताई.. आमच्या आजाच्या टायमाला पाणी भरपूर होतं. आता काय नाय राहीलं..

मी : मग तुम्ही काही प्रयत्न केले नाहीत का हे झरे टिकवायला?
शेतकरी : अं.. काय गरज नाय लागली.. आमच्या बाच्या टायमाला धरणातून कालवे आले गावात. पन त्याचंबी पानी काय भरोश्याचं नव्हत. हळू हळू मग आम्ही बोरवेल केली आणि पंप लावले.

मी : मग आता पाण्याचा प्रश्न मिटला का ?
शेतकरी : नाय हो, कसच काय, आमचा लय दुष्काळी भाग. विहिरी नी बोरवेल आटल्या की लवकरच. ते रिचार्ज कस करायचं ते सांगा तुमी..

मी : सांगतो आम्ही तेही, पण आता बघा पाणी भरपूर होतं म्हणून आपण शेतीचं क्षेत्र वाढवलं पण आता बोरवेल आटल्यामुळे त्या क्षेत्राला पुरेसं पाणी मात्र नाही आपल्याकडे. हा सगळा स्केलचा म्हणजे प्रमाणाचा मुद्दा आहे. पूर्वी पाणी कमी होतं पण होत्या तेवढ्या शेतीला पुरेसं होतं. आणि मातीचं काय?
शेतकरी : माती तशी चांगली हाये. आता काळ्या आईशिवाय काय शेती होते होय?

मी : वा ! मग खताशिवाय होते का शेती?
शेतकरी : नाय ! खतं तर घालावीच लागतात ना दर पिकाला.

मी : आता बघा, पूर्वी जंगले होती तेव्हा थोड्या पाण्याची पण वर्षभर आणि कायमस्वरूपी सोय होती. विहिरी भरलेल्या होत्या. शेती थोडीच होती पण यशस्वी होती. पण ती कमी पडत होती म्हणून की काय हरितक्रांतीने जोर धरला पण आपल्याला अधिकाधिक उत्पादनाची सवय लागली आणि उपलब्ध संसाधनांचं आणि पिकांचं गणित कोलमडलं. म्हणून मग खतांचा आधार घेत शेती करावी लागली, इलाजच नव्हता. पण मातीतून आपण कायम घेतच राहिलो तर कधीतरी तिची देण्याची क्षमता संपणार. ती पुनरुज्जीवित करत राहिलो तर शेती उत्तम होणार. तीच गोष्ट पाण्याची. भूगर्भातल्या पाण्याच्या टाकीची क्षमता मर्यादित आहे. तीच टाकी सतत वापरायची असेल तर तिचं पुनर्भरण करावं लागणार की.
शेतकरी : हा.. ते कसं करायचं सांगा की..

मी : तेच करण्यासाठी निसर्गाची सिस्टीम परत बसवावी असं आम्ही सुचवतोय. निसर्ग चिरंतन काम करतो. माती आणि पाणी ही निसर्गाचीच रूपे. आपण निसर्गाकडून कायम घेतच राहिलो तर कधी ना कधी तो संपुष्टात येणार. हा निसर्गाला परत देण्याचा विषय आहे. तर आपली पुढची पिढी शेती करू शकेल. कसं साध्य करायचं हे? तर या नकाशात दाखविल्याप्रमाणे गावाच्या पाणलोटक्षेत्राचं अत्यंत विचारपूर्वक नियोजन करायला हवं. ओढ्यांच्या उगमाला जंगल पुनरुज्जीवनाची सुरवात करायला हवी. त्याकरता इथे मांडलेल्या या पळस, पांगारा, ऐन, शिसव, कळंब, करंज, वड, उंबर, बिब्बा, कुसुम, रिठा, खिरणी यासाख्या स्थानिक झाडांचा कार्यभाग महत्वाचा आहे. परदेशी झाडांची एकसुरी लागवड करण्यापेक्षा स्थानिक विविधता जपणे महत्वाचे आहे. तर पुढच्या पिढीला जंगल बघायला मिळेल.
शेतकरी : हा बरोबरे.. हे काम लई गरजेचं आहे. पण आम्हालाच नाय बघायला मिळत जंगल.. पुढच्या पिढीच सोडूनच द्या.. पानीच नाय गावात तर झाडाला पानी देनार कसं?

मी : तेच तर! पाणी राहिलं नाही कारण आपण आपल्या पाणलोटक्षेत्राचा अमर्याद, हवा तसा वापर करतोय. सगळीकडे मुक्त चराई आहे, सर्वत्र शेती करतो आहोत, शेती व्यतिरिक्तच्या भागातली माती कडक झाली आहे, तिथे पाणी मुरतच नाही. पूर्ण वाहून जाते. जंगले किंवा राखीव गवताळ कुरणे तयार झाली तर ते पाणी मुरण्याची सोय होईल. गावाच्या भूरुपाचा वापर जर आपण नियंत्रित केला तर अनेक फायदे होतील. उदाहरणार्थ, गवताळ कुरणे राखली तर गुरांना सकस चारा मिळेल. कुसळीसारखी निकृष्ट गवते नाहीशी होऊन त्यांची जागा पवन्या, मारवेल, डोंगरी यांसारखी सकस गवते घेतील. धुळ्यातल्या लामकानी गावाने गावातील पाचशे हेक्टरला असे संपूर्ण संरक्षण देऊन सकस चारा कसा वाढवतो येतो याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. बरोबरीने हिवरे बाजार किंवा राळेगण सिद्धी ही उदाहरणे आहेतच. संरक्षणाबरोबर माती आणि जल संधारणाच्या कामांचे उत्तम परिणाम देखील इथे बघायला मिळतात. विहिरींची आणि बोरवेलींची पातळी वाढली आहे. शेती सोडून दिलेल्या लोकांनी पुनश्च शेती सुरु केली आहे. तर मुद्दा असा आहे की पुनरुज्जीवनाची तंत्रे राबवून मातीतला ओलावा वाढतो आणि मग लागवड केली तर त्याला पाणी कमी लागते. अर्थात हे वेळखाऊ काम आहे पण याला इलाज नाही. तुम्ही किती वर्षे उघडी बोडकी जमीन बघता आहात?
शेतकरी : लई वरसं झाली.. म्हणजे आम्ही कधी जंगल पाह्यलच नाय गावात.. आजाकडून ऐकलय फक्त..

मी : मग इतक्या वर्षांचा निसर्गाचा ह्रास एखाद्या वर्षात कसा भरून निघणार? पण आपण आत्ता सुरवात केली तर काही वर्षांनी आपल्याला आणि पुढच्या सगळ्याच पिढ्यांना त्याचा फायदा मिळेल की..
शेतकरी : पण कुठे करायचं हे.. म्हणजे शेतात कसं काय जमणार? तुम्ही काय मदत देणारे का?

मी : तुम्ही तुमची शेती सुरु ठेऊन शेताच्या बांधावर पण लागवड करू शकता किंवा सामुहिक जमिनीवर हे काम सुरु करू शकता. ते कसं करायचं याची मार्गदर्शनपर मदत आम्ही देऊ शकू. पण हे काम गावाने एकत्र येऊन सामुहिक पद्धतीने करावे लागेल. गायरान किंवा वन विभागाच्या जमिनीपासून तुम्ही सुरवात करू शकता.
शेतकरी : आमच्या गावात एवढी मोठी जमीन नाय किंवा फोरेष्ट बी नाये..

मी : हं.. मग तुम्ही गावात छोट्या जमिनीवर, एखाद दोन एकरात देवळाच्या आवारात किंवा शाळेच्या आवारात किंवा कुणाच्या वरकस जमिनीवर ‘जीविधता उद्यान’ करू शकता. जीविधता उद्यान म्हणजे आपल्या भागात येणाऱ्या स्थानिक वनस्पतींचं संवर्धन आणि लागवड. अर्थात हा फक्त लागवडीचा विषय नव्हे तर कीटक, पक्षी, प्राणी, जीवाणू या सर्व जैविक विविधतेचा विषय आहे. शेतीत आपल्याला या सर्व जीवांची गरज असते. या सगळ्यांना अभय देणे महत्वाचे आहे. या माहितीपत्रकात असे उद्यान कसे करायचे याची थोडक्यात माहिती दिली आहे झाडांच्या यादीसकट. आणि ही यादी पाऊसमानानुसार वेगवेगळी आहे. कमी पाऊस, मध्यम पाऊस आणि खूप पाऊस अशा तीन याद्या इथे ठेवल्या आहेत. तुम्ही गावानुसार यातली एक यादी घेऊ शकता. परंतु यातली कृती अत्यंत महत्वाची आहे. पाण्याची किमान दोन वर्षे सोय असलेली आणि जरा बरी माती असलेली योग्य जमीन निवडणे महत्वाचे आहे. आणि लागवडीपूर्वी माती पुनरुज्जीवन महत्वाचे आहे. मातीतला ओलावा वाढला की लागवड करणे योग्य. भलेही यात एखाद दोन वर्षे उशीर झाला तरी चालेल. ह्या सगळ्याची विस्तृत माहिती आम्ही आपल्याला whatsapp वर पाठवू शकू.
शेतकरी : म्हणजे सरकारी ‘पानी अडवा, पानी जिरवा’ सारखं काम आहे हे. मग यात सरकारचं काही अनुदान मिळेल का?

मी : आता बघा.. सरकार किती गावात पोहोचणार. आणि शेती आपण करतो तर आपली संसाधने बळकट ठेवण्याचं कामही आपण करायला काय हरकत आहे. गावपातळीवर सामुहिकरित्या हे काम केलं तर एका कुणावर भार येणार नाही. तुम्ही काम करायला सुरवात केली तर अनुदान देणारे लोकही कदाचित सापडतील. पण सुरवात आपली आपणच करावी अर्थात अगदीच शक्य नसेल तर मनरेगा सारख्या योजना तुम्ही गावात घेऊ शकता.
शेतकरी : पटतंय हे पण सुरवात कुठून करायची नक्की ?

मी : याची सुरवात तुम्ही ग्रामसभेत हा विषय मांडून करू शकता. आणि हा केवळ जंगलाचाच विषय नाही तर गावाच्या एकूण क्षेत्राचा वापर कसा करायचा याची निश्चिती करायला हवी. गावात चुली असतील तर सरपण लागवड देखील तितकीच महत्वाची आहे. रस्त्याच्या कडेने तुम्ही चांगल्या उष्मांक असणाऱ्या झाडांची लागवड केली तर रस्त्याला सावली पण राहील आणि बायकांना फार लांब रानात जाऊन डोक्यावर ओझं आणायचा त्रास कमी होईल. उतारांवर किंवा वरकस जमिनीवर वनशेती करता येईल. वनशेती म्हणजे उत्पादन देणाऱ्या विविध स्थानिक वृक्षांची लागवड. परत एकदा यातून काही लगेच पैसे मिळायला सुरवात होणार नाही पण काही वर्षांनी शेतीला पूरक उत्पादन सुरु होईल. गावात जंगल आणि वनशेती वाढली तर तापमान नियंत्रण होईल. सूक्ष्म हवामान सुधारेल. पर्यायाने माती आणि तिच्यातील जीवाणू पण वाढीस लागतील जे शेतीला फायद्याचे ठरेल. थोडक्यात, गावात जंगल, वनशेती, राखीव गवताळ कुरणे, चराऊ कुरणे, सरपण लागवड, ओढे आणि त्याच्या काठावरची जंगले आणि शेती अशा अनेक गोष्टींचा आराखडा बनवता येईल, ज्यायोगे गाव समृद्धतेकडे आणि स्वयंपूर्णतेकडे जाऊ शकेल, असं आम्हाला वाटतं. पण हे सगळं गाव पातळीवर राबवण्यासाठी तुमचीच मदत लागेल.
शेतकरी : नक्की सुरु करनार ताई ! पण यातून तुमाला काय मिळनार?

मी : आनंद. असा उपक्रम तुम्ही गावात सुरु केला आणि निसर्गाला मदत केलीत तर आम्हाला आनंद होईल. कसं आहे, आम्ही गेली १८ वर्षे पर्यावरणविषयक काम करतो आहोत पण ते केवळ खाजगी जमिनींवर आणि अगदीच थोड्या प्रमाणावर. त्याचेच परिणाम बघून आता हे काम गावपातळीवर नेता येईल असे वाटते आहे. त्यामुळे गावात या पद्धतीने काम कसे होऊ शकेल याची आम्ही इथे केवळ मांडणी करतो आहोत. हे काम कसं पुढे जाऊ शकेल, यात काय अडचणी आहेत हे तुम्हीच आम्हाला सांगू शकता.
शेतकरी : हा .. मंग तुमी गावात येऊन आम्हाला मार्गदर्शन करनार का?

मी : इथे हजारो शेतकरी येत आहेत. प्रत्येक गावात जाऊन मार्गदर्शन करणं थोडं कठीण आहे. पण आम्ही आपल्याला whatsapp वर माहिती पाठवून मदत करू शकतो ८४४६०४६७२८हा आमचा नंबर. गरज लागली तर तर आम्ही येऊ पण आधी तुम्ही ग्रामसभेत हा विषय मांडून काय चर्चा होते आहे ते कळवा. गावाची काम करण्याची तयारी असेल आणि आपण बोललो त्याप्रमाणे तुम्ही जमिनी निवडल्या तर गरज लागली तर आम्ही येतो. पण हे काम राबवणं तसं सोपं आहे. यात कुठेही उच्च तंत्रज्ञान नाही. मूळ मुद्दा – हे काम करायला हवं – हे ठरवण्याचाच आहे.
शेतकरी : हा तोच मुद्दा कठीन हाय.. पण आमी नक्की प्रयत्न करनार. गाव नाइ पुढे आलं तर शेताच्या बांधावर तरी दोन झाडं नक्की लावणार…

तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच समजली की शेतकऱ्यांना पर्यावरणाचे महत्व माहित नाही असे निश्चितच नाही. पूर्वी शेतीचे मर्यादित प्रमाण आणि पद्धती यामुळे संवर्धनाची थेट गरज कधी भासली नसावी. परंतु काळाच्या ओघात शेतीपद्धतीचा बदलता कल आणि वाढते प्रमाण बघता सक्रिय संवर्धन व्हायला हवे असे दिसते. माती आणि पाणी सुदृढ ठेवणे, शेतीला उपकारकच आहे आणि ते आपल्याच हातात आहे, ही जाणीव जागृती करणे हाच या लेखामागचा मूळ उद्देश !

नाव- निर्मळ वैष्णवी नानासाहेब
तिसरे वर्ष फार्मसी विद्यार्थिनी
८४४६०४६७२८

  • Log in or register to post comments
  • Like
  • 1460 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,276 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,172 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,232 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,014 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,488 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,382 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,214 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,836 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,105 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 8,999 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,151 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,247 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,243 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,638 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,972 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,264 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,365 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,622 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,433 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • Utpreksha Ahire
  • Rutuja Bane
  • Seema Bhamare

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 55 *
Who's new नवीन सदस्य
  • Utpreksha Ahire
  • Rajshree
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले
    14 hours 46 minutes ago
  • जिद्द : एक आत्मकथन
    15 hours 28 minutes ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    1 day 4 hours ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    1 day 19 hours ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day 19 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 132
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 60
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 54
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 50
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 44
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 44
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 42
आजचे शेतमालाचे बाजारभाव 40
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 39
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 29
कापला रेशमाच्या सुताने गळा 27
किती चाटणार भारतपुत्रा? 27
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 26
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 20
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 16
माझे फेसबूक स्टेटस-1 15
किसान क्रांती 15
अर्धा जोडीदार 14
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 13
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 13
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,008
माझे फेसबूक स्टेटस-1 180,977
शुभारंभ 134,914
रानमेवा - भूमिका 109,388
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,396
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,610
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,542
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,831
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,580
उद्देश आणि भूमिका 77,447
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,614
विचारपूस 71,736
गणपतीची आरती ॥३५॥ 67,750
सत्कार समारंभ : वर्धा 66,732
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,312
किती चाटणार भारतपुत्रा? 61,716
जात्यावरची गाणी 56,012
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,422
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,045
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,353
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini