नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बळीच्या सरणावरती
ये बाबा ये.......
वाट तुझी पाहता अश्रू येतया नयनी
कुठं आहे तू बाबा वाट पाहते ही धरणी....(धृ)
बीज ते अंकुरले आहे पेरले होते काल
तुझ्याविना रे बाबा त्यांचे काय झाले हे हाल
अंकुरही रडू लागले रडते माझी माय
चाऱ्याविना हंबरते गोठ्यामधली गाय
रान झालया सुनं लुप्त पावलीया धून
कुठं शोधू तुला मी हरवलंय माझं मन
घाव हा काळजाचा कसा काढू भरून
ये बाबा ये............... (1)
नांगर घेऊनिया हाती धरणी कसली होती
सपान हिरवं पूर्ण करण्या कर्ज पोसली होती
घामाच्या या धारेवरती घाव सोशिले होते
दुष्काळाच्या छायेवरती नाव कोरिले होते
कुटुंबाचा होता तू तूच होता रे पाया
रणरणत्या उन्हाची तूच होता रे छाया
घडविण्या संसारा तूच लाविली माया
ये बाबा ये............... (2)
पोरकं करुनि गेलास तू लावूनी गळ्या फास
सोबतीला तू असल्याचा आजही होतो भास
रडलो कुशीत आईच्या मी ठेवुनी मनी आस
का नशिबी कष्टकऱ्यांच्या असला हा वनवास
पंख फुटता क्षणी का पंख हे छाटले जाते
बळीच्या सरणावरती धोरणे आखली जाते
सजलेल्या सपनावरती पाणी का फेरले जाते
ये बाबा ये............... (3)
- रंगनाथ तालवटकर
चिखली (कोरा)
त.समुद्रपूर जि. वर्धा
7387439312
प्रतिक्रिया
बढिया!!
छान गीतरचना!!!!
धन्यवाद सर
धन्यवाद सर
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण