Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

IT कार्यशाळा - आपण साक्षर की निरक्षर? - भाग-२

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 5:54 PM IST, गुरू October 15, 2020
IT कार्यशाळा - आपण साक्षर की निरक्षर? - भाग-२
 
आपण साक्षर आहात की निरक्षर आहात ? हा प्रश्न मी ज्यांनी चाळीशी ओलांडली आहे त्या सर्वांना विचारतो आहे. मोबाईल, संगणकीय (कॉम्पुटर) आणि संस्थळीय (वेबसाइट) तंत्रज्ञान ज्या प्रचंड द्रुतगतीने झेप घेत आहे ते लक्षात घेतले तर अगदी येत्या दोनचार वर्षातच ४० वयोगटापुढील पिढी सपशेल अनपढ, अशिक्षित आणि अज्ञानी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरळ सरळ थेट बोलायचे असेल तर असे म्हणता येईल कि तुम्ही जर संगणकीय इंटरनेट तंत्रज्ञानाशी आज अगदीच अनभिज्ञ असाल तर पुढील काही वर्षात तुमची गणना निरक्षर या पातळीवर होण्याची दाट शक्यता आहे.
 
       ज्या तर्‍हेने नेट तंत्रज्ञान पुढे जात आहे ते बघता येणारा काळ हा पूर्णत: संगणकीय प्रणालीवर आधारलेलाच असेल; जिथे कागद, पेन आणि वही हद्दपार झालेली असेल. त्यांची जागा संगणकाच्या किंवा मोबाईलच्या कळफ़लकाने घेतलेली असेल. हा व्यवस्था बदल अटळ आहे कारण हा पर्याय कमीखर्चिक, वेळ वाचवणारा, सुरक्षित आणि सोईचा आहे. येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा बदल थांबवणे किंवा अडवून धरणे कुणाच्याच आवाक्यात नसणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करणे, एवढाच एक पर्याय उपलब्ध आहे. 
 
आज जे चाळीशीच्या आत आहेत ते सहजगत्या अगदी आपोआप हा बदल आत्मसात करुन घेतील पण जे चाळीशीच्या वर आहेत त्यांचीच खरी गोची होणार आहे. एकतर ही पिढी या तंत्रज्ञानाबाबत उदासिन, अनभिज्ञ असल्याने त्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या आवाक्याची जाणीव झालेली नाही, शिवाय येऊ घातलेला काळ सर्व सद्यव्यवस्थेची उलथापालथ करणारा असणार आहे याची पुसटशी कल्पना देखील त्यांच्या ध्यानीमनी नाही. या पिढीने वेळीच सावध होऊन अभ्यासाने, महतप्रयासाने नव तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक झाले आहे. काळाची पावले ओळखता आली नाही आणि तदनुरुप स्वत:त बदल करुन घेता आले नाहीत तर सर्वसामान्य व्यक्तींची बात सोडा; अगदी स्वत:च्या नावासमोर अ‍ॅड, बॅ, डॉ, प्रा. अशी बिरुदे लावणारी मंडळी सुद्धा अगदी अनपढ, अशिक्षित आणि अज्ञानीपणाच्या पातळीवर घसरलेले काही काळाने आपल्याला बघायला मिळतील कारण  त्यांच्या पेक्षा त्यांचा बालवाडीत शिकणारा चार-पाच वर्षाचा नातू  त्यांच्यापेक्षा कैकपटीने सुशिक्षित, व्यवहार चतूर, मोबाईल अथवा संगणक सक्षमपणे हाताळून प्रत्यक्ष कृती करणारा  आणि सर्वज्ञानी असलेला बघायला मिळणार आहे.
 
एवढा काळबदल होण्यास पुढील पाच वर्षे पुरेशी आहेत!
मरेपर्यंत आत्मनिर्भर राहायचे असेल तर ......
स्वतःचे व्यवहार त्यातही विशेषतः बँकिंगचे व्यवहार स्वतःचे स्वतःच करायचे असेल तर....  
सावध व्हा! शिका!!  आणि.......आत्मसात करा!!!
बस. एवढाच एक पर्याय तुमच्या-आमच्या समोर शिल्लक आहे.
 
- गंगाधर मुटे
=====
IT कार्यशाळा
कार्यशाळा
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 2808 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,290 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,192 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,243 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,032 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,495 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,394 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,218 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,850 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,109 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,008 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,298 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,263 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,250 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,642 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,975 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,276 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,373 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,438 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 254 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    8 hours 44 minutes ago
  • धन्यवाद
    8 hours 45 minutes ago
  • खूप खूप धन्यवाद
    9 hours 2 minutes ago
  • धन्यवाद
    9 hours 9 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    10 hours 37 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 412
आजचे शेतमालाचे बाजारभाव 162
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 147
माझे फेसबूक स्टेटस - 2 139
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 135
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 129
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 129
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 120
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 115
किती चाटणार भारतपुत्रा? 87
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 85
कापला रेशमाच्या सुताने गळा 81
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 44
शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग सांगणारी 'बळीराणी' 43
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 43
वावर 38
उद्देश आणि भूमिका 34
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 30
किसान क्रांती 30
धडानवडाची मैना लई गुणाची : विडंबनात्मक बालकविता 27
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,026
माझे फेसबूक स्टेटस-1 181,001
शुभारंभ 134,927
रानमेवा - भूमिका 109,394
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,412
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,844
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,546
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,877
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,595
उद्देश आणि भूमिका 77,484
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,715
विचारपूस 71,748
गणपतीची आरती ॥३५॥ 67,775
सत्कार समारंभ : वर्धा 66,742
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,337
किती चाटणार भारतपुत्रा? 61,879
जात्यावरची गाणी 56,030
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,566
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,065
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,372
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini