Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

चांगली माणसे ..एक अनुभव !!

Main page content

Rahul Rajopadhye
By Rahul Rajopadhye | 9:42 PM IST, गुरू October 10, 2019
अनुभवकथन

चांगली माणसे ..एक अनुभव !!

समोर टेलीविजन चालू होता. कुठल्याश्या घोटाळ्याच्या ई डी चौकशीची बातमी चालू होती. कोटीच्या कोटी रुपयांचा उल्लेख अगदी काही शे रूयाण्चा करावा तसा होतं होता. वीस हजार कोटी पंचवीस हजार कोटी मध्येच तो कुणीतरी अकरा हजार कोटी कर्ज घेवून पळालेल्याची आवर्जून आठवण काढली जात होती. चर्चा सत्र जोरात रंगात आलं होतं वेगवेगळे आदर्श असलेली वेगवेगळी माणसं आगदी हिरीरीने स्वताचा मुद्दा पटवून देत होती. कोटीच्या कोटी उड्डाणे ऐकून हा एवढा पैसा असूनही त्यांच्याबाबत तसूभर ही आदर निर्माण करू देत नव्हता. काही शेतकरी त्यांचे सोसायटी कर्ज फेडीसाठी, चाळीस पन्नास हजार रुपयांसाठी झगडत असताना आणि बँका त्यांच्याकडे तारण म्हणून भरमसाठ कागदपत्रे मागत असताना या लोकांना अपहार करायला इतका पैसा मिळतो कसा ? प्रश्न अनुत्तरित ठेवून चर्चा सत्र पहात होतो. इतक्यात दारावरची बेल वाजली. दार उघडले तरं माझा शेतकरी मित्र उदय दरवाज्यात उभा . उदय गेली क्रित्येक वर्ष शेतीमध्ये कष्ट करत होता नजरेनेच त्यांला आत यायला सांगितले. कुठल्याश्या गरीब शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी मदत मिळावी म्हणून एका सामाजिक संस्थेतर्फे निधी सन्कलनाचे फॉर्म त्याचेकडे होते. त्याच्या संस्थेने त्यांना ते निधी संकलनासाठी दिले होते.

" राहुल आम्ही एका सामाजिक संस्थेसाठी मदत गोळा करत आहोत "
तो माहिती देता देता बोलला .
त्याची परीक्षा घेण्यासाठी मी बोललो

"काय करते काय ही संस्था ? "

तो पूर्ण अभ्यास करून आलेला होता

"अरे समाजात जे गरीब शेतकरी आहेत त्यांना जर कर्ज फेडता आले नाही तरं ही संस्था त्यांच्या साठी काम करते "

"खूप छान काम करताय तुम्ही मग किती पैसे देऊ ? '

मी विचारताच लगेच तो बोलला

" फक्त दहा रुपये दे "

मी म्हणालो

"इतकेच ? ? इतक्याने कसे बरे होणार रे ते ? "

तो म्हणाला

"राहुल खूप लोकं या जगात चांगली आहेत त्या प्रत्येकाने जर फक्त दहा रुपए दिले तरी या सगळ्या गरीब शेतकऱ्यांचे कर्ज फिटेल "

त्याचा तो निरागस चेहरा आणि निरागस आत्मविश्वास पाहून मी त्याला वीस रुपए दिले. त्याला खुपच आनंद झाला तो माझ्या सह्या घेवून पुढच्या चांगल्या माणसाच्या शोधात निघून गेला.

मी मात्र विचारात पडलो. प्रत्येक चांगल्या माणसाने फक्त दहा रुपए दिले तरी गरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल पण तरीही हे होताना दिसत नाही असे का व्हाव ही इतकी चांगली माणसं या जगात आहेत. त्यांना देणग्या देणे शक्यही आहे पण मग तरीही शेतकरी कर्जफेडीसाठी आत्महत्या का करतात ? कर्ज फेडीसाठी का झगड्तात. ? या एवड्या चांगल्या माणसांचे पैसे जातात कुठं ? ? ?
आणि मी झोपेतून जागा झालो
चर्चा सत्र संपून टी वी वर मुख्य बातम्या लागल्या होत्या. वृत्तनिवेदिका निर्विकार चेहेर्याने एक बँक बुडाल्याची बातमी सांगत होती. आणि त्या शेतकऱ्याच्या कल्पनेतली बरीचशी "चांगली माणसं" पैसे बुडल्याने ओक्साबोक्शी रडत होती.

© श्री. राहुल दत्तात्रय राजोपाध्ये
1073, नरसोबा गल्ली, तासगाव
ता. तासगाव जि. सांगली
9130215836
rdrajopadhye@gmail.com

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

मंगळवार, October 15, 2019 - 21:43
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
*congrats* :congrats:

  • Log in or register to post comments
स्पर्धाविजेती प्रवेशिका.

गंगाधर मुटे

शुक्रवार, January 3, 2020 - 18:26
Permalink
New

स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
*congrats* :congrats:
*bq* *bq*

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5839 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 11 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    10 hours 58 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    11 hours ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    11 hours 2 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    11 hours 4 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 11 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
जय विदर्भ? 2
धोरण.. 2
साहेब 2
स्वप्न 2
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 2
चांगली माणसे ..एक अनुभव !! 2
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 2
IT कार्यशाळा - अभ्यासक्रम - भाग-३ 2
भाव भावनांचा 2
कशी म्हणावीत गाणी 2
अशीही उत्तरे-भाग- १ 2
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 2
डोळ्यातील द्राक्ष पाहू दे 2
आम्ही शेतकरी... 2
कारण मला टाळायचं आहे जगणं... 2
८ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 2
रुमाल 2
वरुणा ! वरुणा ! 2
शेतकरी परिवार मोबाईल अ‍ॅप 1
गझल: जे पेरले ते उगवते 1

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,113
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,743
कापला रेशमाच्या सुताने गळा 31,734
वादळाची जात अण्णा 31,517
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,190
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,162
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 30,858
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 30,722
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,226
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,940
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,889
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,489
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,209
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 27,994
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,595
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,461
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,983
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,785
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,255

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini