Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

Status message

This post has been added to your bookmarks

ऐक ना: पुस्तक समीक्षण

Main page content

माही_निर्मिती
By माही_निर्मिती | 10:40 PM IST, रवी November 19, 2023
पुस्तक समीक्षण

पुस्तक समीक्षण-

ऐक ना : नवजात लेखणीला पडलेलं देखणं स्वप्न

काव्य क्षेत्रात येऊन अगदी अल्प कालावधीत पुण्यातील युवा कवी श्री.गणेश बनसोडे यांनी त्यांचं साहित्यरुपी आकाशात क्षितिजापल्याड झेप घेण्याच भव्य स्वप्न पाहिलं आणि 'ऐक ना' या काव्यसंग्रहाच्या रुपाने त्यांनी त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल चालू केली आहे. या कविता संग्रहाला प्रसिध्द गझलकार श्री. गोपाल मापारी आणि प्रसिद्ध लोकप्रिय कवी श्री. अनंत राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पुस्तकाला अतिशय समर्पक व आकर्षक असे श्री. कैवल्य यांचे मुखपृष्ठ व सौ. सारिका गणेश बनसोडे यांचे मुखचित्र लाभले आहे. काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेची दिलखेचक अशी मांडणी व सजावट करण्यासाठी चि. आर्यन बनसोडे यांनी मेहनत घेतली आहे. गणेश बनसोडे या संग्रहातील 'सार माझ्या वारीचा' या कवितेत मांडतात,

'फुलांच्या बागेत काटाच नशिबी होता
सुगंध पसरविण्या फुलांचा नकार होता
गाव मनीचा दिसता, प्रश्न उभा राहिला होता
याचसाठी अट्टाहास का? हा प्रश्नच होता' (पृ.१५)

आपल्या आजूबाजूला सर्वत्र चांगल्या गोष्टी असूनदेखील एखाद्या माणसाच्या नशिबी कायम वाईटच येतं. आणि आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी आपण धडपडत असतो ती गोष्ट आपल्याला जेव्हा प्राप्त होते, तेव्हा माणसाला स्वतःला प्रश्न पडतो की आजपर्यंत एवढा अट्टाहास, एवढी धडपड एवढे प्रयत्न आपण याच गोष्टीसाठी केले का?
पुढे कवी आपल्या 'दोन घटके' या कवितेत मृत्यूवर भाष्य करताना लिहितात की,

'एक दिवस आयुष्याची दोरी तुटणार आहे
राजा असो की भिकारी, मृत्यू अटळ आहे
जीवन रंगमंच हा सगळे कलाकार इथले
प्रत्येकाचे पात्र सजलेले दोन ओळींचे आहे' (पृ.२०)

ज्या गोष्टीला जन्म आहे, त्या गोष्टीला मरण देखील चुकलेले नाही.संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे 'जातस्य ही ध्रुवो मृत्यू' त्याप्रमाणे हा मृत्यू श्रीमंत गरीब, उच्च नीच, काळा गोरा असा भेदभाव कधीच करत नाही, असे लिहून कवी पुढे जीवनाची तुलना रंगमंचाशी करतो आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेने आपल्या नशिबी आलेले पात्र आपल्या परीने चांगल्या प्रकारे वठविण्याचा प्रयत्न करावा. अशाप्रकारे कवीने प्रत्यक्ष जीवन आणि रंगमंच यांची सांगड घालून मृत्यूवर भाष्य केले आहे.
त्यानंतर पुढील 'पण हरलो नाही' या कवितेत कवी लिहितो,

'तुझ्या कट्यारीवर अभिमान असेल तुला
माझ्याही लेखणीवर गर्व कमी नाही मला
तुटलो काही काळ, हरवलोही काही काळ
पण हरलो नाही, उगवेल एक दिवस सकाळ'

कवीच्या स्वतःच्या लेखणीवरील विश्वास या ओळीतून झळकतो. माणसाचं आयुष्य ज्या आशेवर सुरू आहे ती आशाच माणसाला सदैव जगण्याचं कारण देत असते; त्यामुळे आत्ताच्या अंधकारमय परिस्थितीमध्ये देखील उद्याच्या सुंदर सकाळची स्वप्ने पाहणाऱ्या कविमनाचं प्रतिबिंब या ओळींमध्ये उमटले आहे.

तथापि, या सर्वांगसुंदर काव्य संग्रहाला जर कवीने वृत्तांची जोड दिली असती तर या पुस्तकाच्या देखणेपणात कैकपटीने वाढ झाली असती, यात तिळमात्र शंका नाही. काही ठिकाणी व्याकरणाचे नियम पाळून सुधारणा करणे अपेक्षित आहे.
कवी गणेश बनसोडे यांनी अनेक वेगवेगळ्या धाटणीचे विषय हाताळण्याचा प्रयत्न या कविता संग्रहाच्या माध्यमातून केला आहे. या संग्रहात एकूण ९४ कविता आहेत. बाह्यरुपाप्रमाणे या संग्रहाचे अंतरंगदेखील तेवढेच सुंदर आहे. नवोदित कवीने लिहिलेल्या या पहिल्याच काव्यसंग्रहाचे रसिक-वाचक नक्कीच स्वागत करतील अशी आशा आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहसाठी व आगामी लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!!

महेश ज्ञानोबा होनमाने
रा. ताडकळस, ता. पूर्णा, जि.परभणी
ह. मु. जुनी डी/१६,शक्तिकुंज वसाहत,परळी वैजनाथ-४३१५२०
मो.९९२३५२५५३३
ईमेल: maheshhonmane96@gmail.com

ऐक ना (काव्यसंग्रह)
कवी : गणेश बनसोडे
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
प्रथमावृत्ती : सप्टेंबर -२०२१
पृष्ठे : १००
मूल्य : ₹ ११० /-

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

सोमवार, November 20, 2023 - 00:18
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!



CongratsCongrats

लेखन छान आहे पण विषयाशी

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 00:54
Permalink
New

लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.

शोध

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 3 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    3 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    3 hours 2 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    3 hours 4 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    3 hours 6 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 3 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24 425
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 187
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 129
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 126
किती चाटणार भारतपुत्रा? 125
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 125
कापला रेशमाच्या सुताने गळा 124
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 120
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 105
किसान क्रांती 53
मातृत्वाचा शृंगाररस 31
दुःख मातीतले.... 30
गझल 28
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 26
असे करावे महिला कवी-लेखिकांच्या पुस्तकाचे समीक्षण! 24
ती 17
तुझ्यापायीच झाली ही दैना 16
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 15
फुलू दे शिवारी 14
दुष्काळ 14
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,973
माझे फेसबूक स्टेटस-1 180,810
शुभारंभ 134,898
रानमेवा - भूमिका 109,382
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,373
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,104
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,527
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,772
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,573
उद्देश आणि भूमिका 77,432
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,401
विचारपूस 71,686
गणपतीची आरती ॥३५॥ 67,706
सत्कार समारंभ : वर्धा 66,719
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,261
किती चाटणार भारतपुत्रा? 61,172
जात्यावरची गाणी 55,984
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,358
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,032
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,336
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini