Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

स्वतंत्र कर तू बापा

Main page content

RANGNATH TALWATKAR
By RANGNATH TALWATKAR | 10:47 PM IST, शनी December 31, 2022
गेय रचना/गीत/पोवाडा इत्यादी

स्वतंत्र कर तू बापा

तू जागा हो...तू जागा हो...
तूच तुझारे वाली कर्जाच्या ओझ्याखाली
जिंदगानी तुझी रे दुःख हे दरसाली
तू जागा हो...तू जागा हो....।।धृ।।

कसतो शेती तू जोमाने कष्ट करून फार
तोंडी घास येता तुझी स्वप्नेच होती ठार
जिवापल्याड जपुनी पिका मोल काय आहे
ठरलेल्या त्या शब्दांचे आज बोल काय आहे
नाटकी डाव खेळुनी रंगत आणली जाते
फाटकी झोळी घेऊनि संगत मानली जाते
झुट्या आश्वासनांनी पंगत ताणली जाते
तू जागा हो... तू जागा हो..... ।।1।।

गणित नाही खर्चाचे त्या भाव ठरविले जाते
हमीभावाच्या ओझ्याखाली तुला लोळविले जाते
कर्ज घेऊनी डोईवरती लाखो जीव ते गेले
आखुनी धोरणे कुचकामी ते सांगा काय केले
असल्या या धोरणापायी घेतला गळ्या फास
नव्या संशोधनाची लागली जीवा आस
घामाच्या धारेवरती भोगला वनवास
तू जागा हो... तू जागा हो..... ।।2।।

नको घाबरू कुणा आता लेखणी घे तू हाती
कुचकामी या धोरणांना पुरवू नकोस माती
लढा लढूनी हक्काचा स्वतंत्र कर तू बापा
शेती धोरणे नवे आखुनी मार्ग कर तू सोपा
धार देऊनी आता शब्द तू मांड नव्याने
जागे होतील सारे एकजुटीच्या भयाने
उगवतील मग ते सारे सारे सुपीक बियाणे
तू जागा हो.. तू जागा हो..... ।।3।।

- रंगनाथ तालवटकर
(वर्धा)

  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 1887 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 5 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    8 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    8 hours 2 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    8 hours 4 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    8 hours 6 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 8 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
बळीराणी कादंबरी समीक्षा 0
दानशूर बळीराजा 0
असा आहे आमचा शेतकरी 0
हारासी 0
शेतमालाला भाव द्या 0
नाना पाटेकर : शरद जोशींचे चारित्र्य अभ्यासक्रमात लावा 0
अन्य ग्रहावरील सजीव सृष्टी अशी असेल! 0
14 वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन 0
रानमेवा खाऊ चला....! 0
विदर्भाचा उन्हाळा 0
अंगावरती पाजेचिना....!! 0
रानमेवाची दखल 0
सरींचा कहर 0
आम्ही शेतकरी बाया 0
घात 0
शेतकरी नेत्यांकडून पंतप्रधानांना निवेदन 0
शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा 0
शेतकरी संघटक २१ जानेवारी २०१२ 0
पुरस्कार वितरण : मल्टीस्पाईस, पुणे 0
येणार्‍या काळात शेती हाच पर्याय- शरद जोशी 0

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,112
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,743
कापला रेशमाच्या सुताने गळा 31,712
वादळाची जात अण्णा 31,517
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,189
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,162
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 30,828
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 30,703
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,205
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,940
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,889
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,489
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,182
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 27,994
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,595
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,461
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,983
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,785
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,254

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini