Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

बाळ

Main page content

By बेफिकीर | 6:09 PM IST, शुक्र June 24, 2011
विनोदी लेखन

लिमये प्रसूती गृहातील एका गूढ खोलीच्या बाहेर एक माणूस अस्वस्थपणे येरझारा घालत आहे. बाहेर येणार्‍या आणि आत जाणार्‍या अशा सर्व नर्सेस प्रचंड वेगात धावत असल्यामुळे आत नेमके काय चालले आहे हा प्रश्न विचारण्याची त्याची छातीच होत नाही आहे. या माणसाची म्हातारी आई जपाची माळ हातात घेऊन वर आढ्याकडे बघत काहीबाही पुटपुटत आहे. या माणसाचा म्हातारा बाप या माणसाला सांगत आहे की तुझ्यावेळेस इतका वेळ लागलेला नव्हता, तू लगेच झाला होतास. त्यावर तो माणूस 'त्याचा आत्ता काय संबंध' अशा अर्थाचा चेहरा करत आहे तर त्याची आई माळ नसलेला दुसरा हात ओवाळल्यासारखा करून नवर्‍याची अक्कल काढत आहे व पुटपुटतानाच म्हणत आहे की तुम्हाला त्यातले काय कळते?

त्यातच डॉक्टर बाहेर येतात. त्यांच्या चेहर्‍यावरील गांभीर्य हिटलर ताब्यात आल्यासारखे आहे.

माणूस - काय झालं?

डॉ - व्हायचंय

माणूस - हो पण काय होणार आहे?

डॉ - झाल्यावर कळेल

माणूस - पण कधी होणार आहे?

डॉ - होईल तेव्हा होईल

माणूस - याला काय अर्थंय??

डॉ - ती काय माझी जबाबदारीय?? आत्ताशिक कळा येतायत

माणूस - मी तिला भेटू शकतो का?

डॉ - नाही.

माणूस - का?

डॉ - आत्ता ऑपरेशन टेबलवर आहे ती तुमची बायको नाही आहे.

माणूस - मग कोण आहे?

डॉ - ती माझी बायको आहे.

माणूस - मग माझी बायको कुठे आहे?

डॉ - त्या प्रसूत झाल्या.

माणूस - अहो मग मी माझ्याच बायकोचं विचारतोय.

डॉ - झाल्या की त्या प्रसूत

माणूस - अहो... मग काय झालं?

डॉक्टरांनी चष्मा काढला. आर्मीतला अधिकारी मेल्यावर बाकीचे टोप्या काढतात तसा काढला. गांभीर्याची परिसीमा आणली चेहर्‍यावर! त्या माणसाकडे उदासीच्या पराकोटीने पाहून खिशातल्या रुमालाने स्वतःचे डोळे पुसले.

माणूस - गेली??

डॉ - नाही

माणूस - प्लच! पण मग तुम्ही का उदास?

डॉ - जे झाले आहे ते भयंकर आहे

माणूस - नावही ठेवलं मुलाचं? भयंकर?

डॉ - नाही, ते एक विशेषण आहे. भयंकर प्रकार झालेला आहे.

माणूस - ही माझी आई, हे माझे वडील, आणि यांना हा मी झालो आहे. याहून काय भयंकर घडलंय आत?

डॉ - तुमच्या पत्नीच्या पोटी जन्माला आलेल्या मुलासारखे एकही मूल मी आजतागायत पाहिलेले नाही.

माणूस - कोणतीच दोन माणसे एकसारखी नसतात

डॉ - हे ज्ञान चुलीत घाला

माणूस - म्हणजे?

डॉ - अहो, ते मूल बोलतंय

माणूस - बोलतंय म्हणजे?

डॉ - चक्क मराठी बोलतंय! मगाशी नर्सची चौकशी केली, म्हणे नीट उचलता येत नाही का मला? ही कसली घिसाडघाई?

माणूस - ऑ?? मग काय झालं??

डॉ - ती नर्स बेशुद्ध पडलेली आहे. तिलाही अ‍ॅडमीट केलंय!

माणूस - हे, हे माझ्या बायकोला माहीत आहे का?

डॉ - त्यांना पोस्ट प्रेग्नन्सी सोनोग्राफीसाठी पाठवलंय

माणूस - का?

डॉ - तुमचा मुलगा जन्माला आल्यावर त्यांना म्हणाला 'फार त्रास नाही ना झाला तुला'! त्यांनाही फिट आली निजल्या निजल्याच!

माणूस - डॉक्टर, हा काय प्रकार हो?

डॉ - मी जन्माच्या दाखल्यावर सही करू शकत नाही

माणूस - का?

डॉ - असे बालक जन्माला येऊ शकत नाही

माणूस - अहो पण आलंय ना?

डॉ - पण अशी तरतूदच नाही ना? वजन लिहावं लागतं, डिलीव्हरीची वेळ, बालक ठीकठाक आहे किंवा नाही, बालकाचे लिंग, रडले की नाही वगैरे नोंदी असतात. बालक जन्माला आल्यावर बोलत होते की नाही असा प्रश्नच नसतो त्या फॉर्मवर!

माणूस - हो पण ते बालक बोलले हे लिहायचेच नाही

डॉ - असे कसे? उद्या ते इथून गेल्यावर जर कुणाला उद्देशून जातीवाचक वगैरे बोलले आणि दंगाबिंगा झाला तर आमच्या प्रसूतीगृहाचे काय?

माणूस - थोबाड फोडीन की मी त्याचं?

डॉ - त्याच थोबाड फोडाल हो, आमचं काय पण?

माणूस - मग तुमचं म्हणणं काय आहे?

डॉ - तुम्ही हे बालक आणि त्याच्या मातेला घेऊन घरी जा

माणूस - हो मग आम्ही काय त्यांना इथेच ठेवणार होतो काय जन्मभर?

डॉ - तसं नाही, आणि आयुष्यात कधीही सांगू नका की हे बालक आमच्याकडे जन्माला आले

माणूस - तुमच्याशी काही बोलले का ते बालक?

डॉ - मला म्हणाले अशी भुल देतात होय? म्हणे मलाही बेशुद्ध पडल्यासारखे वाटले

माणूस - मग तुम्ही काय म्हणालात?

डॉ - काय म्हणणार? सॉरी म्हणालो

माणूस - तुम्हाला काहीच वाटलं नाही ते बाळ बोलतंय हे पाहून??

डॉ - घेरी आली होती घेरी, म्हणून तर बाहेर आलोय जरा वेळ

माणूस - मी जाऊ का आत?

डॉ - इतक्यात नको

माणूस - का?

डॉ - ते एका आयाशी भारतातील वाढती लोकसंख्या आणि निर्मुलनाचे उपाय यावर चर्चा करतंय

माणूस - आणि ती आया काय करतीय?

डॉ - ती रामाचा जप करतीय, भीतीने गारठलीय, बहुधा आत्तापर्यंत कोसळली असेल

माणूस - आणि अशा परिस्थितीत तुम्ही बाहेर आलात?

डॉ - मी माझं बघू का त्या आयाचं?

माणूस - डॉक्टर?? ओ डॉक्टर... हे असं कसं झालं हो??

डॉ - मी काय सांगणार हो! तुम्ही नेमकं काय केलं होतंत ते मला कसं कळणार?

माणूस - मी हे बालक घरी न्यायला नकार देत आहे

डॉ - ते बालक म्हणजे काय बांग्लादेशी घुसखोर आहे का काय? म्हणे नकार देत आहे.

माणूस - कशावरून तुम्ही तुम्हाला झालेलं बालक माझ्या बालकाबरोबर बदललेलं नाहीत?

डॉ - माझी बायको अजून अवघडलेल्या अवस्थेत आहे हे आत येऊन पाहू शकता

माणूस - कशावरून ती तुमचीच बायको असून माझी बाय... सॉरी...

डॉ - हे पहा, पेराल ते उगवणार

माणूस - म्हणजे?

डॉ - हे तुमचं बालक आहे आणि ते तुम्ही घरी नेलंच पाहिजेत

माणूस - आई, अगं हे बघ काय म्हणतायत, तुझा नातू बोलतोय

आजी - पण डोळे उघडलेत का?

डॉक्टर - अहो तोंड उघडलंय तिथे डोळ्यांचं काय घेऊन बसलात?

आजी - सूनच असली आणलीयस करून, एक सेकंद तोंड बंद करत नाही

डॉक्टर - ओ, तुमची भांडणं तुमच्या घरात करा, आधी डिसचार्ज घ्या

माणूस - एक मिनिट, मला आधी ते बालक पाहूदेत

वरात आतमध्ये गेली.

बेशुद्ध आईशेजारी ते बालक निवांत पहुडून मुठी चोखत होते. एका बाजूला एका खुर्चीवर बसलेली आया खुर्चीवरून खाली कोसळलेली तशीच पडलेली होती. तिच्यावर याक्षणी कुणाचेही कॉनसन्ट्रेशन नव्हते.

एका कोपर्‍यात दोन नर्सेस थरथरत उभ्या होत्या.

माणूस बेडपाशी गेला.

बाळ - आले... आले पैलवान, काय हो? बाहेर फेर्‍या काय मारताय?

माणूस - तू, तू बोलतोयस कसा काय?

बाळ - मग अशा अवस्थेत दुसरं काय करणार? धडधाकट असतो तर पहिला या डॉक्टरला धुतला असता.

माणूस - का?

बाळ - परवाच तारीख उलटून गेली माझी, अगदी पार कळा येईपर्यंत कशाला थांबायचं? वैताग आला आतमध्ये नुसता

माणूस - मी तुझा बाप आहे

बाळ - आणि मी तुमचा

माणूस - ते कसे?

बाळ - बघा आयुष्यभर माझे संगोपन करता की नाही

माणूस - तुझा जन्मदाखला द्यायला हे नकार देत आहेत

बाळ - माझं फक्त बोलणं दिसतं ह्यांना

माणूस - तू आता घरी येतोस का?

बाळ - किती खोल्या आहेत?

माणूस - तीन

बाळ - आपल्याला सेपरेट पाहिजे, कटकट नकोय कसलीही

माणूस - देईन बाळ

बाळ - आणि दातबित येईपर्यंत मला तांबडा आणि पांढरा रस्सा फ्री द्यायचा, त्याचा चार्ज नाही लावायचा

माणूस - हे रंगीत रस्से कुठे मिळतात?

बाळ - आधीच्या जन्मी मी होतो तेव्हा बोकड कापला की तयार व्हायचे

माणूस - आपण असलं खात नाही बाळ

बाळ - तुमचं तुम्ही ठरवा, माझं मला ठरवू देत, लॅपटॉप आहे का घरात?

माणूस - नाही

बाळ - मग मला चालता येईपर्यंत रोज सायबर कॅफेत नेलं पाहिजे

माणूस - पण तू त्या खुर्चीवर बसणार कसा?

बाळ - बसायला लागलो की तर न्याल का नाही?

माणूस - नक्कीच

बाळ - आणि फिरता पलंग लागेल

माणूस - फिरता पलंग म्हणजे?

बाळ - जो आपोआप उजवी डावीकडे होतो असा

माणूस - का?

बाळ - कुशीवर वळेपर्यंत मी काय उताणं पडायचं क्काय??

माणूस - पण आई करेल की तुला उजवी डावीकडे

बाळ - ती अजून पंधरा दिवस उठत नाही बघा

माणूस - हे भविष्य कसं काय वर्तवतोस बाळा?

बाळ - मी केलेल्या पक्षत्यागामुळे तिला धक्का बसलेला आहे

माणूस - तू कसला पक्षत्याग केलास?

बाळ - तिची डिलीव्हरी नाही का झाली?

माणूस - बरं तू आत्ता चलतोयस का एक दोन चार दिवस थांबणार आहेस?

बाळ - उद्या जाऊ, आज माझं व्याख्यान आहे

माणूस - कुठे?

बाळ - हे काय इथंच

माणूस - कसलं व्याख्यान?

बाळ - गेल्या महिन्याभरात जन्मलेल्या मुलांना आईच्या दुधाचे महत्व सांगणार आहे मी

माणूस - पण ते तुला पटलंय का?

बाळ - ज्या क्षेत्रातील काहीही माहिती नाही त्याच्यावरच व्याख्यान देणार्‍या देशातच तर जन्माला आलोय मी

माणूस - आणि महिन्यापुर्वी जन्माला आलेल्या बाळांना व्याख्यान का नाही?

बाळ - ती इथे कुठेयत बाळं? ती गेली की घरी?

माणूस - डॉक्टर, ही केस कसलीय?

डॉक्टर - भुताटकीची

बाळ - भूत तुझा बाप! ओ, मला उठवून बसवा जरा! ही का अशी पडलीय आया? चांगली बोलत होती की?

माणूस - इथल्या नर्स घाबरतायत तुला

बाळ - त्यांची लायकीच ती आहे

माणूस - का?

बाळ - हा डॉक्टर बाहेर गेला की टाईमपास करत बसतात, परवा तर एकीने एक बाळ दहा वेळा बुचकळून काढलं पाण्यात, कसलं रडलं बिचारं!

माणूस - परवाचं तुला कसं कळलं?

बाळ - ऐकू येणारच ना? दिसत नसलं म्हणून काय झालं?

माणूस - म्हणजे तुला गेल्या नऊ महिन्यात काय काय झालं ते सगळं ऐकू आलंय?

बाळ - अर्थातच! आईने त्या दिवशी शेजारच्या काकांना बोलावलं होतं

माणूस - कशाला?

बाळ - ते काय कळलं नाही, पण काहीतरी खुसुरफुसुर चालली होती खरी

माणूस - मी कुठे होतो तेव्हा?

बाळ - मला काय दिसणार?

माणूस - पण आजी आजोबा?

बाळ - ते झोपलेले होते म्हणून तर बोलावलं

माणूस - आणि हे तू मला आत्ता सांगतोस??

बाळ - मग कधी सांगणार?

माणूस - तो नालायक काय म्हणाला आईला??

बाळ - तो म्हणाला आता दिड एक वर्ष तर काही तू भेटणार नाहीस

माणूस - मग ती काय म्हणाली?

बाळ - ती रडली तरी असावी किंवा हासली तरी असावी

माणूस - कशावरून??

बाळ - हादरत होतो ना मी??

माणूस - माझं.. माझं तुला काय काय माहीत आहे?

बाळ - टोटल माहितीय मल तुमचं!

माणूस - काय टोटल माहितीय??

बाळ - इथे बोलण्यासारखं नाहीये

माणूस - मग कुठे बोलण्यासारखंय?

बाळ - कुठेच नाही. डायपर बिपर आणलेत का?

माणूस - जाताना घेऊ

बाळ - हे प्रसूतीगृह कुठे आहे?

माणूस - डेक्कनवर

बाळ - मग काय! प्रभात रोडला लागलं की लगेच केमिस्ट आहे, त्याच्याकडून घेऊन टाकू

माणूस - तू घरी गेल्यावर काय करणार आहेस?

बाळ - हातपाय मोकळे करीन म्हणतो! अंग आखडलं होतं किती दिवस!

माणूस - तुझं नांव काय ठेवायचंय? नॉर्मली असं विचारावं लागत नाही बाळाला

बाळ - काहीही ठेवा, आय अ‍ॅम नॉट सो.. काय म्हणतात त्याला?

माणूस - तू एक विनंती मान्य करशील का?

बाळ - बोला बोला, मनात ठेवू नका काहीही

माणूस - आजपासून बोलता येईपर्यंत बोलणं बंद

बाळ - हो पण बोलता येतंय ना?

माणूस - हो पण येत नाही असं दाखवायचं..आणि रात्री मला एकांतात ऐकवायचं, कोण कुणाशी काय बोललं ते!

बाळ - हा एकतर्फी व्यवहार आहे, माझं काय??

माणूस - तुला मी संध्याकाळी फिरवून आणत जाईन

बाळ - चालेल, मलाही जरा जग बघायचंच आहे

माणूस - मग ठरलं तर?

बाळ - ठरलं! आता तुम्हाला एक बातमी सांगू का?

माणूस - काय?

बाळ - सांगू का सगळ्यांसमोर??

माणूस - नको नको, हं, आता मी तुझ्यापाशी कान आणलाय, कानात सांग कुजबुजत

बाळ - तुम्ही ... मागे एकदा... पंधरा वीस दिवस कुठे गेला होतात का??

माणूस - म्हणजे??

बाळ - एकटेच??

माणूस - त्याला बरेच दिवस झाले... दिल्लीला होतो कामानिमित्त... का??

बाळ - तेव्हाचाच आहे मी...

विनोदी
baal
विनोदी
भन्नाट

Andi2702

शुक्रवार, June 24, 2011 - 19:00
Permalink
New

काय भन्नाट लिवलंय राव..
हसून हसून पार बोबडी वळली. :bigsmile:

  • Log in or register to post comments
मस्त विनोदी

गंगाधर मुटे

शनीवार, June 25, 2011 - 12:20
Permalink
New

लेख भन्नाट झाला आहे.
मजा आली. बरेच दिवसानंतर एवढं हसलो.

:D .....:)

  • Log in or register to post comments
मस्त विनोदी.शेवट अजून वेगळा

दत्ता राऊत

गुरुवार, June 30, 2011 - 11:17
Permalink
New

मस्त विनोदी.

शेवट अजून वेगळा केला असता तर अजून मजा आली असती.

  • Log in or register to post comments
खूप खूप हसवलेय.

कॅप्टन Carf

शुक्रवार, July 15, 2011 - 21:51
Permalink
New

खूप खूप हसवलेय.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 21486 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,288 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,185 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,241 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,025 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,494 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,384 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,218 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,847 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,109 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,006 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,289 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,254 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,248 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,638 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,972 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,273 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,369 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,624 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,436 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 191 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    4 hours 18 minutes ago
  • धन्यवाद
    4 hours 19 minutes ago
  • खूप खूप धन्यवाद
    4 hours 36 minutes ago
  • धन्यवाद
    4 hours 43 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    6 hours 11 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 337
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 123
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 111
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 111
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 108
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 96
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 96
कापला रेशमाच्या सुताने गळा 72
आजचे शेतमालाचे बाजारभाव 72
किती चाटणार भारतपुत्रा? 71
माझे फेसबूक स्टेटस - 2 58
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 43
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 43
शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग सांगणारी 'बळीराणी' 43
वावर 36
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 24
किसान क्रांती 21
गझल 19
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 16
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 16
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,024
माझे फेसबूक स्टेटस-1 181,001
शुभारंभ 134,926
रानमेवा - भूमिका 109,390
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,410
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,754
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,546
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,850
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,590
उद्देश आणि भूमिका 77,462
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,673
विचारपूस 71,739
गणपतीची आरती ॥३५॥ 67,767
सत्कार समारंभ : वर्धा 66,741
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,334
किती चाटणार भारतपुत्रा? 61,863
जात्यावरची गाणी 56,025
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,485
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,056
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,361
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini