नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अ. भा. शे.सा. कवितास्पर्धेसाठी कविता
विषय - बळीराजा शेतकऱ्यांचा राजा
शीर्षक - वरूणा थांब जरासा
बरसत येती काळे घन
मुसळधार अशाच सरी
अंकुरण होते मातीतुन
कृपा तुझीच आम्हांवरी
घे विश्रांती क्षणभरीची
वरूणा थांब रे जरासा
हवा पिलां चिमणचारा
टाकण्या जीवां उसासा
भिजूनी जाती घरटीही
बिछाना होतसे ओला
कसा मिळावा निवारा
तुम्हीच आता ते बोला
घरंगळती धारा भूईवर
जाती गारठूनी सजीव
आसऱ्यापायी पळपळ
बनतील मरून निर्जीव
दयाघना तू वरूणराजा
दाखवा थोडी तरी दया
सतत धारेनेच तुमच्या
उतरेल सृष्टीची या रया
बरसता मुसळधार सरी
उभी पिके जाती कुजून
ओल्याचिंब मातीमधून
रोपे कशी येतील रुजून
खपतोया हा बळीराजा
दिनरातीलाही शिवारात
ऊन वारा अन् थंडीतही
कष्ट करतोय पावसात
मिळावे कष्टाचं त्याला
जगाकडूनीच खरं मोल
नको झिगझिग दरापायी
करु नका कष्ट मातीमोल
सौ.भारती सावंत
खारघर, नवी मुंबई
9653445835
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने