नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माझी मराठी माऊली : ओवी
माझी मराठी माऊली, जसा ओंकाराचा वाण
शब्दशब्द मोहविते, हरपते देहभान …॥१॥
माझी मराठी माऊली, शब्दामध्ये सरस्वती
ओव्या, श्लोक वाचुनिया, सारे जन सुज्ञ होती …॥२॥
माझी मराठी माऊली, जसा गंगेचा प्रवाह
ओघवते उच्चारण, मन बोले वाह! वाह!! …॥३॥
माझी मराठी माऊली, कोकिळेची कुहूकुहू
जशी पहाटेची साद, येते कानी मऊमऊ …॥४॥
माझी मराठी माऊली, इंद्रधनुष्याचे रंग
आणि सुवासाने होई, चंपा, जाईजुई दंग …॥५॥
माझी अभय मराठी, रेशमाची नरमाई
दिसे माऊली शोभून, सार्या जगताची आई …॥६॥
गंगाघर मुटे “अभय”
……………………………………………………………..