![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
रिबीकाची रिबीन
-------------------
विषाक्त प्राजक्ताने जराश्या फवारून
रीबीन अन रबराने निघ बटा सवारून
रिबिनीस फाशीचाही बघा मान देऊन
रिबिका प्रमाणे खेळा अता रिबिन बांधून
तू चाल पूढे डखरत नवा होत एल्गार
येइल विमानी जाइल दशानन थरारून
चलनात आभासीच्या हसत ठगत घनश्याम
तू गात का भीजावे असे द्रुश्य पाहून
पाऊस अभ्रातूनी बरसतो किती छान
जा बरस नव क्रांतीचे नवे रंग लावून
राजा तुझी ही कविता गझल सारखी आज
अर्पीत तिजला आहे सहा शेर वाहून
लगावली-
गागालगागागागा लगागालगागाल
-राजेश जौंजाळ पोहणा(हिंगणघाट)
-------------------------------------------------
प्रतिक्रिया
व्वा वाह व्वा वाह व्वा...
छान , राजेश..
Narendra Gandhare
Wa
खुप छान
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने